तुमचं लग्न काही दिवसांवर आलं आहे का? अशावेळी आपल्या डोक्यात एकाच वेळी हजारो गोष्टीचं प्लॅनिंग सुरू असतं. जर तुमचीही अशीच परिस्थिती झाली असेल तर थोडा ब्रेक घ्या आणि नक्की पाहा हे तुमच्यासाठी आणि तुमच्या लग्नाळू फ्रेंड्ससाठी खास funny bride-to-be-memes.
प्रत्येक होऊ घातलेल्या नववधू किंवा वराने पाहिलेच पाहिजेत हे मीम्स
आम्हाला खात्री हे फनी मीम्स तुम्हाला आणि तुमच्या मित्रमंडळींना नक्कीच आवडतील. मग मीम्स पाहा, स्क्रीनशॉट काढा आणि शेअर करायला विसरू नका.
असं मीम तर तुम्हाला नक्कीच तुमच्या मैत्रिणी पाठवतीलच
लग्न ठरताच मनात एकीकडे आनंद असतो तर एकीकडे घर सुटणार यांचंही दुःख असतंच. मग लग्न होण्याआधीच आईबाबांसोबत असलं की, इमोशनल वाटू लागतं आणि त्यात असं मीम कोणी पाठवलं तर डोळ्यात पाणी आलंच म्हणून समजा.
पण एक दिलासा तर असेल की, आई फक्त एका कॉलच्या अंतरावर आहे.
होणारा नवरा आणि भाऊ हे मीम तुम्हाला पाठवतीलच
लग्नात छान दिसावं म्हणून प्रत्येक वधूची डाएटबाबत तारांबळ सुरू असते. एकीकडे केळवण आणि स्पिन्स्टर पार्टीज अटेंड करायच्या आणि दुसरीकडे डाएट सांभाळायचं. मग तुम्हाला असं खाताना पाहून तुमचा नवरा किंवा तुमचा लाडका भाऊ तुम्हाला हे मीम पाठवणारच ना. डाएटची आठवण करून द्यायला.
नवऱ्याला आत्तापासूनच चिडवाचिडवी
लग्नाआधी बायकोच्या पाठीपुढे करणारे नवरे लग्नानंतर कसे होतात. त्याचं परफेक्ट उदाहरण म्हणजे हे मीम आहे. तुमच्या नवऱ्याने जर तुम्हाला डाएटवालं मीम पाठवलं तर तुम्हीही लगेच हे मीम उत्तरादाखल पाठवा. त्याची बोलती लगेच बंद होईल.
तुमच्या टार्गेटवर असलेला लग्नाळू भाऊ
सगळेच जण तुम्हाला टार्गेट करून कसं चालेल. तुम्हीही मग पाठवा हे वरचं मीम. तुमच्याही छोट्या किंवा मोठ्या लाडक्या लग्नाळू भावाला तुम्ही हे मीम लगेच सेंड करा. मीम का बदला मीम.
तुमच्या लाडक्या मैत्रिणीसाठी
काही वेळा असं होतं की, एकाच वेळी बेस्टीजची लग्न ठरतात. मग तुमच्यासोबत जिचं लग्न ठरलं आहे त्या बेस्टीला किंवा मित्राला हे मीम लगेच पाठवा.
मित्र कसे मागे राहतील
आपल्या लग्न ठरलेल्या मैत्रिणीचा मूड ऑफ आहे, म्हटल्यावर मित्र कसे मागे राहतील. आता वरील मीममधली गोष्ट तुमच्याबाबतीत घडेलंच असं नाही. पण तुमचा दुःखी मूड बदलण्यासाठी तुमचा एखादा मित्र असं मीम तुम्हाला पाठवेल आणि तुम्हालाही लगेच हे पाहून हसू येईल. झाला ना मूड चेंज.
हेही वाचा –
पावसाळा सुरु झाला नाही तोच Funny meme व्हायला लागले व्हायरल
मुकेश आणि अनिल अंबानीचा ‘करण – अर्जुन मिलाप’, ट्विटरवर मीम्सची खैरात