भूक लागल्यानंतर घरच्या घरी पटकन बनणारा पदार्थ म्हणजे मॅगी नूडल्स (Maggi Noodles). कोणत्याही घरात मॅगी नाही असं अजिबात होणार नाही. पण नेहमी नुसती पाणी आणि मसाला घालूनच मॅगी नूडल्स का खायच्या? तीच तीच पद्धत वापरून तुम्ही जर कंटाळला असाल तर तुम्ही मॅगी नूडल्सना द्या नवा ट्विस्ट. बाहेर जाऊन चिली चीज मॅगी तुम्ही खाता. त्याची चव जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घरातही त्याच चवीच्या मॅगी नूडल्स नक्कीच तयार करू शकता. व्हेजिटेबल अथवा मसाला मॅगी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही चिली चीज मॅगी (Chilli Cheese Maggi) पटकन घरच्या घरीही करू शकता. चिली चीज मॅगी रेसिपी (Chilli Cheese Maggi Recipe) करणे अत्यंत सोपे आहे. फक्त तुम्हाला नेहमीच्या पद्धतीपेक्षा यामध्ये थोडासा बदल करावा लागेल. पण भूकेवर हा सोपा आणि स्वादिष्ट – चविष्ट उपाय नक्कीच कामी येईल. यासाठी लागणारे साहित्य आपण आधी पाहूया आणि मग जाणून घेऊया बनविण्याचा विधी.
अधिक वाचा – चमचमीत वेगवेगळ्या चवीच्या नुडल्स बनवा घरच्या घरी (Noodles Recipe In Marathi)
चिली चीज मॅगी (Chilli Cheese Maggi) साठी लागणारे साहित्य
- 2 लहान चमचे तेल
- अमूल बटर
- 2 हिरव्या मिरची
- 2 लसणीच्या सोललेल्या पाकळ्या
- अर्धा बारीक चिरलेला कांदा
- अर्धा बारीक चिरलेला टॉमेटो
- अर्धी बारीक चिरलेली सिमला मिरची
- अर्धे किसलेले गाजर (तुम्हाला हवे असेल तर बारीक तुकडे करून घ्या)
- 2 चमचे मक्याचे दाणे
- अर्धा कप पाणी
- 2 स्लाईस चीज (किसून घेतले तर उत्तम)
- 1 पाकिट मॅगी नूडल्स
- चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो
- स्वादानुसार मीठ
अधिक वाचा – चमचमीत पास्ता रेसिपी मराठीत (Pasta Recipe In Marathi)
बनविण्याची पद्धत
- सर्वात पहिले कढईमध्ये तेल आणि बटर घाला. त्यामध्ये हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली लसूण घालून परता
- तुम्हाला लसूण आवडत नसेल तर केवळ मिरची परतून घ्या आणि त्यानंतर वरून गाजर, मक्याचे दाणे, कांदा, टॉमेटो, सिमला मिरची घालून वाफवा. मधूनच वाफ व्यवस्थित लागून शिजले आहे की नाही ते पाहून घ्या
- त्यानंतर वरून पाणी घाला आणि ही भाजी उकळवा. उकळी आल्यानंतर त्यामध्ये दोन चीज स्लाईस घालून वरून मीठ घाला. मॅगी मसाला घाला आणि व्यवस्थित परतवा
- चीज वितळल्यानंतर वरून थोडेसे लाल तिखट घाला. तुम्हाला तिखट आवडत असल्यास, तुम्ही याचा वापर करा अन्यथा नाही घातले तरीही चालेल
- वरून मॅगी घाला आणि त्यानंतर थोडेसे पाणी घालून शिजवून घ्या
- तुमच्या चीज चिली मॅगी नूडल्स तयार आहेत
- एका बाऊलमध्ये काढा. वरून चीज किसून घाला. त्यावर चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो घालून सर्व्ह करा. तुम्हाला आवडत असेल तर वरून तुम्ही कोथिंबीर चिरून घालू शकता. याची चव वेगळी लागते
टीप – तुम्हाला जर फोडणी आवडत असेल तर तुम्ही तेल आणि बटर घातल्यावर त्यात जिरे आणि मोहरीची फोडणी घालून वरून कृती करू शकता. याचा स्वाद अधिक वेगळा आणि चवदार लागतो. तुम्ही नक्की याचा वापर करून पाहा. तसंच तुम्ही हिरव्या मिरचीच्या ठिकाणी लाल मिरचीचाही वापर करू शकता. पण त्याचा स्वाद वेगळा येईल हे लक्षात ठेवा.
अधिक वाचा – फक्त नूडल्स नाही मॅगीपासून बनवा वेगवेगळ्या डिशेस
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक