ADVERTISEMENT
home / बिग बॉस
bigg boss 15

Bigg Boss 15: शमिता शेट्टीला मिळतोय का अधिक फायदा, इतर स्पर्धकांवर होतोय अन्याय

बिग बॉस 15 (Bigg Boss 15) पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. पण त्यातही सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री शमिता शेट्टीची (Shamita Shetty) घेण्यात येणाऱ्या विशेष काळजीची. इतर स्पर्धकांवर यामुळे अन्याय होत आहे असा सूर आता नेटकऱ्यांमध्ये आणि बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच शमिताचा भाऊ राजीव अदातिया (Rajeev Adatia) वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून घरात आला होता. त्यानंतरही शमिता घरात अजिबातच आनंदी दिसत नव्हती. तर आता राकेश बापट (Raqesh Bapat) जो शमिताची लव्ह लाईफ म्हणून Bigg Boss OTT नंतर ओळखला जात आहे त्याची आणि शमिताची सर्वात जवळची मैत्रीण नेहा भसिन (Neha Bhasin) यांची आता एंट्री झाल्यामुळे बिग बॉस चालू आहे की, शमिताची विशेष काळजी घेणं चालू आहे असंच आता म्हटलं जात आहे. 

अधिक वाचा – अमिताभ बच्चन यांना बॉलीवूडमध्ये पूर्ण झाली 52 वर्ष, शेअर केल्या जुन्या आठवणी

इतर स्पर्धकांचे चाहते नाराज

शमिता शेट्टी ही याआधीही बिग बॉसमध्ये आली होती. त्यानंतर ओटीटीमध्येही आली. तर आता या सीझनमध्येही शमिता गेम जरी चांगला खेळत असली तरीही तिच्यावर इतकी मेहरबानी नक्की का करण्यात येत आहे असंही आता म्हटलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा अधिक आहे. शमितापेक्षा निशांत, करण, तेजस्वी, जय आणि प्रतीक हे अप्रतिम खेळत असूनही त्यांना कोणतीही वेगळी वागणूक देण्यात येत नाहीये. मग शमितासाठी इतके स्पर्धक वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून का घेण्यात आले. याचा तिच्या खेळासाठी फायदा अधिक होणार आहे. त्यामुळे इतर स्पर्धकांचे चाहते मात्र नाराज झालेले दिसून येत आहे. तसंच आता अनेक जण खुलेआम याबाबत सोशल मीडियावर आपले मतही व्यक्त करताना दिसून येत आहेत. आपल्या माणसांपासून दूर राहून नवी नाती बनवून आपल्या बुद्धीच्या बळावर पुढे जाण्याचा बिग बॉस हा खेळ आहे. असे असताना घरात शमिताच्या पाठिंब्यासाठी तिची चार जवळची माणसं असणं हे चुकीचं आहे असंच आता सगळ्यांना वाटत आहे. त्यामुळे तिला मानसिक आधार अधिक मिळत असून इतरांवर मात्र हा अन्याय होत असल्याचं सगळ्यांनाच वाटत आहे. त्यामुळे शमिताला नक्की ही खास ट्रीटमेंट कशासाठी दिली जात आहे असाही संताप आता सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहे. 

अधिक वाचा – “रावरंभा” च्या निमित्ताने गिरीश कुलकर्णी, ओम भूतकर पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात एकत्र

ADVERTISEMENT

राकेश, नेहा, विशाल आणि राजीव यांचा सपोर्ट

शमिताने घरात आल्यावर विशालबरोबर बहिणीचे नाते निर्माण केले. तर राकेशवर तिचे प्रेम असून नेहा तिची घट्ट मैत्रीण आहे आणि राजीव हा तिचा भाऊ आहे. त्यामुळे सर्वाधिक मानसिक आधार तिला मिळत असल्याचे स्पष्ट मत मांडण्यात येत आहे. तिच्यासाठी हे जरी योग्य असले तरीही इतर स्पर्धकांवर मात्र हा अन्याय होत आहे असंच आता म्हटलं जात आहे. शमिताला खूपच #favouritism मिळत आहे असं सर्वांनाच वाटत आहे. त्यामुळे आता पुढे हा खेळ कसा आणि कुठे वळणार? तसंच राकेश आणि नेहाच्या येण्याने शमिताला पाठिंबा मिळणार की, तिचा खेळ खराब होणार हे पाहण्यासही आता तिचे चाहते उत्सुक आहेत. शमिता इतके दिवस राकेशच्या आठवणीने हळवी होत असल्याने आता तिला आनंदी बघून तिचे चाहते मात्र आनंदी झाले आहेत.  

अधिक वाचा – Bigg Boss Marathi : तृप्ती देसाई पडल्या घराबाहेर, जय सुरक्षित

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

08 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT