Advertisement

आरोग्य

प्रेगनन्सी टेस्ट किटबाबत माहिती मराठी (Information About Pregnancy Test Kit In Marathi)

Dipali NaphadeDipali Naphade  |  Aug 12, 2021
pregnancy test kit information

Advertisement

आपण गरोदर आहोत की नाही हे प्रत्येकालाच सर्वात आधी जाणून घ्यायचं असतं. मग त्यासाठी डॉक्टरकडे जाऊन तपासणी करण्याआधीही तुम्ही घरच्या घरी प्रेगनन्सी किट आणून याची माहिती मिळवू शकता. पण काही जणांना प्रेगनेंसी किट चा वापर कसा करावा याची योग्य माहिती (Information About Pregnancy Test Kit In Marathi) नसते. योग्य आणि त्वरीत परिणाम जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रेगनन्सी किटची पट्टी आणून त्याचा उपयोग करून घेऊ शकता. यामध्ये तुमच्या लघवीचे काही थेंब घालून तुम्ही याचे परीक्षण काही क्षणातच करू शकता. साधारण 5 मिनिट्समध्ये तुम्हाला याचा परिणाम नक्की काय आहे याबाबत कळून येते. डॉक्टरदेखील या किटचा वापर करण्याचा सल्ला देतात. पण त्याआधी आपण याबाबत पूर्ण माहिती जाणून घेऊया. 

प्रेंगनन्सी किट्सचे प्रकार (Types Of Pregnancy Kit In Marathi)

Types of Pregnancy Kit
Types of Pregnancy Kits

आपल्याला केवळ जाहिरातींमधून प्रेगनन्सी टेस्ट किट माहीत असते. पण प्रेगनन्सी किट्सचे दोन प्रकार असतात. नक्की या कोणत्या प्रकारच्या असतात आणि त्याचा कसा उपयोग करायचा पाहूया. पण त्याआधी प्रेगनन्सी टेस्ट किट काय असते जाणून घेऊया. 

प्रेगनन्सी किट गरोदर आहोत की नाही, याची तपासणी करण्याकरिता बनविण्यात आलेले एक किट आहे. गर्भधारणा लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांकडे गेल्याशिवाय तुम्हाला घरबसल्या ही गोड बातमी कळू शकते. आजकाल बाजारामध्ये अनेक वेगवेगळे प्रेगनन्सी टेस्ट किट्स दिसून येत आहेत. तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आहे की नेगेटिव्ह आहे हे अगदी कमी वेळात जाणून घेण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. 

अधिक वाचा – तुम्हालाही गर्भधारणेत अडचणी येत आहेत, मग या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्या

स्ट्रिप प्रेगनन्सी टेस्ट

हा प्रेगनन्सी टेस्ट (Pregnancy Test) चा प्रमुख प्रकार आहे. तुम्ही तुमच्या लघवीचे काही थेंब यामध्ये प्रविष्ट करून गरोदर आहात की नाही हे जाणून घेऊ शकता. तुमच्या लघवीमध्ये एचसीजी हार्मोन उपस्थित असेल तर स्ट्रीपमध्ये असलेल्या दुसऱ्या स्ट्रीपचा रंगही परावर्तित होऊ लागतो. हा रंग परावर्तित झाला तर तुम्ही गरोदर आहात हे सिद्ध होते.

 कप परीक्षण किट

या किट्समध्ये परीक्षण उपकरणासह लघवी एकत्रित करण्यासाठी एक कपदेखील असतो. या कपामध्ये तुम्ही तुमची लघवी काढल्यानंतर परीक्षण उपकरणामध्ये हा कप बुडवा. तुमच्या लघवीमध्ये एचसीजी उपस्थित असेल तर याचा रंग बदलतो. याचा अर्थ तुम्ही गरोदर असल्याचे कळून येते. 

अधिक वाचा – गरोदर पहिला महिना लक्षणे आणि घ्यायची काळजी जाणून घ्या

प्रेगनन्सी टेस्ट किटचे फायदे (Pregnancy Test Kit Benefits In Marathi)

Pregnancy Test Kit Benefits
Pregnancy Test Kit Benefits – Canva

हे किट मुख्यत्वे लघवीतील एचसीजी हार्मोनचा तपास करते. जेव्हा अंडे गर्भाशयात स्थापित होते तेव्हा शरीरामध्ये एचसीजी हार्मोन तयार होऊ लागतात. गर्भधारणा सुरू झाल्यापासून काही दिवसातच शरीरामध्ये एचसीजी हार्मोनची पातळी अत्यंत वेगाने होऊ लागते आणि हे लघवीमध्ये आढळते. महिलांच्या लघवीमध्ये एचसीजी हार्मोनची उपस्थिती असते जी गर्भवती असण्याचे निर्देश देते. साधारणतः मासिक पाळीच्या दिवसानंतर 4-5 दिवसात तुम्ही याचा तपास करून घेऊ शकता. तुमच्या लघवीत एचसीजी आहे की नाही याबाबत प्रेगनन्सी टेस्ट किटमुळे माहिती मिळते. काही महिलांमध्ये त्वरीत पॉझिटिव्ह रिझल्ट दिसून येतो. पण तुम्ही कोणते किट वापरत आहात त्यावरही हे अवलंबून आहे. 

प्रत्येक वेळी डॉक्टरांकडे धावत जाण्याच्या त्रासपासून प्रेगनन्सी टेस्ट किटमुळे नक्कीच फायदा मिळतो. ज्या महिला गरोदर होण्यासाठी प्रयत्न करत असतात त्या आपल्या वेळेनुसार आणि सोयीनुसार कोणत्याही ठिकाणी गर्भावस्थेचे परीक्षण करून घेऊ शकतात. एकदा समोर परिणाम सकारात्मक दिसला की, डॉक्टरांकडे जाणे सोपे जाते. 

काही महिलांना मूल नको असते पण त्यांनी असुरक्षित सेक्स केला आणि परिणामस्वरूपी मासिक पाळी चुकल्यानंतर कोणताही धोका पत्करायचा नसतो त्या महिला घरीच गरोदर टेस्ट करून पुढचे पाऊल वेळीच उचलू शकतात. गर्भ नको असल्यास वेळीच त्यावर उपाय करता येतो. तसंच वेळीच प्रेगनन्सी टेस्टमुळे परिणाम कळल्याने आरोग्यासाठीही योग्य पाऊल उलचता येते आणि काळजी घेता येते. 

अधिक वाचा – Miscarriage Symptoms In Marathi

प्रेगनन्सी किटचा वापर कधी आणि कसा करावा (When To Use Pregnancy Test Kit)

When to use Pregnancy test kit
When To Use Pregnancy Test Kit

प्रेगनन्सी किटचा वापर नक्की कधी करावा असा प्रश्न अनेकांना असतो. तर मासिक पाळी चुकल्यानंतर एक आठवड्यात तुम्ही प्रेगनन्सी किटचा वापर करून तुम्ही गरोदर आहात की नाही याचा तपास करून घेऊ शकता. काही प्रेगनन्सी किट बनविणाऱ्या कंपनीचा दावा आहे की, तुम्ही निर्धारित तारीख अथवा मासिक पाळी न आल्यास एक वा दोन दिवसातदेखील किटचा वापर करून पाहू शकता. 

काही वेळा गर्भनिरोधक गोळ्या अथवा कंडोमचा वापर केला असूनही गर्भ राहू शकतो. प्रेगनन्सी किट सहज बाजारामध्ये उपलब्ध होते त्यामुळे तुम्ही कधीही याचा वापर करून त्याचा उपयोग घरी आणून करू शकता. यासाठी सकाळी उठल्या उठल्या पहिल्या लघवीचा वापर करावा असं काहीही नाही. तुम्ही कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही वेळी या प्रेगनन्सी टेस्ट किटचा वापर करू शकता. प्रेगनन्सी टेस्ट करून तुम्ही नको असलेला गर्भ वेळीच थांबविण्याचाही निर्णय घेऊ शकता. 

घरी प्रेगनन्सी टेस्ट कशी करावी (How To Do Pregnancy Test At Home)

How to do Pregnancy test at home

How To Do Pregnancy Test At Home

काही जणांना नक्की प्रेगनेंसी किट चा वापर कसा करायचा असतो याची माहिती नसते. त्यामुळे याचा नक्की कसा वापर करायचा ते आपण जाणून घेऊया. 

  • सर्वात पहिले तुम्ही प्रेगनन्सी टेस्ट किटच्या पाकिटावर देण्यात आलेल्या सूचना अत्यंत व्यवस्थितपणे वाचा आणि त्यानुसार त्याचा वापर करा 
  • एक स्वच्छ कप अथवा भांडे घ्या ज्यामध्ये तुम्ही तुमची लघवी काढा
  • तुम्ही ज्या किटचा वापर करत आहात त्यामध्ये तुमच्या लघवीचे काही थेंब टाका अथवा लघवी एखाद्या भांड्यात काढून तुम्ही ती स्ट्रीप त्यात बुडवा
  • लक्षात ठेवा तुम्ही नेहमी सकाळी उठल्यानंतर पहिली लघवी असेल त्याचा वापर केल्यास उत्तम कारण त्यामध्ये एचसीजीचे प्रमाण अधिक असते 
  • काही प्रेगनन्सी किट्समध्ये स्टिकच्या वर तुम्हाला लघवी करायची असते. याचा वापर करणे अत्यंत सोपे असते. लघवी करताना हे हातात पकडा आणि त्यावर लघवीची धार येऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही इंडिकेटरवर रंग बदलतो का ते पाहा. अधिक स्टिकवर तुम्हाला लाल अथवा निळ्या रंगाची लाईन दिसून येते
  • सामान्यतः याचा परिणाम 5 – 10 मिनिट्समध्ये दिसून येतो. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास, तुम्ही किट्सच्या मागे देण्यात आलेल्या सूचना वाचा. काही ठिकाणी स्टिकवर तुम्ही प्रेग्नंट आहात अथवा नॉट प्रेग्नंट असे लिहूनही येते. तुम्ही कोणत्या कंपनीचे किट वापरत आहात यावर सर्व अवलंबून आहे

प्रेगनन्सी टेस्ट किट परिणाम कसा तपासावा (How To Check Pregnancy Test Kit Results)

How to check Pregnancy Test kit results
How To Check Pregnancy Test Kit Results

तुम्ही मासिक पाळी चुकल्याच्या पहिल्याच दिवशी प्रेगनन्सी टेस्ट किटचा वापर केला त्याचा परिणाम सकारात्मक नकारात्मक काहीही असू शकतो.

प्रेगनन्सी टेस्ट लाईट पिंक लाईन डार्क पिंक लाईन (Pregnancy Test Kit Light Pink Line Dark Pink Line)

तुम्ही किटमध्ये टेस्ट केल्यानंतर जर तुम्हाला हलकी गुलाबी लाईन अर्थात लाईट पिंक लाईन दिसली तर तुम्ही गर्भवती आहात. काही महिलांच्या बाबतीत ही लाईन डार्क अर्थात गडद दिसून येते. वास्तविक हा रंग तुमच्या लघवीमधील एचसीजीची मात्रा दाखवते. अधिक प्रमाणात एचसीजी असेल तर गडद गुलाबी रंग दर्शवला जातो. कमी प्रमाणात असेल तर लाईट पिंक दर्शविले जाते.

प्रेगनन्सी टेस्ट पॉझिटिव्ह फेंट लाईन (Pregnancy Test Positive Faint Line)

तुम्ही मासिक पाळी चुकल्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी याचा वापर केल्यास, ही लाईन अत्यंत लाईट रंगाची दिसण्याची शक्यता असते. कारण तुमच्या लघवीतील एचसीजीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे या टेस्टला प्रेगनन्सी टेस्ट पॉझिटिव्ह फेंट लाईन म्हटले जाते. गर्भावस्था वाढू लागते तसा याचा रंग अधिक गडद होतो. 

प्रेगनन्सी टेस्ट पॉझिटिव्ह रिझल्ट (Pregnancy Test Positive Result)

टेस्ट किटमध्ये परीक्षण केल्यानंतर दुसरी लाईन नंतर दिसू लागते. परीक्षण करण्यापूर्वी तुम्ही व्यवस्थित सूचना वाचून घ्या. त्यानुसार परीक्षण करा. सकारात्मक परिणाम दिसण्यासाठी पहिल्यापासून उपस्थित असणारी गडद लाईन न पाहता दुसरी लाईन गडद होते का ते पाहणं गरजेचे आहे. जर दुसरी लाईनही गडद दिसली तर तुम्ही आई होणार आहात आणि प्रेगनन्सी टेस्ट पॉझिटिव्ह रिझल्ट असल्याचे निश्चित होते. 

प्रेगनन्सी टेस्ट नेगेटिव्ह रिझल्ट (Pregnancy Test Negative Result)

एक नकारात्मक गर्भावस्था परीक्षणानंतर तुम्हाला केवळ नियंत्रण लाईन दिसून येते. याशिवाय कोणतीही लाईन टेस्ट किटमध्ये दिसत नाही. कधी कधी एचसीजी मात्रा अत्यंत कमी असल्यानेही नकारात्मक परिणाम दाखवतो. त्यामुळे तुम्हाला जर या टेस्टनंतरही शंका असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन रक्ताची तपासणी करूनही परीक्षण करून घेऊ शकता. 

प्रेगनन्सी किटबाबत लक्षात ठेवा या गोष्टी

  • बऱ्याचदा प्रेगनन्सी किट चुकीचा परिणामही दर्शवू शकतात. उदाहरणार्थ तुम्ही गर्भवती असाल पण एचसीजी हार्मोनच्या कमी पातळीमुळे लक्षात येत नाही. त्यामुळे रिझल्ट नेगेटिव्ह दर्शवू शकतात. त्यामुळे तुम्हाला मनात शंका असेल तर क्लिनिकमध्ये जाऊन तपासून घ्या 
  • प्रेगनन्सी किटनुसार नकारात्मक परिणाम आल्यास, 4-5 दिवसांनी पुन्हा तपासणी करा. कारण काही महिलांमध्ये एचसीजी हार्मोनचा स्तर हळूहळू वाढतो 
  • तपासणी करण्यापूर्वी अधिक प्रमाणात पाणी प्या ज्यामुळे लघवीतील एचसीजी हार्मोनचे प्रमाण दिसून येईल
  • तुम्ही तुमच्या जवळच्या केमिस्टकडून हे टेस्ट विकत घेऊ शकता. याची खरेदी करण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची अथवा कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन ऑर्डरही करू शकता

प्रेगनन्सी टेस्ट किट्सची नावे आणि किंमत (Pregnancy Test Kit Name And Price)

Pregnancy Test kit name and price
Pregnancy Test Kit Name And Price
प्रेगनन्सी टेस्ट किट नावेकिंमत 
प्रेगा न्यूज 50
एक्यू 25
प्रेगा न्यूज अॅडव्हान्स 92
आय कॅन 30
प्रेगालाईन52
ममाक्सपर्ट67
प्रेगानूर95
वेलोसिट40, 50 and 100
क्लिअरब्लू1390
डॉक्टर मोअरपेन 68
Pregnancy Test Kit Name And Price In Marathi

यापैकी कोणतेही प्रेगनन्सी टेस्ट किट तुम्ही वापरून तुम्ही गरोदर आहात की नाही याबाबत जाणून घेऊ शकता. तुम्हाला जर घरी टेस्ट करायची नसेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन पुढील तपासणी करून घ्या. पण घरच्या घरी वापरण्याची ही सोपी पद्धत तुम्ही नक्कीच वापरून पाहू शकता.