बायपोलर डिसऑर्डर (Bipolar Disorder In Marathi) हा एक मानसिक आजार आहे. एखाद्याला अनेक महिने या डिप्रेशनमध्ये काढावे लागू शकतात. या अवस्थेमध्ये रूग्णाच्या मनात सतत तीव्र स्वरूपाचे नकारात्मक विचार येतात. आजकाल या मानसिक विकारांचे प्रमाण इतके वाढले आहे की, अगदी किशोरवयीन मुलांपासून वृद्धांपर्यंत बायपोलर डिसऑर्डर झाल्याचे आढळते. हा विकार स्त्री असो वा पुरूष कोणालाही होऊ शकतो. बायपोलर डिसऑर्डर झाल्यावर त्या व्यक्तीचा क्षणात मूड बदलत राहतो. अचानक अती उन्माद (Mania) तर अचानक नैराश्य (Depression) अशी अवस्था त्या रूग्णाची होऊ शकते. अशा रूग्णांच्या झोप, ऊर्जा, विचारसरणी आणि वागण्यामध्ये अनेक बदल सतत होताना आढळतात. एकाच माणसामध्ये असे दोन प्रकारच्या टोकाच्या भूमिका क्षणात दिसून येत असल्यामुळेच या विकाराला बायपोलर डिसऑर्डर (Bipolar Disorder Meaning In Marathi) असं म्हणतात.
बायपोलर डिसऑर्डरचे प्रकार मराठीतून (Types Of Bipolar Disorder In Marathi)
बायपोलर डिसऑर्डर (Bipolar Disorder In Marathi) चे प्रामुख्याने खालीलप्रमाणे काही मुख्य प्रकार असतात.
बायपोलर डिसऑर्डर- 1
या प्रकारामध्ये रूग्ण त्याच्या नेहमीच्या वागण्यापेक्षा अतिशय वेगळे वागू लागतो. बऱ्याचदा तो अती उत्साही असतो तर कधी कधी अतिशय निराश असू शकतो. त्याची अती उन्मादाची अवस्था कधी कधी इतका काळ टिकू शकते की त्याला पुन्हा नॉर्मल करण्यासाठी वैदकीय मदत घ्यावी लागते. निराश आणि उदास अवस्थाही अशा रूग्णामध्ये जवळजवळ एक ते दोन आठवडे राहू शकते.
बायपोलर डिसऑर्डर- 2
बायपोलर डिसऑर्डरच्या या दुसऱ्या प्रकारामध्येही रूग्ण अती उन्माद आणि खूप निराश असू शकतो. मात्र त्याचा या अवस्थेतील काळ हा पहिल्या प्रकाराप्रमाणे जास्त दिवस नक्कीच नसतो.
सायक्लोथिमिक डिसऑर्डर –
या प्रकारामध्ये पौढ व्यक्तीमध्ये कमीत कमी दोन वर्ष तर किशोरवयीन मुलांमध्ये कमीत कमी एक वर्ष बायपोलर डिसऑर्डरची अती उन्माद आणि निराशेची लक्षणे आढळू शकतात. मात्र त्याची तीव्रता बायपोलर डिसऑर्डर एक अथवा दुसऱ्या प्रकाराप्रमाणे तीव्र नसतात.
इतर बायपोलर –
या प्रकारामध्ये त्या रूग्णांची गणना होऊ शकते. ज्यांना काही वेळा मूड चेंज होण्याची अथवा अती उर्जेची लक्षणे आढळतात. पण काही काळाने ही लक्षणे आपोआप कमी होत जातात. वरील प्रकाराप्रमाणे सतत असे मानसिक त्रासाचे एपिसोड्स या प्रकारामध्ये दिसून येत नाही.
वाचा – हिपॅटायटिस होण्याची कारणे
बायपोलर डिसऑर्डरची लक्षणे (Symptoms Of Bipolar Disorder In Marathi)
बायपोलर डिसऑर्डरवर वेळीच योग्य ते उपचार केले तर या विकारापासून रुग्णाची सुटका होऊ शकते. पण त्यासाठी त्यामध्ये आढळणारी ही बायपोलर डिसऑर्डरची लक्षणे (Symptoms Of Bipolar Disorder In Marathi) वेळीच ओळखता यायला हवीत.
शारीरिक ऊर्जेमध्ये अचानक वाढ होणे (Increased Energy)
बायपोलर डिसऑर्डर (bipolar disorder in marathi) झालेल्या रूग्णामध्ये हे एक प्रमुख लक्षण आढळू शकते. जरी हा एक मानसिक विकार असला तरी या विकारामध्ये रूग्णाला नैराश्याप्रमाणे अती उन्मादाचा झटका येऊ शकतो. ज्यामुळे याकाळात रूग्ण अती उत्साहामध्ये एखादी गोष्ट करू शकतो. रात्रभर जाणे राहणं, भांडणतंटा, नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करणं अशी लक्षणं या रूग्णांमध्ये दिसून येतात.
मूडमध्ये चढउतार (Elevated Mood)
बायपोलर डिसऑर्डर रूग्णाच्या स्वभावात खूप चढ उतार जाणवतात. या रूग्णांचे वागणे क्षणात बदलत असते. कधी अती उत्साह अथवा उन्मादाने ते वागतात. तर कधी अतिशय निराश आणि उदासिनता त्यांच्यामध्ये जाणवते.
शारीरिक आणि मानसिक क्रियेत वाढ (Increased Physical And Mental Activity)
बायपोलर डिसऑर्डर हा एक मानसिक विकार असल्यामुळे यामध्ये रूग्णाच्या भावना आणि त्याप्रमाणे होणारे शारीरिक बदल दिसून येतात. त्यामुळे कधी कधी असे रूग्ण त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेपेक्षा जास्त काम करतात. रात्रभर जागरण करूनही ते थकत नाहीत अथवा कधी कधी त्यांना काहीच करण्याचे त्राण नसतात.
वेगाने विचार करणे अथवा बोलणे (Racing Thoughts And Speech)
बायपोलर डिसऑर्डर (bipolar disorder in marathi) झाल्यास अचानक होणाऱ्या मूड स्विंग्जमुळे रूग्णाच्या सर्वच आचरणावर परिणाम होतो. ज्यामुळे तो अतिशय जलद गतीने विचार करू लागतो अथवा बोलताना खूप फास्ट बोलू शकतो.
निर्णय घेण्यास सक्षम नसणे (Poor Judgement)
बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त रूग्णाची मानसिक अवस्था स्थिर नसल्यामुळे ते त्यांच्या आयुष्यात कोणताही निर्णय सक्षमपणे घेऊ शकत नाहीत. कारण योग्य विचार करून, सारासार विचारसरणीचा वापर करून, स्थिर मनाने एखादा निर्णय घेण्याची क्षमता अशा लोकांकडे नसते.
कमी झोप येणे (Decreased Need For Sleep)
या विकारामध्ये नैराश्याने ग्रासलेले असल्यामुळे रूग्णाच्या झोपेवर खूप परिणाम होतो. मनात सतत नकारात्मक विचार येत असल्यामुळे अशा रूग्णांना पुरेशी झोप मिळत नाही. अपुऱ्या झोपेचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आरोग्यावर जाणवतो.
जगण्याला उभारी देतील या मराठी प्रेरणादायी कविता (Motivational Kavita In Marathi)
बायपोलर डिसऑर्डरची कारणे (Causes Of Bipolar Disorder In Marathi)
बायपोलर डिसऑर्डरची कारणे (Bipolar Disorder Causes) अनेक असू शकतात. संशोधनात याबाबत अनेक कारणे आढळून आलेली आहेत. यासाठीच जाणून घ्या ही कारणे आणि त्यानुसार करा योग्य उपचार
फॅमिली हिस्ट्री (Family History)
काही आजार हे अनुवंशिक असून ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे परावर्तित होतात. बायपोलर डिसऑर्डर हा विकार देखील त्याच प्रकारचा आहे. जर तुमच्या आईच्या कुटुंबात अथवा वडिलांच्या कुटुंबातील कोणाला बायपोलर डिसऑर्डर असेल तर तुम्हाला बायपोलर डिसऑर्डर होण्याची शक्यता जास्त असते.
नातेसंबधांमध्ये दूरावा (Bad Relationship)
नातेसंबध बिघडल्यास त्याचा माणसाच्या मानसिक स्थितीवर मोठा परिणाम दिसून येतो. बायपोलर डिसऑर्डर (bipolar disorder in marathi) हा देखील एक मानसिक विकार असल्यामुळे पतीपत्नी, आईवडील, मुलं अथवा पालक यांच्यामध्ये काही कारणांमुळे दूरावा निर्माण झाला तर अशा लोकांना बायपोलर डिसऑर्डर होण्याची शक्यता असू शकते.
गंभीर विकार (Severe Illness)
काही गंभीर विकार आणि त्यावर घेण्यात येणारे औषधोपचार यांचा परिणाम माणसाच्या शरीराप्रमाणेच मनावरदेखील होतो. त्यामुळे काही आजारपणात घेण्यात येणाऱ्या उपचारांचा दुष्परिणाम म्हणजेच बायपोलर डिसऑर्डर विकार असू शकतो.
आर्थिक समस्या (Financial Problem)
माणसाला सुखी आणि समाधानी राहण्यासाठी त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असणं गरजेचं असतं. जर अचानक एखाद्याला आर्थिक नुकसान सहन करावं लागलं तर याचा परिणाम मनावर होऊन त्याला बायपोलर डिसऑर्डर (Bipolar Disorder In Marathi) विकार होण्याची शक्यता असते.
मेंदूचे कार्य आणि अवस्था (Brain Structure And Function)
मानसिक अवस्था आणि मेंदूचे कार्य यांचा संबध असल्यामुळे जर मेंदूच्या कार्यात बिघाड झाला तर मानसिक अवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा रूग्णांना मानसिक विकार अथवा बायपोलर डिसऑर्डर होण्याची शक्यता असते.
कुटुंबाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी – टीप्स (How To Take Care Of Family Health In Marathi)
बायपोलर डिसऑर्डरसाठी प्रतिबंधात्मक उपाय (How To Prevent Bipolar Disorder)
आजकालचे जग हे धकाधकीचे आणि वेगाने धावणारे आहे. सहाजिकच या परिस्थितीचा मानसिक स्थितीवर परिणाम होत असतो. बायपोलर डिसऑर्डर विकारापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर त्यासाठी हे प्रतिबंधात्मक उपाय करायलाच हवेत.
नियमित व्यायाम करा (Exercise Regularly)
कोणत्याही आजारापासून दूर राहायचे असेल तर त्यासाठी स्वतःच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याची वेळीच काळजी घ्यायला हवी. व्यायामामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा योग्य समतोल साधता येतो. यासाठी प्रत्येकाने नियमित काही मिनीटे व्यायामासाठी द्यायला हवी.
पोषक आणि निरोगी आहार घ्या (Maintain A Healthy Diet)
आपण जे खातो त्याचा परिणाम शरीरावर आणि पर्यायाने आपल्या मनावर होत असतो. यासाठीच नियमित आहार संतुलित आणि पोषक असेल याची काळजी घ्या. कधी तरी आवडीचे पदार्थ खाण्यास हरकत नाही. मात्र नियमित घेतला जाणारा आहार जर पोषक असेल तरच त्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल.
पुरेशी झोप घ्या (Getting Enough Sleep)
माणसाला निरोगी राहण्यासाठी कमीत कमी सहा ते आठ तासांची झोप गरजेची असते. कारण झोपेतच माणसाच्या मेंदूला पुरेसा आराम मिळतो. यासाठी लवकर झोपा आणि लवकर उठा हेा मंत्र खूप फायद्याचा ठरतो. चांगली झोप मिळाल्यामुळे तुमचा दिवस फ्रेश राहतो.
स्ट्रेस मॅनेजमेंट (Stress Management)
कामाची चिंता आणि धावपळ यामुळे नकळत शरीर आणि मनावर ताण येत असतो. त्यामध्ये नातेसंबध आणि इतर जबाबदाऱ्यांची काळजीदेखील असतेच. यासाठी माणसाला स्ट्रेस मॅनेजमेंटचे तंत्र माहीत असायला हवे. ताणाचे योग्य नियोजन केले तर आरोग्य आणि यश दोन्ही मिळू शकते.
मद्यपान टाळा (Avoid Alcohol And Drugs)
आजकालची जीवनशैली आधुनिक असल्यामुळे अनेक ऑफिस मिटींग्ज अथवा पार्टीमध्ये मद्यपान, धुम्रपान सहज केले जाते. मात्र जर तुम्हाला तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखायचे असेल तर मद्यपान टाळणेच फायद्याचे आहे.
मानसिक ताण कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय (Relieve Mental Pressure In Marathi)
बायपोलर डिसऑर्डरबाबत निवडक प्रश्न – FAQ’s
1. बायपोलर डिसऑर्डर झालेली माणसं पुन्हा नॉर्मल आयुष्य जगू शकत नाहीत का ?
असं मुळीच नाही. बायपोलर डिसऑर्डर झाल्यानंतर जगणे नक्कीच कठीण असते पण अशक्य नक्कीच नसते. योग्य उपचार करून पुन्हा एक निरोगी आणि निरामय आयुष्य माणसाला जगता येऊ शकते.
2. बायपोलर डिसऑर्डरमध्ये फक्त माणसाचा मूड बदलतो का ?
फक्त एवढंच नाही. बायपोलर डिसऑर्डर झालेल्या व्यक्तीचा मूड बदलतो त्याचप्रमाणे त्याच्या शारिरीक ऊर्जा, विचारशक्ती, स्मरणशक्ती, भूक, झोप, सेक्सची इच्छा, आत्मविश्वास अशा अनेक गोष्टींवर परिणाम होतो.
3. औषधांशिवाय बायपोलर डिसऑर्डर बरा करता येतो का ?
बायपोलर डिसऑर्डरपासून बरं होण्यासाठी औषधे घेणं खूप गरजेचं आहे. पण त्यासोबतच तुम्हील मानसिक उपचार, थेरपी, स्वतःला मदत करणाऱ्या स्ट्रॅटेजी वापरून बरे होऊ शकता. मात्र यासाठी तुम्हाला पुरेशी झोप, योग्य आहार, कुटुंबाची साथ नक्कीच मिळायला हवी.