ADVERTISEMENT
home / भ्रमंती
कमी बजेटमध्ये परदेशी जायचं आहे, मग  ही डेस्टिनेशन आहेत परफेक्ट

कमी बजेटमध्ये परदेशी जायचं आहे, मग ही डेस्टिनेशन आहेत परफेक्ट

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वर्षातून एकदा अथवा दोनदा मोठ्या वेकेशनवर जाणं अगदी  मस्ट झालं आहे. फिरण्यामुळे तुमच्या मनाला विरंगुळा मिळतो आणि कामाचा ताण कमी होतो. ज्यामुळे पुन्हा कामावर रूजू झाल्यावर तुम्हाला  नव्या जोमाने काम करता येतं. यासाठी वर्षांतून एक इंटननॅशनल टूर करणं एक मस्त कल्पना आहे. एक काळ होता जेव्हा परदेशी जाणं ही एक खूप मोठी गोष्ट समजली जायची. मात्र आजकाल वर्षांतून एक इंटरनॅशनल टूर करणं एक सामान्य गोष्ट झाली आहे. वाढलेलं उत्पन्न आणि पासपोर्ट, व्हिजाच्या सोयी सहज उपलब्ध असल्याने कोणीही पर्यटनासाठी परदेशी जाऊ शकतं. जर तु्म्ही कमी खर्चात परदेशदौरा करण्याचा विचार करत असाल तर ही पाच डेस्टिनेशन तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहेत. 

कमी बजेटमध्ये फिरण्यासारखे हे देश तुम्हाला माहीत आहेत का –

जर तुम्हाला भारताबाहेर फिरायला जाण्याची  इच्छा असेल तर तुमच्यासाठी हे देश अगदी बेस्ट ऑप्शन आहेत. कारण या इंटरनॅशनल टूर कोणाच्याही बजेटमध्ये बसू शकतात.

काठमांडू, नेपाळ –

बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे की नेपाळ पर्यटनासाठी अतिशय सुंदर देश आहे. यासाठीच अनेक पर्यटकांचा ओढा आजकाल नेपाळकडे वाढला आहे. मनाला भूरळ घालणारं वातावरण, पर्वतरांगा, खिशाला परवडणारं पर्यटन या गोष्टींमुळे नेपाळची लोकप्रियता वाढत आहे. नेपाळमध्ये अनेक हिंदू आणि बौद्ध मंदीरे आहेत. जर तुम्हाला अॅडवेंचर आणि निसर्गाची आवड असेल तर तुम्ही फिरण्यासाठी नेपाळची निवड करू शकता. नेपाळमध्ये देशातील सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्टदेखील आहे. ज्यामुळे या ठिकाणी गिर्यारोहकांची नेहमीच गर्दी असते. 

बजेट – एका माणसाचा खर्च कमीत कमी 20 ते 25 हजार

ADVERTISEMENT

कसे जाल –  मुंबई, दिल्लीवरून विमानाने अथवा गोरखपूरवरून रेल्वे मार्गाने तुम्ही या देशात जाऊ शकता. 

instagram

फुकेत, थायलंड –

थायलंडमध्ये अनेक रमणीय स्थळं आहेत. पण जर तुम्हाला मानसिक शांतता अनुभवायची असेल तर तुम्ही फुकेतला नक्कीच जाऊ शकता आहे. फुकेतमध्ये तुम्हाला शानदार हॉटेल्स, निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटू शकता. कुटुंबिय आणि मित्रमंडळींसोबत मौजमस्ती करण्यासाठी हे ठिकाणी अगदी बेस्ट आहे. फुकेतमध्ये भरपूर नाईटक्लब, मसाज पार्लर आणि शॉपिंग स्ट्रीट आहेत. ज्यामुळे तुमची टूर नक्कीच स्मरणीय होऊ शकते.

ADVERTISEMENT

बजेट – एका माणसाचा खर्च कमीत कमी 25 ते 30 हजार

कसे जाल – मुंबई अथवा दिल्लीवरून विमानमार्गे

instagram

ADVERTISEMENT

कोलंबो, श्रीलंका –

जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत फॉरेन टूरला जायचं असेल तर श्रीलंका तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. श्रीलंकामध्ये अनेक समुद्रकिनारे, जंगल सफारी, चहाच्या बागा, अप्रतिम खाद्यसंस्कृती, फ्रेश आणि मनाला वेड लावणारं वातावरण तुम्ही अनुभवू शकता. श्रीलंका हे आशिया मधील एक लोकप्रिय बेट आहे. ज्यामुळे अथांग समुद्रकिनाऱ्यांनी हा देश घेरलेला आहे. श्रीलंकामधील नाईटलाईफ अनुभवण्यासाठी या देशाला जरूर भेट द्या. 

बजेट – एका माणसाचा खर्च 25 ते 50 हजार 

कसे जाल – मुंबई अथवा दिल्ली हवाईमार्गे

ADVERTISEMENT

instagram

भूतान –

भूतान  एक कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी अरगी परफेक्ट देश आहे. भूतान मध्ये फिरताना तुम्हाला स्वर्गमय वातावरणाची अनुभूती येऊ शकते. ज्या लोकांना निसर्गाची आवड आहे. ज्यांनी भूतानला अवश्य भेट द्या. हिरवेगार आणि घनदाट जंगल, मोठमोठ्या नद्या, हिमालयाच्या पर्वतरांगाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी नक्कीच जाऊ शकता. 

बजेट – एका माणासाचा खर्च 35 ते 50 हजार

कसे जाल – मुंबई आणि दिल्ली वरून हवाईमार्गे याशिवाय तुम्ही महामार्गानेदेखील या देशात जाऊ शकता. 

ADVERTISEMENT

instagram

दुबई –

instagram

ADVERTISEMENT

दुबईला सिटी ऑफ गोल्ड या नावाने ओळखलं जातं. रोषणाईचा झगमगाट आणि ऐश्वर्याचं दर्शन घडवणारा दुबई हा देश प्रत्येकाने पाहावा असा आहे. एकदा दुबईला गेल्यावर तुम्ही दुबईचं कौतुक इतरांना सांगितल्याशिवाय राहूच शकत नाही. मोठेमोठे मॉल. म्युझियम, समुद्रकिनारे, बुर्ज खलिफाही जगातील सर्वात मोठी इमारत, मिरॅकल गार्डन, गोल्ड मार्केट अशा अनेक गोष्टी तुम्ही दुबईमध्ये अनुभवू शकता.  मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला दुबईला जायचं असेल तर कमीत कमी तीन ते चार महिने आधी बुकींग करा नाहीतर तुम्हाला ही टूर चांगलीच महागात पडू शकते.

बजेट – एका माणसाचा खर्च 50 ते 80 हजार

कसे जाल – मुंबई आणि दिल्लीवरून विमान मार्गे

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

भारतात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहेत ही ठिकाणं

ADVERTISEMENT

भारतात एकट्या प्रवाश्यांसाठी उत्तम ठिकाणे

पावसाळ्यातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ…भंडारदरा

13 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT