Quarantineचे अनेक फायदे सेलिब्रिटींना झाले आहेत. कोणी किचनमध्ये शेफ झालयं,कोणी घराची साफसफाई करतयं. कोणी आपल्या प्रिय व्यक्तीसोबत मस्त वेळ घालवत आहे. सेलिब्रिटींची अशी अनेक उदाहरणे समोर असताना काही सेलिब्रिटींमध्ये प्रेम फुलताना दिसत आहे. मध्यंतरी मिका सिंह आणि चाहत खन्ना यांच्यामध्ये काहीतरी सुरु आहे असे कळले होते. ही उडती उडती बातमी नव्हती. तर मिका आणि चाहतने याचा पुरावा देणारे फोटो शेअर केले होते. त्यामुळेच या चर्चेला उधाण आले होते. पण मिका आणि चाहते प्रेम म्हणजे पब्लिसिटीला Quarantineचा आधार अशी म्हणायची वेळ आली आहे. कारण चाहतने डेटिंगच्या चर्चांचा फुगा अखेर फोडला आहे.
लॉकडाऊनमध्येही हसवणार कपिल शर्मा, असे करणार शुटिंग
एकमेकांच्या घरी घालवत आहेत वेळ
अचानक इन्स्टाग्रामवर ‘बडे अच्छे लगते है’ फेम चाहत खन्ना आणि गायक मिका सिंह यांच्या सोशल अकाऊंटवर एकमेकांचे फोटो शेअर होऊ लागले. बाल्कनीमध्ये ट्विनिंक करताना या दोघांचा फोटो… घरात रोमँटीक वेळ घालवताचे काही फोटो आणि चाहतचे मिकाच्या किचनमध्ये पाणीपुरी बनवणे वगैरे सगळ्या गोष्टी एकदम छान जुळून आल्या असे वाटत होते. त्यामुळेच हे दोघे एकमेकांना डेट करत असल्यावर शिक्कामोर्तब झाले. मग काय सगळ्या सोशल मीडियावर या दोघांच्याच चर्चा रंगत होत्या. Quarantineने आणखी एक सेलिब्रिटी जोडप तयार झालं अशाच चर्चा होत होत्या. पण थांबा कारण या कहाणीमध्ये थोडा ट्विस्ट आहे बरं का!
‘मुंबई पोलीस’ ट्िवटर हँडलवरून सेलिब्रिटींना देण्यात येणाऱ्या ‘अफलातून’ उत्तराचीच सध्या चर्चा
चाहतने फोडला अफवांचा फुगा
मिका आणि चाहत यांच्या जोडीबद्दल चर्चा होत असताना चाहतकडून एक असा खुलासा आला की, अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. चाहतने दिलेल्या माहितीनुसार मिकासोबतचे प्रेम म्हणजे त्यांच्या नवीन प्रोजेक्टची पब्लिसिटी होती. मिका आणि चाहत एकमेकांचे शेजारी आहेत. या लॉकडाऊनच्या काळात काहीतरी करावे म्हणून त्यांनी एक गाणे शूट करण्याचा निर्णय घेतला. याचीच ही सगळी तयारी होती.#quarantinelove अशी त्यांच्या गाण्याची थीम आहे आणि त्यामुळेच त्यांनी या सगळ्या पोस्ट एकमेकांच्या अकाऊंटवरुन शेअर करुन हा सगळा प्रेमाचा संभ्रम निर्माण केला. अरे देवा… आता या दिवसांचा उपयोग अशा पद्धतीने पब्लिसिटीसाठी केला जाईल असे कधीच वाटले नव्हते. पण हे खरे आहे. चाहत आणि मिकामध्ये काहीही नसून त्यांनी त्यांचा शेजारधर्म निभावला आहे. घरात बसून काहीही न करण्यापेक्षा त्यांनी एक व्हिडिओ साँग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी हा सगळा प्रेमाचा बनाव रचला.
महाभारत मालिकेबाबतच्या या गोष्टी वाचून व्हाल अवाक
चाहत आधीपासूनच विवाहित
आता चाहतबद्दल तुम्हाला काहीही माहीत नसेल तर चाहत खन्ना ही विवाहित आहे. ती भरत नरसिंघानी सोबत 3 वर्ष संसार केला त्यानंतर तिने फरहान मिर्झासोबत लग्न केले. फरहान आणि चाहतला दोन गोंडस मुली असून आता ते एकत्र राहात नाहीत. तर दुसरीकडे मिकाच्या रिलेशनशीप स्टेटस बाबतीत अनेकांना कायमच शंका राहिली आहे. कारण तो या आधी अनेक कॉन्ट्राव्हर्सीजमध्ये अडकला आहे. 42 वर्षांचा मिका असा तर सिंगल असल्याची माहिती आहे. पण त्याबाबतही थोडी शंकाच आहे.
तर आता चाहत आणि मिकाच्या या Quarantine प्रेमाचा फुगा फुटला आहे. तुम्ही त्यांचे गाणं बघून तेवढचं समाधान करुन घ्या.