ADVERTISEMENT
home / Uncategorized
तृप्ती देसाई घराबाहेर

Bigg Boss Marathi: तृप्ती देसाई पडल्या घराबाहेर, जय सुरक्षित

 Bigg Boss Marathiच्या घरात झटका बसावा असे इलिमिनेशन झाले आहे. या खेळातून दिवाळीच्या आठवड्यात तृप्ती देसाई बाहेर पडल्या आहेत. उत्तम खेळाडू आणि उत्तम व्यक्ती अशी ओळख झालेल्या तृप्ती देसाई घराबाहेर पडल्यामुळे सगळ्यांनाच खूप आश्चर्याचा धक्का बसला आहे. तृप्ती देसाई बाहेर पडल्या असल्या तरी त्यांच्यामुळे जय दुधाणे हा सेफ झाला आहे. उत्कर्षने नॉमिनेशनमध्ये सगळा गेम फिरवल्यामुळे जय आणि तृप्ती देसाई या नॉमिनेशनमध्ये आला होता. या नॉमिनेशनमुळे तृप्ती देसाई यांना फटका बसेल याचा अंदाज अनेकांना आला होता. त्यांचा या घरातून प्रवास संपल्यामुळे खूप जणांना वाईट वाटले आहे.

तृप्ती झाला इलिमिनेट

तृप्ती देसाई यांनी घरात एंट्री केल्यापासून त्या प्रत्यक्ष आयुष्यापेक्षा फारच वेगळ्या आहेत हे अनेकांना कळले होते. त्यांचा घरातील वावर हा फार वेगळा आणि समंजस असा होता.त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी लोकांची मनं जिंकून घेतली होती. गेल्या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये दोन चांगल्या खेळाडूंना उत्कर्षने नॉमिनेट केले होते. याचा फटका या इलिमिनेशनमध्ये तृप्ती देसाई यांना बसला आहे. या आठवड्यात तृप्ती देसाई कमी वोट्समुळे नॉमिनेट झाल्य आहेत. याचा फायदा जयला झाला असून जय या आठवड्यासाठी सेफ झालेला आहे.

तृप्ती देसाईंची बददली इमेज

एरव्ही आंदोलन आणि राडा घालणाऱ्या तृप्ती देसाई या शोमधून फारच वेगळ्या दिसून आल्या. आंदोलन आणि त्यांचा स्वभाव हा फारच वेगळा होता. तो या शो दरम्यान दिसून आला. खेळताना अत्यंन कसोशीने खेळणाऱ्या तृप्ती ताई पुढेपर्यंत जातील असा अंदाज सगळ्यांना होता. पण घरात 50 दिवस घालवल्यानंतर त्यांचा प्रवास अखेर या रविवारी संपला आहे. तृप्ती ताईंचा प्रत्यक्ष स्वभाव पाहिल्यानंतर या खेळात त्यांची गरज होती असे अनेकांना वाटले आहे. पण या पुढे तृप्ती ताई या बलात्कारमुक्त देशासाठी खास कामगिरी करणार आहे. त्यांनी बाहेर आल्यानंतर महेश मांजरेकर यांच्यासमोर आपली इच्छा व्यक्त करुन दाखवली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकारणात त्या सक्रिय दिसणार आहेत यात काहीही शंका नाही.

दिवाळी झाली दणक्यात साजरी

 बिग बॉसच्या घरात दिवाळी खूप दिमाखात साजरी झाली आहे. दिवाळीच्या या खास प्रसंगी स्पर्धकांच्या घरातून त्यांच्यासाठी काही खास गिफ्ट्स आले होते. प्रत्येकाला घरातून काही ना काही खास आले. पण मीरासाठी हा दिवस फारच खास होता. मीराच्या बहिणीला आणि भावाला मुलगी झाल्यामुळे तिला बोनस मिळाला. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यामुळे मीरासाठी ही दिवाळी एकदम खास होती. घरात प्रत्येकालाच काहीना काही आल्यामुळे ही दिवाळी सगळ्यांना लक्षात राहील अशी होती. 

ADVERTISEMENT

आता या आठवड्यात पुन्हा घराची समीकरणं कशी बदलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

अधिक वाचा

अभिनेत्री पूजा बॅनर्जीने चाहत्यांना दिली गोड बातमी, मार्चमध्ये देणार बाळाला जन्म

Bigg Boss Marathi: गायत्री-मीराचे उघडले डोळे, जय-उत्कर्षवर झाले नाराज

ADVERTISEMENT

अंकिता लोखंडेच्या घरी लगीनघाई, या तारखेपासून सुरू होणार लग्नाचे विधी

08 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT