2020 हे वर्ष नक्की काय घेऊन गेलं आहे तेच आता अगदी सामान्य माणसालाही कळेनासं झालं आहे. प्रत्येकालाच कसला ना कसला धक्का या वर्षात पचवावा लागत आहे. पण त्यातही सर्वात जास्त धक्के सध्या समोर येत आहेत ते बॉलीवूड इंडस्ट्रीवर. गेल्या काही महिन्यात बॉलीवूडवर अक्षरशः शोककळा पसरली आहे असंच म्हणावं लागेल. 2020 मार्चपासून संपूर्ण चित्रीकरण बंद झाले त्यानंतर बॉलीवूडमधील चित्रपटांसाठी काम करणाऱ्या लहान मोठ्या सगळ्याच लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सर्वच आर्थिक गणितं गेल्या चार महिन्यात बिघडत गेली. अनेक सेलिब्रिटींनी पुढाकार घेऊन अनेकांना मदत केली. अजूनही मदतीचा ओघ चालूच आहे. मात्र बॉलीवूडवर शोककळा अजून एका कारणाने पसरली आहे ती म्हणजे अनेक दिग्गज यावर्षी बॉलीवूडमधून कायमचे निघून गेले. आपल्यातून कायमचे निघून गेले. एका धक्क्यातून सावरत नाही तोपर्यंत दुसरा धक्का असंच सध्या चालू आहे. त्यामुळेच सध्या बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे असं म्हणावं लागेल. या चार महिन्यात बॉलीवूडने कोणाकोणाला गमावलं जाणून घेऊया.
निम्मी
1950 च्या दशकात आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी निम्मी अर्थात नवाब बानो. 23 मार्च 2020 मध्ये त्यांनी सांताक्रुझमध्ये अखेरचा श्वास घेतला. ‘आकाशदीप’, ‘मेरे मेहबूब’सारख्या गाजलेल्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने आपलंसं केलेल्या निम्मीने वयाच्या 88 व्या जगाचा निरोप घेतला.
इरफान खान
बॉलीवूडच्या प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असणारा इरफान खान याची अचानक अशी एक्झिट झाल्याने त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. दोन वर्षांपूर्वी मार्च 2018 मध्ये इरफानला न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर झाला. त्यानंतर त्याच्यावर उपचार चालू होते. यातून बरा होऊन इरफान पुन्हा भारतात आला आणि त्याने चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण केले. पण हा चित्रपट त्याचा शेवटचा चित्रपट ठरेल असा कोणालाही अंदाज नव्हता. आपण पुन्हा परत येत असल्याचा सकारात्मक व्हिडिओदेखील इरफानने पोस्ट केला होता. मात्र प्रमोशनच्या वेळी पुन्हा एकदा त्याची तब्बेत बिघडली. त्यामुळे प्रमोशनमध्ये इरफान सहभागी झाला नव्हता. बॉलीवूडचा अतिशय धुरंधर असणारा अभिनेता इरफान खान याची कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी ठरली. वयाच्या 54 व्या वर्षी इरफानने मुंबईच्या कोकिलाबेन अंंबानी रूग्णालयात 29 एप्रिल 2020 रोजी अखेरचा श्वास घेतला.
सनम जोहर आणि अबिगेल पांडे लवकरच अडकणार लग्नबंधनात
ऋषी कपूर
इरफानच्या मरणाची बातमी ताजी असतानाच ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलीवूड हळहळले. बॉलीवूडचा चॉकलेट हिरो ऋषी कपूर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. खुद्द अमिताभ बच्चन यांनी ही बातमी ट्विट करून दिली. ऋषी कपूर आपल्याला सोडून निघून गेला असून आपण आता पूर्णतः संपलो आहोत अशा तऱ्हेने अमिताभ बच्चन यांनी दुःख व्यक्त केले आहे. ऋषी कपूर यांना रिलायन्स रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे भरती केले होते. याची माहिती त्यांचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी आधीच दिली होती. मात्र सकाळ अशी उजाडेल अशी कोणालाही स्वप्नातही जाणीव नव्हती. 30 एप्रिल 2020 रोजी 8.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले दोन वर्ष लुकेमियाशी लढा दिल्यानंतर ऋषी कपूरने अखेरचा श्वास घेतला.
