ADVERTISEMENT
home / मनोरंजन
लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीवर संकट, हजारो करोडचं होऊ शकतं नुकसान

लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीवर संकट, हजारो करोडचं होऊ शकतं नुकसान

कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.  कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशभरात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. ज्यामुळे सर्वच क्षेत्रातील उद्योगधंदे सध्या ठप्प आहेत. भविष्यात याचा मोठा आर्थिक फटका सर्वांना बसणार आहे. इतर उद्योगधंद्याप्रमाणे बॉलीवूड चित्रपटसृष्टीदेखील यामुळे चांगलीच संकटात सापडली आहे. कारण गेल्या महिन्याभरापासून कोणत्याही चित्रपटाचं शूटिंग झालेलं नाही. शूटिंग बंद असल्यामुळे या क्षेत्रातील तळहातावर पोट असणाऱ्या लोकांची उपासमार होत आहे. या लोकांसाठी बॉलीवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला. पण आता लॉकडाऊन वाढल्यामुळे भविष्यात या सर्व बॉलीवूड कलाकारांनादेखील हजारो करोडचं नुकसान सहन करावं लागू शकतं. कारण गेल्या महिन्याभरापासून अनेक चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात येत आहे. ज्यामुळे बॉलीवूड चित्रपटसृष्टीचे हजारो करोड रूपये आता टांगणीला लागले आहेत. 

मार्च महिन्यापासून बॉलीवूडला लागलं आर्थिक ग्रहण

कोरोनामुळे आलेल्या या संकटाची सुरूवात खरंतर मार्च महिन्यापासून सुरू झाली. मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागी’ आणि ‘अंग्रेजी मिडीयम’ या दोन्ही चित्रपटांना यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागलं. शिवाय आता या वाढलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकल्यात आल्या आहेत. याचा सर्वात जास्त मोठा फटका अक्षय कुमारच्या ‘सुर्यवंशी’ आणि रणवीर सिंहच्या ‘83’ ला बसणार आहे. आज जर हे चित्रपट प्रदर्शित झाले असते तर त्यांनी सिनेमागृहात अक्षरशः धुमाकूळ घातला असता. सहाजिकच या दोन्ही चित्रपटांचे करोडो रूपयांचं नुकसान नक्कीच झालेलं आहे. मागील एक वर्षापासून प्रेक्षक या दोन्ही चित्रपटांची आतूरतेने वाट पाहत होते. प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलणाऱ्या चित्रपटांच्या यादीत वरूण धवनचा ‘कुली नं 1’ देखील आहे. या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारिख जरी आता पुढे ढकलण्यात आली असली तरी परिस्थिती आटोक्यात आल्यावर भविष्यात सुज्ञ प्रेक्षक हे चित्रपट पाहण्यासाठी किती गर्दी करतील हे आताच सांगता येणार नाही. एवढंच नाही तर ईदच्या मुहुर्तावर यावर्षी सलमान खानच्या ‘राधे’ आणि अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या दोन चित्रपटांची टक्कर होणार होती. मात्र यावर्षी ईदच्या दिवशी म्हणजेच 22 मे ला देखील हे दोन चित्रपट प्रदर्शित होतील याची काहीच शाश्वती नाही. ज्यामुळे या दोन्ही चित्रपटांना काही करोडोंचं नुकसान नक्कीच सहन करावं लागणार आहे. 

लॉकडाऊनमुळे डझनभर चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत

या लॉकडाऊनमुळे आतापर्यंत बॉलीवूडच्या सुर्यवंशी, 83, लक्ष्मी बॉम्ब, कुली नं 1 यांच्याप्रमाणेच जवळजवळ एक डझन चित्रपटांना कोरोनाचं ग्रहण लागलेलं आहे. ज्यामध्ये मे – जून मध्ये प्रदर्शित होणारा परिणीतीचा दी गर्ल इन दी ट्रेन, विद्या बालनचा शकुंतला देवी, अमिताभ बच्चन यांचा झुंड, कियारा अडवाणीचा इंदु की जवानी, शिल्पा शेट्टीचा निकम्मा, जान्हवीचा रूह अफ्जा, ईशान खट्टरचा खाली पिली, राजकुमार रावचा छलांग, जॉन अब्राबमचा मुंबई सागा, कंगनाचा थलायवी या चित्रपटांचा  समावेश आहे. आता सर्व या चित्रपटांची रिलीजची डेट पुढे ढकलण्यामुळे भविष्यातील सर्वच वेळापत्रक गडबडणार आहे. शिवाय याचबरोबर आगामी चित्रपटांचे शूटिंगदेखील बंद असल्यामुळे त्याचाही फटका बॉलीवूडला सहन करावाच लागणार आहे. त्यामुळे आता बॉलीवूड चित्रपटसृष्टीचे हजारो करोड टांगणीला लागले आहेत. 

ADVERTISEMENT

Instagram

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

‘हम पांच’ मालिकेमुळे वयाच्या सतराव्या वर्षी एकता कपूर झाली डेलीसोप क्वीन

ADVERTISEMENT

डिंपी गांगुलीकडे आला गोड पाहुणा

लॉकडाऊनमध्ये ‘यामिनी’ परत येतेय, मौनी रॉयचा पुन्हा एकदा ‘नागिन’अंदाज

15 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT