ADVERTISEMENT
home / बिग बॉस
विकास-विशालची जोडी

Bigg Boss Marathi : ही जोडी तुटायची नाय…. विशाल-विकासची मैत्री सगळ्यांना आवडणारी

 Bigg Boss Marathi च्या घरातील स्पर्धकांचे रंग आता समोर येऊ लागले आहेत. मालिका आणि खऱ्या आयुष्यात ते कसे आहेत ते आता कळू लागले आहे. घरातील दुसरा आठवडा हा चांगलाच रंगला. ‘जोडी की बेडी’ या टास्कमधून घरातील ग्रुपिझमचा अंदाज आता येऊ लागला आहे. एकमेकांवर कुरघोडी करताना काहींनी आपल्या इमेजला चांगलाच धक्का दिला आहे. तर काहींनी मात्र लोकांची मन जिंकली आहेत. या घरात काही जणांची घनिष्ठ मैत्री दिसून आली आहे ती म्हणजे विशाल निकम आणि विकास पाटील याची. पूर्वाश्रमीची कोणतीही ओळख नसताना टास्क खेळताना एकमेकांना सांभाळून घेणे आणि आपल्या टीमच्या पाठीशी उभे राहण्याची यांची ही वागणूक खूप जणांना भावली आहे. म्हणूनच ही जोडी तुटायची नाय…. अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

विकास- विशालचा फेअर गेम

आठवड्याच्या शेवटी महेश मांजरेकर चावडी घेऊन येतात. यामध्ये अनेकांची शाळा घेतात. तर चांगले वागणाऱ्याचे कौतुकही करतात. गेल्या आठवड्यात घेतलेल्या टास्कमध्ये  ग्रुपमधून खेळताना शक्ती आणि युक्ती अशी जोडी असलेले विशाल- विकास अधिक ताकदीचे दिसून आले. खेळताना कोणत्याही वाईट गोष्टी न करता त्यांनी खेळाला न्याय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला असे कौतुक महेश मांजरेकर यांनी देखील केले. टीममध्ये कमी लोकं असतानाही कोणतीही चिडचिड न करता दुसऱ्या टीमसोबत खेळल्यामुळे फॅन्सची प्रतिक्रियाही अशीच काहीशी आहे. हल्लाबोल टास्कमध्ये बाईक वर बसल्यानंतर त्यावरुन उठवण्यासाठी टीम ए म्हणजेच उत्कर्षच्या टीमने एकही संधी सोडली नाही. पण या दोघांनी एकमेकांना सांभाळून घेतले आणि ते बसून राहिले.

वुमन कार्डवर बरसले मांजरेकर

महिलांना धक्काबुक्की केली किंवा महिलांना चुकीचा स्पर्श केला, महिलांवर हल्ला केला असे सांगून वुमन कार्ड खेळतात. घरात बरेचवेळा असे काही प्रसंग घडले आहेत. याची सुरुवात घरात मीराने केली. उत्कर्षचा कॅप्टन्सी टास्क सुरु असताना तिने उत्कर्षचा पाय खेचला. उत्कर्षने तिचा हात पकडून धरल्यानंतर तिने खेळणार नाही असे सांगितले. तर दुसऱ्यावेळी विकाससोबत हे घडले. स्टोअररुममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना स्नेहाने त्याची वाट अडवली. त्याने अनेकदा विनवण्या करुनही ती हलली नाही म्हटल्यावर त्याने तिला थोडा धक्का दिल्यावर तिने महिलांचा विषय काढत विकासला टार्गेट केले. त्यामुळे याचा सगळ्यात जास्त फायदा या आठवड्यात विकासला झाला आहे. 

Biggboss Marathi 3: विकासला पाहून होते का राहुल वैद्यची आठवण

ADVERTISEMENT

सुरेखा आणि आविष्कारची कानउघडणी

सुरेखा कुडची यांचा या खेळातील सहभाग हा फारच कमी दिसून आला आहे. घरात त्यांचा वावर फारसा दिसत नाही.शिवाय खेळात उत्कर्षच्या गटाकडून अधिक खेळताना सुरेखा कुडची दिसल्यामुळे त्यांची कानउघडणी करण्यतात आली. टास्क करताना त्यांनी त्यांच्या ग्रुपला सपोर्ट न केल्यामुळेच विकास आणि विशालच्या टीमला फटका बसला त्यामुळेच त्यांची कानउघडणी करण्यात आली. तर दुसरीकडे आविष्कार दारव्हेकर या खेळात असूनसुद्धा तो या खेळाचा भाग नसल्याचे दिसत आहे. कारण तो या खेळात म्हणावा तसा उतरलेला नाही. 

 शिवलिला पाटील बाहेर

शिवलिला पाटील या खेळातून बाहेर पडली आहे.प्रकृती अस्वस्थामुळे तिला आधी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तरीही तिची प्रकृतीत सुधारत नसल्यामुळे तिने हा खेळ सोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या खेळातून आता शिवलिला पाटील बाहेर पडली आहे. 

पण सध्या घरात उत्कर्ष- जय आणि विकास-विशालची दोस्ती दिसून आली आहे. पण सगळ्यांना विशाल-विकासची दोस्ती दिसून आली आहे.

Bigg Boss 15 : जंगलमध्ये टिकू शकतील का हे नवे स्पर्धक, असा रंगला ग्रँड प्रिमिअर

ADVERTISEMENT
05 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT