ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
सणासुदीसाठी असे करा क्विक फेशिअल

सणासुदीला ग्लो आणेल घरगुती फेशिअलचा हा प्रकार

 साधारण ऑक्टोबर महिना सुरु झाला की, सणांची रांग लागते.  दिवाळी, लग्नकार्य सुरु होतात. या काळात एवढी गडबड असते की पार्लर किंवा स्किन क्लिनिकमध्ये जाऊन ट्रिटमेंट खूप जणांना घेणे शक्य होत नाही. घरी आणून फेशिअल करण्याचा विचार खूप जणांचा असतो. पण फेशिअलसाठी लागणारा किटही बरेचदा आणता येत नाही. आता तुम्हाला वाटेल फेशिअल कसे करावे असे म्हणताना जर सामान नसेल तर घरातच कसे फेशिअल करता येईल? तर घरात असलेल्या काही सामानांमधूनच तुम्हाला हे फेशिअल करायचे आहे. हे अत्यंत ऑरगॅनिक असे फेशिअल आहे ज्यामुळे तुमची त्वचा राहील सुंदर आणि मिळेल ग्लो

तांदुळाचे स्क्रब

Rice Scrub

 सगळ्यांच्याच घरी तांदूळ असतात. तुमच्याकडे असलेले कोणतेही तांदूळ घेऊन ते मूठभर भिजत घाला. ते चांगले दोन तास भिजले की, त्याचे पाणी न काढता ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता जे खरखरीत स्क्रब तयार होईल त्याचा उपयोग तुम्हाला चेहऱ्याला स्क्रब करण्यासाठी करता येईल. या स्क्रबमध्ये पाणी जास्त जाता कामा नये. हाताने एखाद्या स्क्रबप्रमाणे तो उचलता यायला हवा. शिवाय तांदूळाचे दाणे हे बोचणार नाही याकडेही लक्ष द्यायला हवे. चेहऱ्याची त्वचा ही अत्यंत नाजूक असते. त्यामुळे हलक्या हाताने हे स्क्रब करा. तांदूळाचे स्क्रब त्वचेवरील काळे डाग, सनटॅन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे चेहरा धुतल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही स्क्रब करुन घ्या

चेहऱ्यावर घ्या वाफ

चेहरा स्क्रब करुन झाल्यानंतर गरम पाण्याची वाफ घ्यायची आहे. स्क्रब केल्यामुळे त्वचेवरील पोअर्स उघडण्यास मदत मिळते. त्यावर वाफ घेतली तर ब्लॅक हेड्स निघण्यास मदत मिळते. त्यामुळे साधारण 2 मिनिटांसाठी वाफ घ्या. त्यानंतर चेहऱ्यावरुन ब्लॅकहेड्स रगडून काढा. नखांचा उपयोग करुन काढू नका. शक्य असेल तर टर्किश टॉवेल घेऊन त्याने त्वचा रगडा त्यामुळेही तुम्हाला त्चचेवरील व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स निघण्यास मदत मिळेल.

मसाज क्रिम

मसाज क्रिमही तुम्हाला घरुन आणायची गरज नाही. घऱी असलेले बदाम भिजत घाला. बदाम चांगले भिजले की, त्याची सालं काढून टाका.त्यानंतर हे बदाम चांगले वाटून घ्या. एका स्ट्रेनरमधून ते चांगले गाळून घ्या. बदामाचे तुकडे किंवा कण त्यामध्ये राहायला नको. गाळून किंवा स्ट्रेनरमधून काढलेली जाड क्रिम त्यामध्ये ॲलोवेरा जेल घालून एकजीव करुन घ्या. आता तयार क्रिम थोडीशी घेऊन ती क्रिम मसाजसाठी वापरा. हे करताना पाणी लावण्याची काहीही गरज नाही. बदामाचे आवश्यक घटक आणि ॲलोवेराचा अर्क त्वचेला मिळाल्यामुळे त्वचा मॉश्चराईज राहते

ADVERTISEMENT

फेसपॅक

beetroot powder

आता तुम्हाला फेसपॅक लावायचा असेल तर तो देखील ऑरगॅनिक असायला हवा. फेसपॅक निवडताना तुम्हाला घरी असलेली कोणतीही ऑरगॅनिक पावडर निवडली तरी चालेल. हे शक्य नसेल तर तुम्ही बाजारातून बीट पावडर आणि रोझ पावडर घ्या. ती एकत्र करुन हा पॅक चेहऱ्याला लावा. चेहऱ्याला नैसर्गिक पद्धतीने लाली मिळण्यास त्यामुळे नक्कीच मदत मिळेल. 

आता सणासुदीला ग्लो हवा असेल तर नक्कीच अशा पद्धतीने फेशिअल करा.

अधिक वाचा

कोरड्या त्वचेसाठी वापरा घरातील साहित्य आणि बनवा सोपे मास्क

ADVERTISEMENT

फ्रुट क्युबस बनवा आणि मिळवा सुंदर त्वचा

घरीच सोप्या पद्धतीने बनवा आय शीटमास्क आणि वाचवा पैसे

28 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT