ज्यांना साडी नेसायला आवडते त्यांच्याकडे कित्येक प्रकारचे ब्लाऊज असतात. पण ज्या महिला किंवा मुली साडी हा प्रकार फारच कमी वेळा किंवा नेसतच नाही.अशांना मात्र काही खास कार्यक्रमासाठी साडी नेसताना अगदी ब्लाऊजपासून तयारी करावी लागते. साडी आपण कोणाचीही नेसू शकतो. पण त्यावर ब्लाऊज कोणाचाही घालून चालत नाही. अशावेळी तुम्हीच काही ब्लाऊज शिवून किंवा विकत घेतले तर ते तुम्हाला आलटून पालटून कोणत्याही साडीवर नेसता येतात.आज आपण असेच काही ब्लाऊजचे रंग किंवा पॅटर्न जाणून घेणार आहोत जे तुमच्या कपाटात असायलाच हवेत. चला जाणून घेऊया असे काही ब्लाऊजचे पॅटर्न
ट्रेंडी ब्लाऊज वापरून साडीला द्या क्लासी लुक
खणाचा ब्लाऊज
अगदी कोणत्याही पारंपरिक साडीवर उठून दिसणारा ब्लाऊजचा प्रकार म्हणजे खणाचा ब्लाऊज. हे ब्लाऊज दिसायला फारच सुंदर दिसतात. कोणत्याही काठपदराच्या साडीवर याचा लुक फारच उठून येतो. जर तुम्ही प्लेन साडी नेसली असेल तर त्यावरही हे ब्लाऊज चांगले दिसतात. शिफॉनच्या साड्यांवरही ब्लाऊजचा हा प्रकार चांगला उठून दिसतो. खणाच्या ब्लाऊजमध्ये वेगवेगळे रंग असतात. तुम्ही सगळ्यावर जाणारा असा ब्लाऊज पाहात असाल तर त्यामध्ये काळा रंग निवडा. त्यामध्येही तुम्हाला गोल्डन आणि सिल्व्हर अशी जरही मिळू शकते. आता तुम्ही त्याची निवड तुमच्याकडे असलेल्या सांड्यावरुन करा. पण तुमच्याकडे एकतरी असा ब्लाऊज असू द्या.
2020 मध्ये नक्की ट्राय करा हे कॉटन ब्लाऊज.. आाणि दिसा एकदम क्लासी
गोल्डन ब्लाऊज
गोल्डन रंगाचा ब्लाऊज हा हल्ली सगळ्यांचाच वॉर्डरोबमध्ये असतो. हा एकमेव असा ब्लाऊज आहे जो तुम्हाला कोणत्याही साड्यांवर घातला येतो. अगदी डिझायनर साड्यांपासून ते तुमच्या ट्रेडिशनल साड्यांपर्यंत तुम्हाला गोल्डन रंगाचा ब्लाऊज घालता येतो.त्यामुळे गोल्डन रंगाचा एक ब्लाऊज तुमच्याकडे अगदी असायलाच हवा. आता गोल्डन रंगामध्येही वेगवेगळे शेड्स आणि प्रकार मिळतात. ते दिसायला फारच सुंदर दिसतात. तुम्ही रेडिमेडचा पर्याय यासाठी निवडलात तर फार उत्तम कारण तुम्हाला तुमच्या परफेक्ट मापाचा ब्लाऊज 1200 रुपयांपासून पुढे मिळू शकतो.
मिक्स ब्रॉकेड ब्लाऊज
हल्ली ब्रॉकेडच्या ब्लाऊजची क्रेझ फारशी नसली तरी सुद्धा ब्रॉकेडचा एखादा ब्लाऊज तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायला हवा. या ब्लाऊजमध्ये अनेक नवे पॅटर्न सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये मिक्स रंगाच्या ब्रॉकेडची निवड केली तर तुमच्या कोणत्याही साडीवर ते चांगले दिसू शकतात. एका ठराविक रंगाची निवड करण्यापेक्षा तुम्ही त्यामध्ये मल्टी कलरचा ऑप्शन निवडा.
असा ब्लाऊज शिवल्यास जाड हातही दिसतील बारीक
सॅटीनचा ब्लाऊज
जर तुम्ही पार्टीवेअर किंवा लग्नांसाठी काही सेक्सी आणि हॉट ब्लाऊजचा पर्याय शोधत असाल तर तुम्ही सॅटीनचा ब्लाऊज हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. सॅटीनच्या ब्लाऊजमध्ये अनेक वेगळे रंग मिळतात पण जर तुम्ही एक कॉमन रंगाचा विचार करत असाल तर तुम्हाला यामध्येही एक शाईनी गोल्डन रंग मिळू शकतो. किंवा जर तुम्हाला अगदीच गोल्डन रंग नको असेल तर तुम्ही काळ्या रंगाच्या ब्लाऊजचही निवड करु शकता.
आता या पॅटर्नचा विचार करुन तुम्ही तुमच्या कपाटात किमान या काही पॅटर्न आणि रंगाचे ब्लाऊज असू द्या.