कंगना रणौतच्या रडारवर आली पूजा भट, जाणून घ्या कारण

कंगना रणौतच्या रडारवर आली पूजा भट, जाणून घ्या कारण

बॉलीवूडमध्ये सुरु असलेल्या नेपोटिझम वादाचा काही शेवट होताना दिसत नाही. कंगनाने फार पूर्वीच या सगळ्यांची कानउघडणी केली होती. मध्यंतरी हा विषय थंडावला पण आता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हा विषय पुन्हा एकदा चघळला जाऊ लागला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने या संदर्भात पुन्हा एकदा सगळ्या मोठ्या निर्मात्यांची आणि त्यांच्या घराणेशाहीबद्दल लोकांना महिती करुन दिली. करण जोहर असो किंवा सलमान खान तिने कोणालाच नाही सोडले आणि आता तिच्या रडारवर पूजा भट आली आहे. तिने ट्विटवरच पूजा भटला काही असे प्रश्न विचारले आहे की, पूजा भटला उत्तर देता देता नाकी नऊ आले आहे.

अशी झाली टिवटिवाट

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने अनेक चित्रपट निर्मात्यांवर घणाघाती आरोप केले होते. यामध्ये महेश भट यांचाही समावेश होता. महेश भट आणि सुशांतची गर्लफ्रेड रिया चक्रवर्ती यांच्यामधील संबंधाबाबतही काहींनी आक्षेप दर्शवला होता. पण त्यातील नेपोटिझमचा मुद्दा घेऊन पूजा भटने एक ट्विट लिहिले. त्यामध्ये तिने लिहिले की, आमच्या कुटुंबावर नेपोटिझमचा आरोप लावण्यात आला आहे. याचे  हसू येते. ज्या व्यक्तीने अनेक प्रतिभावान कलाकारांना, टेक्निशअन्सना त्यांच्या गुणांना पारखून काम दिली आहेत. त्यांना लॉन्च केले आहे. अशांवर हा आरोप लावणे फारच चुकीचे आहे. त्याला जोड म्हणून पूजा भटने कंगनाच्या पदार्पणाचीही आठवण करुन दिली आहे. ती म्हणाली की, इतकेच काय तर कंगना रणौतला विशेष फिल्म्स म्हणजे मुकेश भट आणि महेश भट यांनीच ‘गँगस्टर’ या चित्रपटातून लॉन्च केले आहे.  ही पोस्ट वाचल्यानंतर कंगना थोडीच शांत बसणार आहे. त्यावर तिने तिचे उत्तर दिले आहे. 

अभिनेता पुष्कर श्रोत्री घेऊन येत आहे भारताचा एकमेव मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म

काय म्हणाली कंगना?

पदार्पणाची गोष्ट कंगनाने फारच मनावर घेतली कारण लगेचच तिच्या टीमकडून या संदर्भात उत्तर देण्यात आले. तिने पूजा भटला लिहिले की, विशेष फिल्म्सने नाही तर माझ्या टँलेटचा शोध अनुराग बासूने घेतला त्यामुळे मला ती संधी मिळाली. हे ट्विट केल्यानंतर पूजा भटने तिला उत्तर दिले. तिने लिहिले की, हो हे खरे आहे की, अनुराग बासूने कंगना रणौतचा शोध घेतला. पण तिच्यावर पैसा गुंतवण्याचा निर्णय आम्ही घेतला ही देखील महत्वाची गोष्ट आहे

रेमो डिसूझाला करायची आहे सरोज खान यांच्यावर 'बायोपिक'

कंगनाने करुन दिली आठवण

पुढे कंगना म्हणाली की, मी गँगस्टरच नाही तर ‘पोकिरी’ या साऊथ इंडियन चित्रपटासाठीही ऑडिशन दिले होते. त्या चित्रपटासाठीही तिची निवड झाली होती. पोकिरी हा चित्रपट खूप चालला.त्यामुळे कंगना ‘गँगस्टर’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली हे म्हणणे चुकीचे आहे. याशिवाय सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आणि त्याच्या रिया चक्रवर्तीच्या नात्याबद्दल पूजा भटला इतकी उत्सुकता का आहे? या सगळ्याची उत्तर सध्या जास्त महत्वाची आहे. 

अचानक जॅकलिनने सोडले सलमान खानचे फार्महाऊस, काय आहे नक्की कारण

काय आहे पोकिरी प्रकरण ?

आता अनेकांनी ‘पोकिरी’ काय आहे याचा शोध घेतला असेलच. 2006 साली हा चित्रपट आला. महेश बाबू स्टारर या चित्रपटात एलियाना डिक्रुजने हिरोईनची भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटाच्या ऑडिशनमध्ये कंगना रणौत या रोलसाठी फायनल झाली होती. पण गँगस्टर आणि पोकिरी असे चित्रपट एका वेळी साईन करणे तिला शक्य नव्हते. तिने पोकिरीचे कॉन्ट्रॅक्ट साईन न करता गँगस्टरला पसंती दिली त्यामुळे या चित्रपटाची पहिली पसंती कंगना होती. 


आता पूजा भटवर घसरलेली कंगनाची गाडी पुढील काळात कोणावर घसरणार हे पाहायला हवं.