लग्नातील मेकअप हा नवरीसाठी खूप महत्वाचा असतो. जर त्या मेकअपमध्ये जराशी जरी चूक झाली तरी देखील लुक खराब होतो. त्यामुळे तुम्ही कोणाकडे मेकअप करायला देणार आहात जी व्यक्ती मेकअपमध्ये एकदम परफेक्ट असायला हवी. मेकअपमधील सगळ्यात जमेची बाजू म्हणजे लिपस्टिक. कोणताही ट्रेंड आला तरी देखील लिपस्टिकचा रंग हा कधीही चुकीचा निवडू नये. हा रंग चुकीचा असेल तर तुमचा सगळा मेकअप खराब होऊ शकतो.त्यामुळे होणाऱ्या ब्राईडने नेमका कोणता रंग टाळायला हवा ते जाणून घेऊया.
पावसाळ्यासाठी निवडा या खास शेडच्या लिपस्टिक दिसा खास
फिक्कट रंग
सध्या न्यूड रंगाचा चांगलाच ट्रेंड आहे. पण नवरीवर असे रंग नवरी म्हणून खुलून दिसत नाहीत. असे रंग हे फोटोमध्ये आणि इतरांना बघतानाही चांगली दिसत नाही. अशावेळी ओठांचा आकार पातळ असेल तर तुम्ही फिक्कट रंगाची निवड मुळीच करायला नको. त्यामुळे तुमचा सगळा लुक वाया जाईल. ब्राईडलवेअर हे नेहमी गडद असतात. त्यावर मेकअप खुलून दिसायचा असेल तर त्यावर लिपस्टिक ही देखील तितकीच गडद असायला हवी. न्यूड रंगामध्ये न्यूड पिंक, न्यूड ब्राऊन असे रंग टाळलेले बरे
मरुनकडे झुकणाऱ्या शेड्स
लाल रंग हा सुंदर दिसत असला तरी काही शेड्स हे डार्कही चांगले दिसत नाहीत. मरुनकडे झुकणारे रंग हे ओठांना खूपच डार्क करतात. असे रंग तुम्ही शक्यतो टाळलेले बरे. कारण असे रंग अजिबात लेटेस्ट दिसत नाही. अशा रंगामध्ये तुमचे वय जास्त वाटते. त्यामुळे शक्यतो तुम्ही हा रंग टाळलेला बरा. त्या ऐवजी तुम्ही लाल रंग पण तो ब्लड रेडकडे झुकणारा निवडावा तो नक्कीच खुलून दिसतो.
पिंक नाही हॉट पिंक
खूप जणांना गडद लिपस्टिक लावायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्हाला पिंक रंग खूप आवडीचा वाटत असेल पण हा रंग लग्नात लावण्यायोग्य नाही. हा रंग ओठांवर खुलून दिसत नाही. असा रंग दिसायला वेगळाच दिसतो. त्याऐवजी तुम्ही हॉट पिंक रंग निवडा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच तो रंग चांगला दिसू शकतो. तुमचा स्किनटोन कोणताही असला तरी देखील हे रंग दिसायला अधिक आकर्षक दिसतात.
अशा लिपस्टिकही लावू नका.
लिपस्टिकची निवड ही देखील महत्वाची असते. ब्राईडने लिपस्टिकचा कोणता प्रकार निवडू नये असा प्रश्न पडला असेल तर या गोष्टीही ठेवा लक्षात
- नवरीने कधीही ग्लॉस हा प्रकार निवडू नये. ग्लॉस हा प्रकार फोटोत चांगला दिसत नाही. शिवाय ग्लॉसला केस चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही मुळीच ग्लॉस लावू नका.
- मॅट लिपस्टिक या जास्त काळ टिकतात. ही गोष्ट खरी असली तरी ज्या लिपस्टिकमुळे ओठांवर क्रिस येतील अशा लिपस्टिक चांगल्या नाहीत.
आता तुम्ही किंवा इतर कोणी ब्राईड होणार असतील तर त्यांच्यासोबत ही माहिती नक्की शेअर करा.