Bigg Boss 14 च्या घरातून या आठवडयात पवित्रा पुनिया बाहेर पडली आहे. कमी वोट्स मिळाल्यामुळे ती या खेळातून बाहेर पडली आहे. पण यंदाचा रविवार हा इतर रविवारपेक्षा फारच वेगळा होता. कारण घरातून एक सदस्य बाहेर पडली असली तरी या घरात तीन अशा व्यक्तींची एन्ट्री झाली आहे जे घरात नक्कीच नवा ड्राम घडवून आणणार आहे. सलमानने वीकेंड का वारमध्ये सांगितल्याप्रमाणे आता फिनालेचा हा प्रवास सुरु झाला असून आता घरात फक्त 4 फायलिस्टसाठीच जागा ठेवण्यात येणार आहे. आता या नव्या दाखल झालेल्या सदस्यांचे नेमके काम काय असेल आणि ते कशाप्रकारे घरात राहणार आहे हे नक्कीच पुढच्या आठवड्यात कळेल.
Bigg Boss 14 : अभिनव- रुबिनाच्या नात्यात जास्मिनमुळे तणाव
कमी वोट्समुळे पवित्रा आऊट
गेल्या आठवड्यात ओपन नॉमिनेशन झाले. या नॉमिनेशमध्ये राहुल, रुबिना, अभिनव, अली, जास्मिन, पवित्रा आणि एजाज नॉमिनेट झाले होते. कविता कौशिकने तिच्या कॅप्टनसीचा उपयोग करत एजाजला या प्रक्रियेतून वाचवले होते. त्यामुळे एजाज नॉमिनेशनमधून सुरक्षित झाला होता. त्यामुळे सहा जणांमध्ये हा सामना रंगला होता. राहुल- रुबिना- जास्मिनचा फॅन फॉलोविंग पाहता त्यांना वोटिंग जास्त मिळत होत्या. पण गेल्या काही दिवसांपासून गप्प झालेली पवित्रा घरात फार दिसत नव्हती. एजाज-पवित्राची ती केमिस्ट्रीही फार दिसली नाही. त्यामुळेच पवित्राला आणखी पाहण्याची इच्छा लोकांमध्येही कमी झाली असावी. त्यामुळेच पवित्राला फार कमी वोट मिळाले असावे. त्यामुळेच पवित्रा पुनिया या खेळातून बाहेर पडली आहे.
Bigg Boss 14 : कॅप्टनसी टास्कमध्ये जान- एजाजमध्ये आली कटुता
घरात आले नवे सदस्य
‘अब सीन पलटेगा’ म्हणत या सीझनची सुरुवात झाली होती. गौहर- हिना-सिद्धार्थ यांनी या सीझनची सुरुवात केली होती. साधारण दोन आठवडे राहिल्यानंतर ते या घरातून बाहेर पडले. पण आता बिग बॉसचा खेळ अधिक रोमांचक करण्यासाठी राखी सावंत, राहुल महाजन, आर्शी खान, काश्मिरा शाहा,मनु पंजाबी आले असून ते आता घरात ठेपाळलेल्या वातावरणाला थोडा चार्ज करण्याचे काम करणार आहे. राखी सावंत ही ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध आहे. आता या घरात आल्यानंतर ती नेमंक काय करणार ते पाहावे लागणार आहे.
पॅनलने केली पोलखोल
रविवारच्या खास शोमध्ये काही सेलिब्रिंटीचे पॅनल बोलावण्यात आले होते. काम्या पंजाबी, देबोलिना भटाचार्जी, संदीप आणि रोनित बिश्वास आले होते. यातील रोनित बिश्वास हा कविता कौशिकचा नवरा आहे. .तर इतर कलाकारांनी स्पर्धकांसोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांनी या काळात काय चुका केल्या आहेत ते देखील सांगितले.यावर खूप मोठी चर्चा रंगली होती. रुबिना- जास्मिनच्या मैत्रीचे किस्से सांगितले जात होते. पण त्यांच्या मैत्रीत फूट पडल्यापासून गेल्या काही दिवसापासून या घरात फक्त रुबिना आणि जास्मिन दिसत आहे. घरातील इतर सदस्यांना त्यामुळे फार दिसण्याची संधी मिळाली नाही. राहुल या खेळामध्ये अजूनही असला तरी अनेकांना या खेळात रुबिना दिलैकला चॅनल पॉलिसी म्हणून जिंकवले जाईल अशी चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे याची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे.
पवित्रा पुनिया घरातून बाहेर पडली असेल तर या घरातून या आणखी काही लोक एविक्टेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हा खेळ कसा बदलेल ते पाहणे फार महत्वाचे असणार आहे.
Bigg Boss 14: कविता कौशिकचा सलमानवर गंभीर आरोप, सोडायचा आहे शो