अभिनेता पुष्कर श्रोत्री घेऊन येत आहे भारताचा एकमेव मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म
वाजिद खान
प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचेही किडनीच्या आजारामुळे 31 मे रोजी निधन झाले. ते केवळ 39 वर्षांचे होते. वाजिद व्हेटिलेटवर होते आणि त्यांच्यावर उपचारही चालू होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. बरेच वर्ष किडनीच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या वाजिदने बॉलीवूडला अप्रतिम गाणी तर दिलीच होती. पण वाजिद एक आनंदी माणूस म्हणूनही बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध होते. सलमान खानच्या अनेक गाण्यांना त्याने साज चढवला होता. वास्तविक वाजिद सलमान खानच्या खूपच जवळचे होते. किडनीच्या आजारातच कोरोना व्हायरसच्या आजाराने ग्रस्त असल्याने त्यांना शेवटच्या दिवसात खूपच त्रास झाला.
कंगना रणौतच्या रडारवर आली पूजा भट, जाणून घ्या कारण
सुशांत सिंह राजपूत
बॉलीवूडला सर्वात मोठा धक्का बसला तो सुशांत सिंह राजपूतच्या अचानक जाण्याने. 14 जून 2020 ची दुपार उजाडली ती सुशांतच्या आत्महत्येच्या बातमीने. अजूनही या बातमीवर विश्वास ठेवणं प्रत्येकाला कठीण होत आहे. बॉलीवूडमधील बरेच जण अजूनही या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत. सुशांत सिंह राजपूतने असं पाऊल का उचललं हा प्रश्न आजही सर्वांनाच सतावत आहे. एका चांगल्या कलाकाराचे अचानक जाणे सगळ्यांना किती त्रास देऊन जाते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुशांत सिंह राजपूत. सुशांत सारखा मुलगा कधी आत्महत्या करेल असा विश्वासही कोणाला बसणार नाही. पण घरात गळफास लावत त्याने आपले जीवन संपवले. त्याच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला. त्याच्या निधनानंतर त्याचे अनेक जुने फोटो समोर येत आहेत. सुशांतचं जाणं हे बॉलीवूडलाच नाही तर सामान्यातल्या सामान्य माणसालाही चटका लाऊन गेलं आहे.
बासू चटर्जी
या महिन्याच्या सुरूवातीलाच प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चटर्जींचे वृद्धत्वामुळे निधन झाले. 93 वर्षांचे असणाऱ्या बासू चटर्जींना वृद्धत्वामुळे खूपच त्रास होता. 80-90 च्या दशकातील अप्रतिम आणि प्रसिद्ध दिग्दर्शक असणाऱ्या बासू चटर्जींचे आजही अनेक चाहते आहेत. आपल्या क्लासिक चित्रपटांसाठी बासू चटर्जींचे नाव बॉलीवूडमध्ये नेहमीच अमर राहील.
सरोज खान
बॉलीवूडमध्ये डान्सला वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी 3 जुलै, 2020 रोजी श्वसनाच्या त्रासामुळे प्राण सोडले. त्या 71 वर्षांच्या होत्या. सरोज खान यांना साधारण महिन्याभरापासून श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळेच त्यांना वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अचानक गुरुवारी रात्री त्यांची परिस्थिती खालावली त्यांना तीव्र ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलीवूड हळहळले. अगदी लहान वयापासून नृत्यात प्रावीण्य मिळविलेल्या सरोज खान यांनी जवळजवळ संपूर्ण बॉलीवूडला आपल्या नृत्यशैलीने आपलेसे केले होते.
जगदीप
‘सुरमाभोपाली’ ही अजरामर भूमिका वठवणाऱ्या जगदीपने लागोपाठच प्राण सोडले. 9 जुलै, 2020 रोजी जगदीप यांनी जगाचा निरोप घेतला. बॉलीवूडसाठी हादेखील धक्काच होता. वृद्धापकाळाने जगदीप यांचे निधन झाले. जावेद जाफरी यांचे वडील असणाऱ्या जगदीप यांचे नेहमीच कॉमेडीवर वर्चस्व राहिले. बॉलीवूडमधील कित्येक चित्रपट त्यांच्या कॉमेडीशिवाय पूर्ण झालेले नाहीत. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. शोलेमधील ‘सुरमा भोपाली’ ची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्यांची तिसरी पिढी म्हणजेच त्यांचा नातू मिझाननेही आता चित्रपटात पदार्पण केले आहे.