बिग बॉसने आतापर्यंत अनेकांना प्रसिद्धी दिली आहे. अनेकांची करिअर त्यानंतर घडली आहेत आणि बिघडलीसुद्धा आहेत. याच बिग बॉसचा भाग असलेला डिंपी गांगुली तुम्हाला आठवते का? हो ही तीच डिंपी गांगुली जी शर्मिला टागोरसारखी दिसायला होती. आता तुम्हाला ती नक्कीच आठवली असेल अशी अपेक्षा आहे. इतक्या दिवसांनी डिंपीची आठवण काढण्याचे कारण इतकेच की, डिंपी पुन्हा एकदा आई होणार आहे. तिने तिचा एक गोड फोटो शेअर केला आहे. त्यामुळेच ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.
हिना पांचाळचा गोव्यामध्ये हॉट ‘हिप्स डोन्ट लाय’ डान्स
डिंपीने शेअर केला गोड फोटो
सध्या या क्षेत्रापासून डिंपी बरीच लांब आहे. तिला एक मुलगी आहे. ती तिच्या कुटुंबासोबतचे तिचे फोटो नेहमी शेअर करत असते. पण तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोने आमचे लक्ष वेधून घेतले. तिने तिच्या बेबी बंपचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने छान लांब गाऊन घातला आहे. तिने तिचा हा फोटो शेअर करत पुन्हा आई होण्याचा व्यक्त केला आहे. तिच्यासोबत तिची मुलगीदेखील या पोस्टमध्ये दिसत आहे.
पहिले लग्न त्रासदायक
डिंपी गांगुली प्रसिद्धीत यायचे आणखी एक कारण म्हणजे तिचे लग्न. राहुल महाजनच्या स्वयंवरमध्ये तिने भाग घेतला होता. या रिअॅलिटी शोमध्ये तिने राहुलचे मन जिंकून घेतले. त्यांनी त्यानंतर लग्नसुद्धा केले. 2010 साली त्यांनी लग्न केले. त्यांचा संसार पहिल्या काही काळात चांगला सुरु होता. पण राहुलचा विक्षिप्तपणा लवकरच बाहेर आला. त्याने काहीच वर्षांनंतर डिंपीला मारहाण करायला सुरुवात केली. 2015मध्ये ती त्याच्यापासून वेगळी झाली. पण त्या आधी तिने राहुलविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्याने तिला जबर मारहाण केलेल्या खुणा त्यावेळी तिने मीडियालासुद्धा दाखवल्या होत्या. क्षुल्लक फोन वाजतोय या कारणावरुन त्याने तिला मारहाण केली होती. पहाटे 3.30 वाजता हा सगळा प्रकार घडला होता. त्यानंतर डिंपीने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला
VIRALVIDEOS: तुम्ही पाहिलेत का हे व्हिडिओ
डिंपीने केलं दुसरं लग्न
राहुल महाजनपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याचवर्षी डिंपीने रोहित रॉय नावाच्या एका बिझनेसमनसोबत लग्न केले आणि ती दुबईला निघून गेली त्यानंतर तिने या जगाशी सगळा संपर्क सोडून टाकला. डिंपी इन्स्टाग्रामवर कायम अपडेट असते. पण तिचे फोटो मॉडेलिंगचे नाही तर आता फॅमिलीचे असतात. ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर झाल्यानंतर आता डिंपीचे आयुष्य अगदी सुरळीत सुरु आहे असे म्हणायला हवे कारण तिच्या फोटोवरुन ती आनंदात आहे हेच दिसत आहे. आता तिच्याकडे पुन्हा गुड न्यूज आहे म्हटल्यावर तिच्यावर आमची नजर कायम राहणार आहे.
डिंपी ही कोलकातामधील मॉडेल असून तिने अनेक ठिकाणी मॉडेलिंगची कामे केली आहेत. ये रिश्ता क्या कहलाता है, तुज संग प्रीत लगाई सजना आणि बिग बॉस 8 मध्ये तिने सहभाग घेतला होता. राहुल दुल्हनिया ले जायेगा यामधून तिला अधिक फेम मिळाले. राहुल महाजन म्हणजेच दिवगंत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा. पेशाने पायलट असलेला राहुल प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर प्रकाशझोतात आला. त्याच्या अनेक सवयी त्यानंतर समोर आल्या. त्याने या आधी श्वेता सिंह नावाच्या को पायलट सोबत विवाह केला होता. पण ते फार काळ नातं टिकू शकलं नाही. डिंपीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर 2018 साली राहुलने लग्न केलं. पण जे झालं ते चांगल्यासाठी झालं कारण आता डिंपी तिच्या आयुष्यात फारच खुश आहे आणि काही अंशी राहुलसुद्धा
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.