ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Bigg Boss 14 : कॅप्टनसी टास्कमध्ये जान- एजाजमध्ये आली कटुता

Bigg Boss 14 : कॅप्टनसी टास्कमध्ये जान- एजाजमध्ये आली कटुता

Bigg Boss 14 च्या घरातला नवा कॅप्टन कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पहिला कॅप्टन्सी टास्क राहुल- रुबिनामध्ये रंगल्यानंतर या दोघांपैकी एक या आठवड्यात कॅप्टन होईल असे वाटले होते. पण या नेहमीप्रमाणे या घरात पुन्हा एकदा सीन पालटला आहे. नव्या प्रोमोनुसार जुन्या कॅप्टनमध्ये पुन्हा एकदा कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. राहुल- रुबिनाच्या कॅप्टनसी टास्कमध्ये एकमत न झाल्यामुळेच हा नवा टास्क रंगत असल्याचा अंदाज आहे. पण आता या नव्या प्रोमोमध्ये घरात कधीही स्वत:चे निर्णय घेऊ शकत नाही, असे आरोप असलेला जान कुमार सानूच भांडताना दिसत आहे. हे भांडण या घरातील त्याचा भाऊ एजाज खानसोबत होत असताना दिसत आहे. त्यामुळे हे भांडण आणि या आठवड्यात घराचा कॅप्टन कोण होणार? याची प्रतिक्षा अनेकांना आहे.

Bigg Boss 14: कविता कौशिकचा सलमानवर गंभीर आरोप, सोडायचा आहे शो

का भडकला जान?

प्रोमोनुसार या टास्कमध्ये घरातील जुन्या कॅप्टन्सना पुन्हा एकदा कॅप्टन होण्याची संधी देण्यात आली आहे. पहिल्या आठवड्याची कॅप्टन कविता, एजाज, जास्मिन,अली यांच्यामध्ये हा सामना रंगताना दिसत आहे. ज्याला कॅप्टन व्हायचे आहे त्यांच्यासाठी बॉक्स टास्क ठेवण्यात आला आहे. या बॉक्समध्ये घरातील कॅप्टन बसलेले दिसत आहे. घरातल्यांनी जो कॅप्टन नको आहे त्याला या बॉक्समधून बाहेर काढायचे आहे. अली या प्रोमोमध्ये कॅप्टनसी टास्कमधून बाहेर आलेला दिसत आहे. राहुल या खेळाचे संचालन करत आहे. दरम्यान, या खेळामध्ये कविता पुन्हा एकदा कॅप्टन होऊ नये या प्रयत्नात असलेला जान कविताला खेळातून बाहेर काढण्यासाठी जे काही करतो. त्याला विरोध करत रुबिना त्याला हटकले आणि त्यानंतर जान कुमार सानूचा राग अनावर होतो. प्रोमोमध्ये एजाज आणि जानमध्ये काहीतरी बाबतीत खटका उडाल्याचे दिसत आहे. या दोघांमध्ये असलेले हे भावाचे नाते यामध्ये बिघडताना दिसत आहे. 

Bigg Boss 14: जास्मिनला वाचवल्यामुळे एजाज-पवित्रामध्ये भांडणाची ठिणगी

ADVERTISEMENT

रुबिना- राहुलमध्ये उडाले खटके

अलीला गेल्या आठवड्यात कॅप्टन केल्यानंतर या आठवड्यात राहुलला कॅप्टन करण्याचा निर्णय अलीने घेतला होता. म्हणूनच अली आणि जास्मिनने राहुलला या खेळासाठी पाठिंबा देण्याचे ठरवले. त्यामुळे या दोघांच्या नात्यातही भांडण होताना दिसली. पहिल्या आठवड्यात अली- राहुलची मैत्री दिसून आली होती. त्यानुसार अली राहुलसाठी या कार्यक्रमात लढताना दिसला होता. या टास्कमध्ये बरीच भांडणं होताना दिसली. या टास्क दरम्यान अभिनव आणि रुबिना यांनी राहुलविरोधात अनेक भांडणं होताना दिसली होती. हा टास्क व्यवस्थित पूर्ण न केल्यामुळे राहुल- रुबिनाला कॅप्टनसीमधून बाहेर कढण्यात आले होते.

Bigg Boss 14: राहुल वैद्यने जान सानूवर केले नेपोटिझमचे आरोप

रुबिना अभिनवच्या खांद्यावर बंदु ठेवून करते वार

या खेळात अगदी पहिल्यापासून रुबिनाचे वागणे अनेकांना आवडले नाही. या घरात कपल म्हणून आत गेलेले रुबिना आणि अभिनव घरात कायमच एकत्र खेळताना दिसतात. घरात नेहमीच वेगळे नियम करताना दिसतात. त्यामुळे नेहमीच वीकेंड वॉरमध्येही अनेकदा रुबिना- अभिनवला सलमानने या बाबतीत अनेकदा टोमणे दिले आहेत. पण तरीही  त्यांच्यात काहीही बदल झालेला नाही. अभिनव हा या सगळ्या गोष्टींमुळे कधीही नॉमिनेट झाला नाही. तर रुबिना अगदी पहिल्या आठवड्यापासून नॉमिनेट झाली आहे. तिचा फॅनफॉलोविंग चांगला असल्यामुळे त्यांना पहिल्या आठवड्यापासून ती या सगळ्यामधून वाचत आहे. 

आता या घराचा नवा कॅप्टन कोण होणार हे गुरुवारी रात्री कळेल.

ADVERTISEMENT
19 Nov 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT