ADVERTISEMENT
home / आरोग्य
Chest pain during pregnancy In Marathi

गरोदरपणात छातीत दुखणे कारणे आणि घरगुती उपाय (Chest Pain During Pregnancy In Marathi)

गरोदरपणात प्रत्येक स्त्रीला वेगवेगळे शारीरिक अनुभव येतात. प्रत्येकीची शारीरिक रचना, आरोग्य, इतर आरोग्य समस्या, प्रतिकार शक्ती, जीवनशैली, विचारांचा प्रभाव, इतरांचे अनुभव यानुसार अनेक बदल गर्भवती महिलांच्या शरीरात होताना दिसतात. गरोदरपणात काही जणींना पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीत छातीत दुखण्याचाही त्रास जाणवतो. गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या वाढ आणि विकासामुळे गरोदर महिलांच्या शरीरात असे अनेक बदल होत असतात. काही जणींना गरोदरपणात छातीत दुखण्यासोबत अंगदुखी, अस्वस्थता, छातीत जळजळ, उलटी, मळमळ अशा अनेक शारीरिक समस्या जाणवू शकतात. गरोदरपणातील ही सर्व लक्षणे अगदी सामान्य आहेत. म्हणूनच प्रत्येक स्त्रीला गरोदर राहण्यापूर्वी या सर्व शारीरिक बदलांची जाणीव असायला हवी. ज्यामुळे एखादे चुकीचे लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे सोपे होईल. यासाठीच जाणून घ्या गरोदरपणी छातीत दुखण्याची कारणे आणि उपाय (chest pain during pregnancy In marathi)

गरोदरपणात छातीत दुखणे कारणे आणि घरगुती उपाय
Chest Pain During Pregnancy In Marathi

गरोदरपणात छातीत दुखण्याची लक्षणे (Symptoms Of Chest Pain In Pregnancy)

गरोदरपणात छाती जड होणे, छातीत दुखणे, छातीत धडधडणे अशी काही सामान्य लक्षणे जाणवतात. यासाठीच जाणून घ्या गरोदरपणात छातीत दुखण्याची नेमकी काय लक्षणे असतात.

छाप लागणे (Shortness Of Breath)

गरोदरपणात अचानक महिलांना छातीत जडपणा जाणवू लागतो. छाती जड झाल्यामुळे अस्वस्थ आणि थकल्यासारखे वाटू शकते. गरोदरपणात वाढणाऱ्या हॉर्मोन्सच्या पातळीमुळे ऑक्सिजनची पाकतळी कमी जास्त होते ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि सतत छाप लागण्याचा त्रास होतो. 

जाणून घेऊया गर्भधारणा लक्षणे

ADVERTISEMENT

झोपताना श्वसनाला त्रास होणे (Difficulty In Breathing While Sleeping)

गरोदरपणी वाढणाऱ्या पोटामुळे महिलांची झोपण्याची स्थिती बदलते. अशा वेळी अस्वस्थतेमुळे बऱ्याचदा महिलांना झोपल्यावर श्वास घेण्यास अडचण येते अथवा झोपल्यानंतर छातीत धडधड वाढल्यासारखे वाटते. मात्र गर्भाच्या वाढीमुळे होणाऱ्या शारीरिक बदलामुळे हे परिणाम होत असतात. त्यामुळे यात फार घाबरण्यासारखे कारण नाही.

ह्रदयाचे ठोके वाढणे (Fast Heart Rate)

ह्रदयाचे ठोके वाढणे हे देखील गरोदरणातील एक प्रमुख लक्षण आहे. कारण या काळात त्या स्त्रीच्या शरीरात एका नवीन जीवाची निर्मिती होत असते. ज्यामुळे शरीराला जास्त ऑक्सिजन आणि रक्ताची आवशक्ता असते. यासाठी ह्रदयावर जास्त ताण आल्यामुळे ह्रदयाचे ठोके वाढू शकतात. 

रक्तदाब कमी होणे (Low Blood Pressure)

Low blood pressure
chest pain during pregnancy in marathi

गरोदरणाच्या सुरुवातीच्या काळात काही दिवस महिलांचा रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. दुसऱ्या तिमाहीमध्येही रक्तदाब कमी होण्याचे लक्षण जाणवू शकते. ज्यामुळे गरोदपणात रक्तदाब वाढणे अथवा कमी होणे एक सामान्य लक्षण आहे. मात्र असं असलं तरी याचा परिणाम बाळाच्या वाढ आणि विकासावर होत असतो. त्यामुळे गरोदरपणात महिलांनी सतत रक्तदाबावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 

थकवा (Fatigue)

गरोदरपणात महिलांच्या शरीरात हॉर्मोन्सच्या पातळीत अचानक बदल होत असतात. ज्यामुळे गरोदर स्त्रीला सतत थकल्यासारखे वाटू शकते. अशक्तपणा आणि सतत झोप येणं हे गरोदरपणाचे एक प्रमुख लक्षण आहे. मात्र या काळात होणाऱ्या शारीरिक बदलाचा एक परिणाम म्हणून देखील छातीत दुखणे आणि थकवा जाणवू शकतो.

ADVERTISEMENT

प्रेगनन्सी टेस्ट किटबाबत माहिती

गरोदरपणात छातीत दुखण्याची कारणे (Causes Of Chest Pain In Pregnancy)

गरोदरपणात गर्भाच्या वाढीसोबत गरोदर महिलेच्या शरीरात अनेक बदल घडतात. याचाच एक भाग म्हणजे गरोदरपणी छातीत दुखणे यासाठी जाणून घ्या यामागचे कारण 

अपचन (Indigestion)

गरोदरपणात महिलांना अपचनाचा खूप त्रास होतो. ज्यामुळे अपचनामुळे महिलांच्या छातीत दुखू शकते. अपचनामुळे पोट आणि छातीच्या भागात गॅस निर्माण होतो. पोटात गर्भाची वाढ जलद गतीने होत असल्यामुळे तिसऱ्या तिमाहीनंतर महिलांना अपचनामुळे छातीत दुखण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते. 

चिंता काळजी (Anxiety)

गरोदरपणात महिलांमध्ये जसे शारीरिक बदल होतात तसेच त्यांच्या भावनिक स्थितीतही बदल होतात. मनात असणाऱ्या चिंता काळजीचा परिणाम त्यांच्या शरीरावर जाणवतो. सर्व काही सुरळीत पार पडेल ना याची चिंता गरोदर महिलेला सतत जाणवत असते. ज्यामुळे त्यांच्या छातीत दुखू शकतं. 

ADVERTISEMENT

फुफ्फुसांची स्थिती (Lung Conditions)

गरोदरपणाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये छातीच्या पिंजऱ्यावर अतिरिक्त ताण येतो. ज्यामुळे फुफ्फुसांची स्थिती बदलते. ज्याच्या परिणामामुळे छातीवर दाब येण्याची शक्यता वाढते. छातीवर दाब येण्यामुळे छाप लागणे अथवा अधून मधून छातीत दुखणे असा त्रास गरोदरपणी जाणवू शकतो. याशिवाय जर एखाद्या स्त्रीला आधीच फुफ्फुसाचे इनफेक्शन, सतत सर्दी असणे, अस्थमा अथवा एखागी अॅलर्जी असेत त्यामुळे गरोदर महिलेच्या छातीत दुखू शकतं.

स्तनांची वाढ होणे (Growing Breast Size)

गरोदरपणात होणारा महत्त्वाचा शारीरिक बदल म्हणजे स्त्रीच्या स्तनांची वाढ होणे. या काळात बाळाच्या पोषणासाठी शरीर तयार होत असते. ज्यामुळे स्तन वाढून मोठे होतात. छातीच्या जवळ झालेला हा सर्वात मोठा बदल असते. ज्यामुळे छातीमधील मांसपेशी आणि स्नायूंवर ताण येतो. सहाजिकच या कारणामुळे गरोदर महिलांच्या छातीत दुखते.

गर्भ आणि गर्भाशयाची वाढ होणे (Growing Uterus And Fetus)

Growing uterus and fetus
Chest pain during pregnancy In Marathi

गरोदरपणात टप्प्या टप्प्याने गर्भाशय आणि पोटातील बाळाची वाढ आणि विकास होत असतो. गर्भ वाढू लागताच नेहमीपेक्षा पोटाचा आकार मोठा होतो. ज्याचा ताण छातीवर पडण्याची शक्यता असते. गरोदरपणात पोट वाढू लागताच गरोदर महिलांच्या छातीत दुखण्याची शक्यता देखील वाढू शकते. 

गरोदरपणात वाचायची ही पुस्तके

ADVERTISEMENT

गरोदरपणात छातीत दुखत असल्यास घरगुती उपाय (Safe Home Remedies For Chest Pain During Pregnancy)

गरोदरपणात छातीत दुखण्याच्या समस्येवर घरगुती उपाय करून मात करता येते. कारण या काळात विनाकारण औषधे घेणे बरोबर नाही. त्यापेक्षा काही घरगुती उपाय करून हा त्रास सोडवता येतो.

दूध प्या (Drink Milk)

गरोदरपणात जर छातीत दुखत असेल अथवा अॅसिडिटीमुळे छातीत जळजळ होत असेल तर अशा वेळी थंड दूध पिणे हा एक उत्तम पर्याय आहे. कारण यामुळे तुमची अॅसिडिटी कमी होते आणि छातीत जळजळ होणे बंद होते. दूध तुमचे पोट आणि छाती यामध्ये निर्माण झालेला गॅस कमी करण्यास मदत करते. 

सफरचंद अथवा पेअर खा (Eat An Apple Or Pear)

Eat an apple or pear

सफरचंद अथवा पेअर या फळांमध्येही अॅसिडिटी कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे छातीत दुखत असल्यास गरोदर महिलांनी सफरचंद अथवा पेअर खाल्ल्यास त्यांना लगेच आराम मिळू शकतो. गरोदरपणात महिलांना यासाठी सफरचंद अथवा पेअर न सोलता खाण्यास सांगितले जाते. 

काहीतरी थंड प्या अथवा खा (Drink Or Eat Something Cold)

अॅसिडिटीमुळे छातीत जळजळ होत असेल तर ही जळजळ आणि दाह कमी करण्यचा सोपा मार्ग म्हणजे काहीतरी थंड खाणे अथवा पिणे. अशा वेळी थंड ज्यूस अथवा आईसक्रीम खाण्याचा खूप चांगला फायदा होतो. मात्र हे पदार्थ गरोदर स्त्रीने कमी प्रमाणात खावेत अन्यथा यामुळे सर्दी खोकला होण्याचा धाका असू शकतो.

ADVERTISEMENT

डोकं शरीरापेक्षा वर ठेवा (Hold Your Head Up)

तुमची शारीरिक स्थिती अथवा पोश्चरदेखील छातीत दुखण्याला कारणीभूत असू शकतो. कारण जर तुम्ही सतत बसून अथवा झोपून राहत असाल तर खाल्लेले अन्न न पचल्यामुळे तुम्हाला अपचन होऊ शकते. यासाठीच छातीत दुखू लागतात उभे राहा अथवा डोकं शरीरापेक्षा वर राहिल याची काळजी घ्या. ज्यामुळे अॅसिडिटी कमी होऊन छातीत दुखणे कमी होते.

शांत आणि निवांत राहा (Relax For Relief)

Relax for relief
Chest pain during pregnancy In Marathi

गरोदरपणात शांत आणि निवांत राहण्याची गरज असते. या काळात जर तुम्ही चिंता काळजी करत असाल तर या ताणतणावाचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. सहाजिकच यामुळे तुमच्या छातीत दुखू शकते. यासाठीच या काळात जास्तीत जास्त शांत आणि निवांत राहण्याचा प्रयत्न करा. चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींमध्ये मन रमवा. ज्यामुळे मनावरचा ताण कमी होईल. 

गरोदरपणात छातीत दुखण्याबाबत प्रश्न – FAQ’s

1. गरोदपणात छातीत दुखू लागणे कधी चिंताजनक असते ?

गरोदरपणात छातीत दुखणे हे एक सामान्य लक्षण आहे. या काळात छातीत दुखण्यावर कताही घरगुती उपाय करून मात करता येते. मात्र जर सतत छातीत दुखत असेल अथवा वेदना खूप तीव्र असतील तर मात्र लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा. कारण हे लक्षण ह्रदयविकाराचे असू शकते. 

2. छाती जड होणे हे गरोदरपणाचे लक्षण आहे का ?

गरोदरपणाच्या सुरूवातीच्या काळात गर्भाची वाढ होताना गर्भाशय ताणले जाते. ज्याचा परिणाम गर्भवती महिलेच्या पोट आणि छातीवर ताण येतो. त्यामुळे गर्भधारणा झाल्यावर छाती जड झाल्यासारखी वाटू शकते. 

ADVERTISEMENT

3. प्रसवकळांमुळे छातीत दुखू शकते का ?

प्रसूतीच्या काळात प्रसवकळा सुरू होताच शरीरातील सर्व अवयवांवर ताण येण्यास सुरुवात होते. ज्यामध्ये प्रामुख्याने फुफ्फुसे आणि पोटावर अधिक ताण येतो. ज्यामुळे प्रसव कळा सुरू होतात छातीत दुखण्याची शक्यता असते. 

15 Sep 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT