ADVERTISEMENT
home / मनोरंजन
143 movie

‘वन फोर थ्री’ चित्रपटातील खलनायक अनंता देतोय साऊथच्या खलनायकांना टशन

अभिनेता वृषभ शहा (Vrushabh Shah) ‘वन फोर थ्री’ (One Four Three) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. नुकताच त्याचा या चित्रपटातील जबरा लूक समोर आला आहे. वृषभ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर भेटीस आले असून या पोस्टरमध्ये वृषभचा चित्रपटातील लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेता पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी सध्या वृषभही खूपच उत्सुक आहे. 

अधिक वाचा – अखेर अफवांना पूर्णविराम, सुश्मिता आणि रोहमनचं ब्रेकअप

या भूमिकेसाठी केली विशेष मेहनत 

या चित्रपटात वृषभची असलेली भूमिका पोस्टर पाहूनच कळत आहे. वृषभचा पोस्टरवरील फोटोतील आक्रोश पाहता त्याने चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचा थोडासा अंदाज बांधता येत आहे. ‘वन फोर थ्री’ चित्रपटात वृषभ अनंता नावाची भूमिका साकारत आहे.  राग, द्वेष आणि क्रूरता हे भाव वृषभच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असून त्याचा या चित्रपटात दाखवण्यात आलेला खुनशी स्वभाव नक्कीच चित्रपटातील भूमिकेला साजेसा असेल यांत वादच नाही. त्याच्या या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली असून त्याने 10 किलो वजन कमी केले (weight loss) आहे. शिवाय त्याने या भूमिकेसाठी स्वतःच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिले आहे. स्वभावाने अजाण असलेल्या वृषभकडून खलनायकाची भूमिका करून घेताना दिग्दर्शक योगेश भोसले यांची उडालेली तारांबळ आणि त्यांची मेहनत लवकरच चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  वृषभने या चित्रपटातील भूमिकेसाठी अत्यंत मेहनत केली असल्याचेही त्याच्या पूर्ण फोटोकडे पाहून लक्षात येत आहे. तसंच यामध्ये त्याचा लुक हा दाक्षिणात्य खलनायकाप्रमाणे असल्याचेही दिसत आहे. दाक्षिणात्य चित्रपटाची धाटणी असलेल्या या चित्रपटातील वृषभचा लुक हा तंतोतंत दाक्षिणात्य दिसत आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपली आवड जोपासत वृषभ अभिनय क्षेत्रात उतरला आहे. 

अधिक वाचा – वादग्रस्त राखी सावंतच्या पतीने केले पूर्व पत्नीवर गंभीर आरोप

ADVERTISEMENT

प्रेम व्यक्त करणारा चित्रपट 

‘शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’निर्मित आणि विरकुमार शहा निर्मित ‘वन फोर थ्री’ हा प्रेममय भावना व्यक्त करणारा आणि खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.  दाक्षिणात्य धाटणीच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक योगेश भोसले यांनी केले असून या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून दोन बाजू सांभाळल्या आहेत. याशिवाय अभिनेत्री शीतल अहिरराव देखील वृषभसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वृषभचा हा जबरदस्त लुक पाहता त्याची नेमकी चित्रपटात भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. करेन तर मामाचीच असे म्हणत अनंता प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, आणि अनंताला मामाचीच का करायची आहे हे पाहण्यासाठी आपल्याला चित्रपटगृहात जावेच लागेल. मात्र या चित्रपटातील त्याच्या लुकला चाहत्यांची पसंती मिळत असल्याचे सोशल मीडियावरही दिसून येत आहे. कोरोनानंतर अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. आता या चित्रपटाबद्दलही उत्सुकता ताणून धरली गेली आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आणि यातील कलाकारांचे काम कसे असेल याबाबतही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर अन्य मराठी चित्रपटांप्रमाणे या चित्रपटासाठीही हाऊसफुल्लचे बोर्ड लागतील अशी अपेक्षा नक्कीच कलाकार आणि निर्मात्यांना असेल. 

अधिक वाचा – हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक दुसऱ्यांदा होणार आईबाबा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

28 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT