ADVERTISEMENT
home / मनोरंजन
बोल्ड आणि ग्लॅमरस असूनही या अभिनेत्रींनी मालिकांमध्ये  साकारली ‘आई’

बोल्ड आणि ग्लॅमरस असूनही या अभिनेत्रींनी मालिकांमध्ये साकारली ‘आई’

मालिकांमधील नायिका प्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवतात. कधी कधी मालिका इतक्या लोकप्रिय होतात की पुढे काय होणार हे दाखवता दाखवता नायिकांची लग्न होऊन अचानक त्यांची मुलंही मोठी होतात. अशा वेळी नायिकांना बोल्ड असूनही मोठ्या मुलांच्या आईची भूमिका साकारावी लागते. अभिनयाचा एक भाग म्हणून सतत ऑनस्क्रिन आईची साकरण्यासाठी त्यांना नेहमीच साडी, पंजाबी सूट घालावे लागतात. आदर्श पत्नी, आदर्श माता आणि आदर्श सूनेच्या रूपात पाहता पाहता प्रेक्षकांच्या मनातही मग त्यांची तशीच प्रतिमा निर्माण होते. खऱ्या खुऱ्या आयुष्यात मात्र या नायिका खूपच बोल्ड  आणि ग्लॅमरसही असू शकतात. यासाठीच जाणून घेऊ या अशा नायिका ज्यांनी बोल्ड असूनही पडद्यावर आईची भूमिका साकारण्याचं धाडस केलं.

हिना खान –

हिना खान ही खऱ्या आयुष्यात अतिशय बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री आहे. मात्र तिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या हिंदी मालिकेत अनेक वर्ष एका प्रेमळ आईची भूमिका साकारली होती. या मालिकाचा पुढचा भाग पुढचा भागही खूप लोकप्रिय झाला होता. मात्र पहिल्या भागातील अक्षरा सिंघानिया आजही लोकांच्या लक्षात आहे. खरंतर या भूमिकेपेक्षा हिना खान खूपच वेगळी आहे. तरिही तिने पडद्यावर मात्र हे पात्र चांगल्या पद्धतीने साकारलं लोकप्रिय केलं होतं. 

दिव्यांका त्रिपाठी –

‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतून घराघरात आणि लोकांच्या मनात उतरणारी इशिमॉं आजही लोकांच्या  तितकीच स्मरणात आहे. ही भूमिका साकारली होती दिव्यांका त्रिपाठीने. या मालिकेत ती दोन मोठ्या मुलांची आई झाली होती. इशिताचा पारंपरिक आणि तरिही बोल्ड लुक आजही लोकांना तितकाच  आवडतो. खऱ्या जीवनात मात्र दिव्यांका खूपच स्टायलिश आहे. मात्र मालिकेसाठी तिने स्वतःला एका चाकोरीबद्ध स्टाईलमध्ये बांधलं होतं.

ADVERTISEMENT

श्रिती झा

‘कुमकुम भाग्य’ मधील प्रज्ञा म्हणजेच अभिनेत्री श्रिती झाने प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्षे राज्य केलं. ग्लॅमसर आणि चकाचकीच्या दुनियेतही तिने छोट्या पदड्यावर एक साधी आणि प्रेमळ आई साकारली. वयाच्या पस्तिशीत तिने दोन मोठ्या मुलींची आई साकारण्याचं आव्हान स्वीकारलं होतं. मात्र खऱ्या आयुष्यात श्रिती या भूमिकेपेक्षा खूप वेगळी आणि बोल्ड आहे.

नारायणी शास्त्री

नारायणी शास्त्री खऱ्या आयु्ष्यात खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. मात्र आजवर तिने अनेक मालिकांमध्ये आईची भूमिका साकारलेली आहे. तिने साकारलेली आई पाहून नेहमीच वाटतं की नारायणी अशीच साडीतील आणि खूपच सिंपल असलेली अभिनेत्री असेल. मात्र तिचं कौतुक यासाठी कारण तिने  तिच्या अभिनयातून प्रेक्षकांवर अशी स्वतःची छाप निर्माण केलेली आहे. आपकी नजरो ने समजा असो वा रिश्तो का चक्रव्यु्ह ती नेहमीच एका सौज्वळ आईच्या भूमिकेत दिसलेली आहे. तिने क्योंकी सॉंस भी कभी बहु थी, कुसुम, लाल इश्क, पिया रंगरेज, ममता, फिर सुबह होगी अशा अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. 

ADVERTISEMENT

आरती सिंह

मागच्या वर्षी बिग बॉस 13 मध्ये धुमाकूळ घालणारी आरती सिंह सगळ्यांच्या लक्षात असेलच. मात्र लोक तिला आजही ओळखतात ते ‘वारीस’ मधील आईची भूमिका साकारणारी संस्कारी सून अंबा याच नावाने. कारण छोट्या पडद्यावर नॉन ग्लॅमसर आईच्या रूपात तिला अनेक मालिकांमध्ये प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. बिग बॉसमधून जेव्हा आरतीचा बोल्ड लुक लोकांनी पाहिला तेव्हा त्यांना ती आरतीसारखी दिसणारी दुसरी अभिनेत्री आहे असंच वाटलं होतं. 

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

तो माझा अॅटिट्युट नव्हता, रुबिनाने केला एअरपोर्टवरील वागण्याचा खुलासा

मोबाईलनंतर आता आमिरने सोडलं ‘सोशल मीडिया’ शेअर केली शेवटची पोस्ट

लवकरच होणार ‘बंटी और बबली 2 ‘चं ट्रेलर प्रदर्शित, सलमान खान देणार सरप्राईझ

ADVERTISEMENT
17 Mar 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT