ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सोनाली पाटील होतेय दिवसेंदिवस हिट

बिग बॉस फेम सोनाली पाटील होतेय दिवसेंदिवस हिट

 बिग बॉस मराठी सीझन 3 संपला आहे. पण यातील काही स्पर्धकांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. असाच एक चेहरा म्हणजे अभिनेत्री सोनाली पाटील. या रिॲलिटी शोचा तिला चांगलाच फायदा झाला आहे. सोनालीला अनेक मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहिले आहे. पण आता तिला या घरात इतके दिवस पाहिल्यानंतर आता तिचा फॅनफॉलोविंग चांगलाच वाढला आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर सोनाली तिच्या सोशल्सवर चांगलीच ॲक्टिव्ह दिसत आहे. तिचे अनेक व्हिडिओ सध्या खूपच जास्त हिट होताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi: माऊली… विशाल निकम झाला सीझनचा विजेता

इन्स्टावर करते मस्त रिल्स

सोशल मीडियावर सोनाली पाटील चांगलीच ॲक्टिव्ह असते. तिला नृत्य खूपच आवडते हे तिच्या काही रिल्समध्ये नक्कीच दिसून आले आहे. तिने ग्रँड फिनालेसाठी देखील डान्स प्रॅक्टिस केली होती. त्या दरम्यानचे तिचे काही व्हिडिओज तिने पोस्ट केले होते.  या व्हिडिओमध्ये ती अप्रतिम असा नृत्य करताना दिसत आहे. जो अनेकांना आवडलेला देखील दिसत आहे. त्यामुळेच की काय तिच्या फॉलोवर्सची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तिचे व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही देखील ते पाहायला हवेत.

बिग बॉसमध्ये मिळाली नाही संधी

बिग बॉसमध्ये सोनाली हिने मतांमुळे जास्तीत जास्त काळ घरात घालवला. अनेकांना तिने घरात फार काही केले नाही असे वाटले. ती या घरात इतके काळ कशी टिकली असा प्रश्नही अनेकांना पडला होता. पण तरीही या खेळात ती तिच्या फॅन्समुळे टिकून राहिली. घऱात असताना तिचा हळवेपणा,अस्सल कोल्हापुरी रांगडेपणा दिसून आला होता. तिला टास्क खेळण्याची तितकी संधी मिळाली नाही. पण तिचा जितकी संधी मिळाली तिचा तिने फायदा नक्कीच केला. काही टास्क तिने असे काही केले की, त्यामुळे ती अनेकांच्या चांगलीच लक्षात राहिली. काहींना तिला चांगले खेळायला मिळाले नाही असे देखील वाटले. त्यामुळे ती घरातून बाहेर पडल्यावर खूप जणांना धक्का देखील बसला.

ADVERTISEMENT

या मालिकेत केले काम

सोनाली पाटील हिने या आधी मालिकेतून कामं केली आहेत.  देवमाणूस या मालिकेत तिने साकारलेली वकिलाची भूमिका ही अनेकांच्या लक्षात होती. पण ती बिग बॉसच्या घरात आल्यानंतर हीच का ती अभिनेत्री अशी शंका निर्माण झाली होती. पण ही तीच अभिनेत्री हे नक्कीच आतापर्यंत सगळ्यांना कळले असेल. देवमाणूसच नाही तर इतर ही काही मालिकांमधून सोनालीने कामं केली आहेत. ‘जुळता जुळतयं की’, ‘घाडगे अँड सन्स’ अशा मालिकांमधून तिने लक्षवेधी अशा भूमिका साकारल्या आहेत. ज्या अनेकांच्या लक्षात राहिल्या आहेत. आता या नव्या रिॲलिटी शो नंतर तिच्या फॅन्समध्ये वाढ झाली आहे.

सोनालीला तुम्ही बिग बॉसच्या घरात पाहिले असेल तर तिच्यात झालेल बदल तुम्ही नक्कीच टिपले असतील. तिच्या फॅन्सना आता नव्या काही रोल्समध्ये पाहण्याची इच्छा आहे.

वन फोर थ्री’ चित्रपटातील खलनायक अनंता देतोय साऊथच्या खलनायकांना टशन

29 Dec 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT