ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
रंगोत्सवाचा आनंद लुटताना त्वचा आणि केसांची घ्या विशेष काळजी

रंगोत्सवाचा आनंद लुटताना त्वचा आणि केसांची घ्या विशेष काळजी

होळी हा रंगांची उधळण करणारा सण! होळीसाठी शुभेच्छा देणे आणि होळी स्पेशल पदार्थ करणे तर आलेच पण या होळीनिमित्त खेळल्या जाणा-या रंगांमुळे त्वचेची आग होणं, डोळ्यांची जळजळ होणं, तात्पुरता आंधळेपणा येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. रंगात मिसळण्यात आलेली रांगोळी किंवा मार्बल पावडरसारखे खरखरीत पदार्थ डोळ्यात गेल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊन दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच होळी खेळताना काळजी घ्यायला हवी. यासाठीच ‘POPxo मराठी’ च्या टीमने खास बातचीत केली आहे, डॉ रिंकी कपूर, द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या सल्लागार डरमॅटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डरमॅटोलॉजिस्ट आणि डरमॅटो सर्जन यांच्यासह. त्यांनी काही महत्त्वाच्या टिप्स त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी दिल्या आहेत. या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या  तर तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. अशी काळजी घ्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा देऊन जोमात साजरी करा. 

त्वचेला कोरडे ठेवू नका

Shutterstock

कोरड्या त्वचेचा अर्थ म्हणजे त्वचेवरील खुले छिद्र. याचाच अर्थ रंगामध्ये असलेली रासायनिक द्रव्ये ज्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे रंग खेळण्यापूर्वी त्वचेवर मॉईश्चराईझर तसेच सनस्क्रीन लावा. बाहेर पडण्यापूर्वी कमीतकमी एक तास आधी सनस्क्रीन लावा. याकरिता तुम्ही मोहरीचे तेल, नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. चेह-यासाठी एरंडेल तेलाचा वापर करु शकता. प्रामुख्याने कानाच्या मागील बाजूस, कानाच्या पाळीजवळ तसेच नखांवर तेल लावण्यास विसरु नका कारण याठिकाणी रंग सहजपणे टिकून राहण्याची शक्यता असते.

ADVERTISEMENT

केसांना तेल लावा

Shutterstock

आपल्या केसांना टाळूपासून मुळांपर्यंत छान तेलाची मालीश करा. केसांना होणारी इजा रोखण्याकरिता तेल लावणे गरजेचे आहे. कोरफडीच्या गरामध्ये काही प्रमाणात नारळाचे तेल मिसळून  ते देखील डोक्याच्या त्वचेला तसेच केसांना लावू शकता.

सनस्क्रीनचा वापर करा

ADVERTISEMENT

Shutterstock

खेळायला जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावून मगच घराबाहेर पडा. यामुळे टॅनिंगला प्रतिबंध करता येईल. उन्हामध्ये तुम्हाला होळी खेळताना त्वचा व्यवस्थित ठेवायची असेल तर तुम्ही सनस्क्रिनचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. होळीच्या रंगांपासून तुम्हाला सनस्क्रिन नक्कीच वाचवू शकते. 

वाचा – रंगपंचमीची संपूर्ण माहिती

पेट्रोलियम जेलीचा वापर करा

ओठ, नखे आणि डोळे यांच्या संरक्षण हे अतिशय महत्त्वाचे असून याकरिता तुम्ही पेट्रोलियम जेलीचा वापर करू शकता.  चांगल्या प्रतीच्या लिप बामचा वापर करा. जेल वापरुन आपल्या नखांच्या कडा डोळ्याभोवती आणि डोक्याभोवती तसेच डोळ्यांच्या पापण्या नुकसान होण्यापासून वाचवा.

ADVERTISEMENT

रंगांची करा उधळण आणि लुटा आनंद या मराठी गाण्यांसोबत

नेल पेंटचा वापर करा

Shutterstock

नखांवर नेल पेंटचा जाड थर लावा. आकर्षक रंगाचा वापर करून नखांचे संरक्षणाबरोबरच सौंदर्यातही भर घालता येईल. यामुळे तुमची नखे खराब होणार नाहीत आणि त्यावर रंग लागून राहणार नाही. 

ADVERTISEMENT

रंगांनी नुकसान न होण्याकरिता काय केले जाऊ शकते?

रासायनिक रंग त्वचेसाठी तसेच केसांसाठी अतिशय हानीकारक ठरत असून त्याला पर्याय म्हणून नैसर्गीक रंगाचा वापर करा.रंगांची गुणवत्ता सुनिश्चित करा. टेसूची फुले, पाने, चंदन पेस्ट,गुलाब पावडर, केशर, हळद, मुलतानी माती आणि इतर नैसर्गिक पदार्थ त्वचेकरिता सुरक्षित पर्याय आहे. कृत्रिम रंगामुळे होणारे नुकसाना टाळण्यासाठी नैसर्गीक पर्यांयाचा वापर करणे उत्तम ठरेल.

बुरा न मानो, होली है! होळीच्या शुभेच्छा संदेश 

कृत्रिम रंगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय

Shutterstock

ADVERTISEMENT

–  नैसर्गिक रंगांचा वापर करा

–    त्वचा हायड्रेट करा: ठराविक अंतराने भरपूर पाणी आणि ताज्या फळांचा रस प्या

–    जास्त काळ ओल्या कपड्यांमध्ये राहू नका. शक्य तितक्या लवकर ओले कपडे बदला

–    डोळ्यांना रंग आणि सूर्यापासून वाचवण्यासाठी सनग्लासेसचा वापर करा

ADVERTISEMENT

–    वॉटरप्रूफ बँड-एडद्वारे सर्व जखमा बंद करून ठेवा जेणेकरून त्यामध्ये रंग तसेच हानीकारक रसायने जाऊन संसर्ग वाढीस लागणार नाही

–    केस मोकळे सोडू नका – आपले केस वर बांधा किंवा त्यास स्कार्फने लपवा

महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या गोष्टी

–    खाज सुटणे, जळजळ यांसारख्या त्वचेला त्रास देणार्‍या समस्यांवर तत्काळ उपचार झाले पाहिजेत. त्वचेवरील कोणताही रंग किंवा पेंट तत्काळ थंड पाण्याने धुऊन टाकावा. योग्य उपचार मिळावेत यासाठी त्वचारोगतज्ज्ञांना किंवा डर्माटोलॉजिस्टना दाखवले पाहिजे.

–    लक्षणे कमी करण्यासाठी प्रभावित जागी कोर्टिकोस्टेरॉईड ऑईंटमेंट लावणे

ADVERTISEMENT

–    त्वचा बरी करण्यासाठी प्रतिजैवके किंवा अँटिफंगल औषधे घेणे

–    त्वचेचा शुष्कपणा कमी व्हावा म्हणून काही आरामदायी ऑईंटमेंट्स त्वचेला लावणे

–    कोणतेही तीव्र रंग नसलेल्या सौम्य साबणाने त्वचा धुणे

–    प्रादुर्भाव तीव्र असेल तर तोंडावाटे घेण्याची औषधेही दिली जाऊ शकतात.

ADVERTISEMENT

–    नियमित पाणी व फळांचे रस पित राहून शरीरातील आर्द्रता कायम राखावी.

–     भरपूर पाणी वापरून चेहरा आणि अंग धुऊन काढावे

–     बेबी ऑईलचा वापर करून त्वचा स्वच्छ करावी

–     रंग खेळल्यानंतर किमान 48 तास त्वचा घासू (स्क्रबिंग) नये

ADVERTISEMENT

–     त्वचा मऊ ठेवण्यासाठी दही किंवा बेसनासारखे नैसर्गिक घटक वापरावेत.

–     आंघोळ झाल्यानंतर संपूर्ण अंगाला मॉईश्‍चराईझर लावून त्यातील आर्द्रता कायम राहील याची खात्री करावी

 हे सोपे उपाय केलेत तर होळीचा आनंदही लुटता येईल आणि त्वचा निरोगी व मुलायम राखता येईल.

होळीच्या रंगाचे डाग कसे काढायचे, सोपी पद्धत

ADVERTISEMENT

Holi Wishes in Hindi

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

05 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT