ADVERTISEMENT
home / बिग बॉस
आविष्कार पडला घराबाहेर

Bigg Boss Marathi: आविष्कार दारव्हेकर बाहेर,टीम बदलणे पडले महागात

Bigg Boss Marathi च्या घरात आणखी एक एविक्शन झाले आहे. यावेळी आविष्कार दारव्हेकर कमी वोट्समुळे घराबाहेर पडला आहे.अगदी पहिल्यापासूनच तो या खेळात दिसला नव्हता. पण आता कुठे तो खेळायला लागला होता. इतक्यातच तो या खेळातून बाहेर पडला होता. आविष्कार गेला याचा धक्का घरातल्यांना बसला असला तरी देखील प्रेक्षकांना तो वाटला नाही. कारण पहिल्या दिवसापासून आविष्कारचा खेळ दिसला नव्हता.रटाळ झालेल्या या स्पर्धकाला प्रेक्षकांनी वोट्स न देता बाहेर काढले आहे. तर या घरात आता नव्या स्पर्धकाची एंट्री झाली आहे. नीता शेट्टी असे या स्पर्धकाचे नाव असून ती या घरात धुमाकूळ घालेल असे दिसत आहे.

आविष्कारने बदलला होता ग्रुप

आविष्कार दारव्हेकर पहिल्या आठवड्यात अजिबात दिसला नव्हता. त्यामुळे त्याला पहिल्या आठवड्यापासून त्याचा खेळ दिसला नव्हता. आधी विकास- विशालच्या ग्रुपमध्ये खेळणारा आविष्कार शेवटच्या काही दिवसांपासून जय आणि उत्कर्षसोबत खेळत होता. पण त्याने केलेला हा बदल खूप जणांना नेमका पटलेला दिसत नाही. त्यामुळेच की काय अविष्कारला त्याचे नुकसान झाले. खेळात असताना कोणालाही आपली तत्व सोडलेली आवडत नाही. अचानक मित्रांना सोडून आपली संधी साधणे हे खूप जणांना आवडत नाही. त्याचाच हा परिणाम आविष्कार घराबाहेर पडण्यामध्ये झालेले आहे.

नीता शेट्टीची झाली एंट्री

घरातून आविष्कार दारव्हेकर बाहेर पडला असला तरी देखील या घरात एका वाईल्‍ड कार्ड एंट्री झाली आहे. अभिनेत्री नीता शेट्टी हिची या घरात एंट्री झाली आहे. रविवारी झालेल्या एपिसोडमध्ये त्याची एंट्री झाली असून ती येण्याआधीच अनेकांनी तिच्यावर टीका कराया सुरुवात केली आहे. नीता शेट्टी हिने अनेक मालिका आणि चित्रपटांमधून काम केले आहे. सीआयडी या मालिकेत तिचा रोल चांगला गाजला होता. याशिवाय तिने मराठी चित्रपटामधूनही काम केले आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीशी तिचा तसा संबंध आहे. पण तरी देखील तिच्या मराठीवरुन अनेकांना शंकाच आहे. पण या घरातील आवडता ग्रुप म्हणजे विकास, विशाल, मीनल आणि सोनाली यापैकी विकास- मीनल त्याच्या आवडीचे आहेत असे तिने सांगितले आहे. आता घरात एंट्री केल्यानंतर ती नेमकी काय करणार आणि कशी खेळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हसत केली कानउघडणी

पहिले काही दिवस महेश मांजरेकर यांनी घरातील सगळ्यांची शाळा घेतली होती. पण काही स्पर्धकांमध्ये काहीही सुधारणा न झाल्यामुळे यावेळी त्यांनी चावडीमध्ये कान उघडणी करताना एक वेगळाच फंडा वापरला. आठवड्यात झालेल्या टास्कमध्ये जे काही राडे झाले त्यावर त्यांनी जय, उत्कर्ष, मीरा यांची कान उघडणी केली आहे. इतकेच नाही तर यावेळी विकास आणि विशाल यांनाही टास्कदरम्यान झालेल्या चुका दाखवल्या आहेत. त्यामुळे यावेळची चावडी ही एकूणच सगळ्यांना शिकवणारी होती. 

ADVERTISEMENT

आता नवा स्पर्धक या घरात आल्यानंतर पुन्हा एकदा घरात काही वेगळं होईल का?या घरात भांडणं वाढतील की कमी होतील हे सगळे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अधिक वाचा

Bigg Boss Marathi: कॅप्टन्सीमुळे बदलणार का समीकरणं

अंकिता लोखंडेच्या घरी लगीनघाई, या तारखेपासून सुरू होणार लग्नाचे विधी

ADVERTISEMENT

आलिया भटच्या बॉलीवूड डेब्यूसाठी या गोष्टीचा केला त्याग, सोनी राजदान यांचा खुलासा

01 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT