Advertisement

Recipes

चमचमीत पास्ता रेसिपी मराठीत (Pasta Recipe In Marathi)

Dipali NaphadeDipali Naphade  |  Jul 12, 2021
Pasta Recipe In Marathi

Advertisement

हॉटेलमध्ये गेल्यानंतर चायनीज, इटालियन असे वेगवेगळे कुझिन (Cuisine) आपण मागवत असतो. त्यातही पिझ्झा, पास्ता हे आपले आवडते इटालियन पदार्थ आहेत. पिझ्झा आणि पास्ता रेसिपी आपल्याला हॉटेलमध्ये मिळते तसं घरी बनवता येत नाही असा अनेकांना गैरसमज आहे. पण पास्ता रेसिपी मराठी (Pasta Recipe In Marathi) आपण घरीही तयार करून घेऊ शकतो. चमचमीत आणि तितकाच स्वादिष्ट पास्ता आपण घरीही बनवू शकतो. आम्ही या लेखातून तुम्ही वेगवेगळ्या पास्ता रेसिपी मराठीत देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हालाही या रेसिपी नक्की आवडतील आणि तुम्ही घरच्या घरी हा पास्ता रेसिपी इन मराठी (Pasta Recipe In Marathi) नक्की ट्राय कराल अशी आम्हाला आशा आहे.

व्हाईट सॉस पास्ता रेसिपी मराठी (White Sauce Pasta Recipe In Marathi)

White Sauce Pasta Recipe In Marathi

White Sauce Pasta Recipe In Marathi

हॉटेलमध्ये गेल्यानंतर व्हाईट सॉस पास्ता मागवताना तो चीझचा स्वाद आठवतो आणि तोंडाला आधीपासूनच पाणी सुटते. घरच्या घरीही तुम्हाला अगदी हॉटेलप्रमाणे व्हाईट सॉस पास्ता बनवता येतो. पास्ता रेसिपी इन मराठी (Pasta Recipe In Marathi) देताना आम्ही सर्वात पहिले तुम्हाला याचीच रेसिपी देत आहोत. 

साहित्य 

  • 100 ग्रॅम पास्ता
  • 25 ग्रॅम अथवा एक मोठा चमचा बटर
  • चीज तुमच्या आवडीनुसार किसून 
  • 1 कप व्हाईट सॉस
  • 1/2 चमचा मोहरी पावडर
  • 1/2 चमचा चिलिफ्लेक्स (बाजारात तयार मिळते)
  • 1/2 चमचा मिरेपूड 
  • अर्धा चमचा ओरेगॅनो 
  • चवीनुसार मीठ

बनविण्याची पद्धत 

  • एका पॅनमध्ये पाणी उकळत ठेवा आणि त्यात पास्ता उकडून घ्या 
  • नंतर त्यातील पाणी काढून टाका 
  • दुसऱ्या पॅनमध्ये बटर घाला. त्यात व्हाईट सॉस, चिलीफ्लेक्स, मोहरी पावडर, मिरेपूड सर्व एकत्र घाला आणि व्यवस्थित ढवळा
  • त्यात वरून उकडलेला पास्ता घाला आणि व्यवस्थित मिक्स करा
  • वरून किसलेले चीज घाला आणि नीट शिजू द्या
  • गरमागरम पास्ता शिजल्यावर एका डिशमध्ये घाला. वरून किसलेले चीज, चिलीफ्लेक्स, ओरेगॅनो घालून सर्व्ह करा 

रेड सॉस पास्ता रेसिपी (Red Sauce Pasta Recipe In Marathi)

Red Sauce Pasta Recipe In Marathi

Red Sauce Pasta Recipe In Marathi

काही जणांना व्हाईट सॉस पास्ता अर्थात त्यातील नुसता चीजचा स्वाद आवडत नाही. काहींना रेड सॉस पास्ता खूपच आवडतो. रेड सॉस पास्ता रेसिपी मराठी (Pasta Recipe In Marathi) नक्की कशी असायला हवी त्याची माहिती. 

साहित्य 

  • 1 वाटी पेनी पास्ता
  • 2 टॉमेटो 
  • 3-4 लाल मिरची
  • 1 कांदा
  • 1 चमचा लसूण बारीक चिरलेली
  • 1 चमचा काळी मिरी पावडर
  • 1 चमचा हब्स
  • 2 चमचे तेल
  • चवीनुसार मीठ
  • 1 चमचा चिलीफ्लेक्स

बनविण्याची पद्धत 

  • सगळ्यात आधी एका पॅनमध्ये पाणी गरम करून घ्या
  • त्यात टॉमेटो आणि लाल मिरची एकत्र टाका आणि व्यवस्थित झाकण ठेऊन उकळू द्या. शिजल्यानंतर थंड होऊ द्या आणि टॉमेटोची सालं काढून टाका. याची पेस्ट करून घ्या
  • दुसऱ्या पॅनमध्ये पाणी गरम करा आणि त्यात पेनी पास्ता उकडून घ्या
  • पुन्हा पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात चिरलेला कांदा आणि लसूण घालून मस्त परतून घ्या
  • लाल झाल्यावर त्यात तयार केलेले पास्ता सॉस टाकून शिजवावे आणि मग त्याला चांगली उकळी येऊ द्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड आणि हब्स टाकून पुन्हा त्याला उकळी आणा.
  • आता त्यात पास्ता टाका आणि व्यवस्थित मिक्स होईल असं परतून घ्या 
  • पास्ता तयार आहे. डिशमध्ये काढून त्यावर चीज किसून घाला आणि सर्व्ह करा 

मसाला पास्ता रेसिपी (Masala Pasta Recipe In Marathi)

Masala Pasta Recipe In Marathi

Masala Pasta Recipe In Marathi

पास्ता रेसिपी मराठी (Pasta Recipe In Marathi) मध्ये आपण मसाला पास्तादेखील तयार करू शकतो. काही जणांना मुळमुळीत पास्ता आवडत नाही. मग अशावेळी मसाला घातलेला पास्ता आणि त्याची चव नक्कीच तुमचा मूड अधिक फ्रेश करू शकते. 

साहित्य 

  • 1 वाटी पास्ता
  • 1 कांदा बारीक चिरून
  • 1 टोमॅटो बारीक चिरून
  • 1/2 शिमला मिरची बारीक चिरलेली 
  • 1/2 गाजर बारीक चिरून
  • 1 चमचा तिखट
  • 1/2 चमचा हळद
  • 1/2 चमचा गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • तेल
  • 1 चमचा आलं -लसूण बारीक किसून
  • 3 चमचे मक्याचे उकडलेले दाणे 

बनविण्याची पद्धत 

  • सर्वप्रथम पाणी गरम करायला ठेवा आणि त्यात मीठ आणि पास्ता घालून उकळून घ्या.
  • कढईमध्ये तेल घाला आणि त्यात आलं -लसूण किसून टाका. लगेचच त्यात कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, मक्याचे दाणे, गाजर टाकून थोडं वाफवून घ्या. 
  • हे शिजत आल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तिखट, हळद आणि गरम मसाला टाकून परतून घ्या. हे सर्व एकत्रित नीट मिक्स करा.
  • हे व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात मीठ, कोथिंबीर टाका. वरून उकडलेला पास्ता टाकून छान परता. तुमचा मसाला पास्ता सर्व्हसाठी तयार आहे. वरून ओरेगॅनो आणि चिलीफ्लेक्स घालून आणि चीज किसून घाला आणि खायला द्या.

चीज पास्ता रेसिपी (Cheese Pasta Recipe In Marathi)

Cheese Pasta Recipe In Marathi

Cheese Pasta Recipe In Marathi

केवळ लहान मुलांनाच नाही तर अगदी मोठ्यांनाही चीज पास्ता नक्कीच आवडतो. पास्ता रेसिपी मराठी (Pasta Recipe In Marathi) मध्ये आपण चीज पास्ता घरी कसा बनवायचा हे जाणून घेऊया. 

साहित्य 

  • 100 ग्रॅम चिज
  • 200 ग्रॅम पास्ता
  • 2 कांदे चिरलेले 
  • 2 टोमॅटो बारीक चिरून 
  • 4 चमचे तेल अथवा तुमच्या आवडीनुसार बटर
  • 1 चमचा लाल तिखट
  • थोडी कोथिंबीर चिरलेली 
  • चवीपुरते मीठ

बनविण्याची पद्धत 

  • एक नेहमीची कढई घेऊन गॅस वर तापायला ठेवावी. त्यामध्ये तेल घाला आणि तेल तापल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यावा.
  • कांदा परतला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि दुसऱ्या बाजूला पास्ता उकडून घ्या 
  • टोमॅटो सॉफ्ट झाला की, त्यामध्ये चवीपुरते मीठ घाला आणि लाल तिखट घालून नीट परतून घ्या
  • हे मिश्रण तयार झाले की त्यामध्ये शिजलेला पास्ता तुम्ही मिक्स करून घ्या
  • सर्व मिक्स करून घेतले की, दोन-तीन मिनिटे चांगले परतून आणि पुन्हा वाफवून घ्या
  • पास्ता तयार आहे. सर्व्ह करताना वरून किसलेले चीज घाला आणि खायला द्या 
  • तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा आणि टॉमेटो मिक्स करताना त्यामध्येही चीज मिक्स करून घेऊ शकता

अधिक वाचा – झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत, तुमच्यासाठी खास

मॅकरॉनी पास्ता रेसिपी (Macroni Pasta Recipe In Marathi)

Macroni Pasta Recipe In Marathi

Macroni Pasta Recipe In Marathi

मॅकरोनी पास्ता म्हटलं की, तोंडाला आपोआपच पाणी सुटतं. त्याची चव लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच आवडते. पास्ता रेसिपी इन मराठी (Pasta Recipe Marathi Madhe) मध्ये आपण मॅक्रोनी पास्ता कसा करायचा पाहूया.

साहित्य

  • 400 ग्रॅम पास्ता
  • 100 ग्रॅम मक्याचे दाणे 
  • 1/2 चमचा तेल
  • चवीनुसार मीठ
  • 1 मोठा कांदा चिरून 
  • 2 सिमला मिरची चिरून 
  • 7-8 लसून पाकळ्या
  • 1 चमचा व्हाईट पेपर पावडर
  • 1 चमचा चीलीफ्लेक्स
  • 2 चमचा अमूल बटर
  • 2 चमचा मैदा
  • 2 कप दूध
  • 1 चमचा शेजवान सॉस
  • 1 चमचा ऑरेगॅनो
  • 50 ग्रॅम चीज

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात आधी एका भांड्यात पाणी घेऊन ते उकळवा. त्यामध्ये मीठ, 1/2 चमचा तेल घालून मग पास्ता उकळवा. सोबत मक्याचे दाणे पण उकडून घेणे
  • दुसऱ्या बाजूला कांदा चौकोनी आकारात कापून घ्या. तसंच गाजर, सिमला मिरची, फरसबी कापून घेणे आणि लसूण सोलून ठेवणे
  • पास्ता उकडला की पाणी काढून टाकणे. नंतर त्याला अर्धा चमचा तेल लावा आणि बाजूला ठेवा. जेणेकरून चिकट होऊन एकमेकांना चिकटणार नाही 
  • आता गॅसवर पॅन ठेवा त्यात 1 चमचा बटर घालून त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या, मिरची घाला आणि मीठ घालून परतवून एका डिशमध्ये काढून ठेवा
  • त्याच कढईत 2 चमचा बटर आणि 2 चमचा मैदा घाला आणि भाजून घ्या. त्यानंतर त्यात दूध घाला आणि उकळी काढा.
  • तुमचे व्हाईट सॉस तयार झाले की, त्यात व्हाईट पेपर अथवा काळी मिरी पावडर घालून मिक्स करा
  • सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर उकडलेला पास्ता आणि मक्याचे दाणे मिक्स करा. किसलेले चीज मिक्स करून पुन्हा ढवळा
  • एका बाऊलमध्ये काढून वरून ओरेगॅनो आणि चिलीफ्लेक्स घालून खायला द्या.

टोमॅटो पास्ता रेसिपी (Tomato Pasta Recipe In Marathi)

Tomato Pasta Recipe In Marathi

Tomato Pasta Recipe In Marathi

पास्ता रेसिपी म्हटलं की, फक्त चीज खाणं नकोसं होतं. पण त्यात आंबट टॉमेटोचा स्वाद असेल तर अजून हवंहवंसं वाटतं. अशीच घरच्या घरी पास्ता रेसिपी (Pasta Recipe In Marathi) करताना टॉमेटो पास्ता रेसिपी करून तुम्ही पाहा. 

साहित्य 

  • 150 ग्रॅम पास्ता
  • 1 कांदा चिरलेला 
  • 1 टोमॅटो चिरलेला 
  • 2 चमचे आले लसूण ठेचून
  • 1 चमचा तिखट
  • 1 चमचा टोमॅटो सॉस
  • 1 चमचा चिली सॉस
  • 1 चमचा सोया सॉस
  • 2 चमचे मिक्स हर्ब्ज
  • 1 चमचा जिरं
  • चवीनुसार मीठ
  • तेल

बनविण्याची पद्धत 

  • एका पॅनमध्ये तुमच्या आवडीचा पास्ता शिजवून घ्या. पास्ता शिजवताना त्यामध्ये तेल आणि मीठ घाला. शिजल्यानंतर पाणी काढून टाका
  • त्यानंतर एक कढई घ्या आणि त्यात तेल तापवा. त्यात जिरे घाला आणि तडतडले की, आले लसूण पेस्ट घालून परतून घ्या. त्यामध्ये चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून मिक्स करा.
  • हे सर्व मिक्स केल्यानंतर त्यात सोसा सॉस, चिली सॉस, मीठ घाला आणि पुन्हा शिजवून चांगले मिक्स करून घ्या
  • पाणी जरा आटले की त्यात तुम्ही शिजलेला पास्ता घाला आणि मिक्स करा. ते झाल्यावर मिक्स हर्ब्ज पण घाला आणि वरून चीज किसून घाला. पास्ता खाण्यासाठी तयार 

अधिक वाचा – (Puran Poli Recipes In Marathi)

पिंक सॉस पास्ता रेसिपी (Pink Sauce Pasta Recipe In Marathi)

Pink Sauce Pasta Recipe In Marathi

Pink Sauce Pasta Recipe In Marathi

तिखट, आंबट आणि मसालेदार अशी पास्ता रेसिपी (Pasta Recipe In Marathi) तुम्ही पिंक सॉस पास्तामध्ये वापरू शकता. दिसायला जितके आकर्षक तितकेच खायलाही मजेदार असणारा हा पास्ता कसा बनवायचा ते पाहूया. 

साहित्य 

  • 2 चमचे ड्राय बेसिल
  • 1 चमचा क्रंची गार्लिक
  • 1 चमचा चिली फ्लेक्स (तिखट तुम्हाला हवे असेल तितके)
  • 1 बाऊल झुकिनी
  • 1 बाऊल मशरूम
  • 10 चेरी टोमॅटो
  • 8-10 बेबी कॉर्न-
  • 300 ग्रॅम पास्ता
  • 200 ग्रॅम व्हाइट सॉस
  • 200 ग्रॅम रेड सॉस
  • 1/2 चमचा मिरी पावडर 
  • 10-12लसूण पाकळ्या

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात आधी सिझनिंग एकत्र करून घ्या आणि सर्व भाज्या बारीक चिरून घ्या
  • लसूण पाकळ्या सोलून बारीक ठेचून घ्या आणि बेबी कॉर्नही उकडून घ्या 
  • एका पातेल्यात पाणी घ्या. त्यात तेल आणि मीठ घाला आणि पास्ता घालून तो शिजवा आणि उरलेले पाणी काढून टाका
    दुसऱ्या भांड्यात तीन चमचे ऑलिव्ह ऑईल घाला. त्यात ठेचलेली लसूण घालून परता
  • त्यानंतर त्यात भाज्या घालून थोड्या कच्चट शिजवा. शिजत आल्यावर त्यात सिझनिंग घालून वाफ काढा 
  • नंतर त्यात मिरी पावडर, मीठ घालून मिक्स करून घ्या आणि वरून व्हाईट सॉस आणि रेड सॉस घालून व्यवस्थित मिक्स करा 
  • पास्ता पुन्हा एकदा नीट शिजवा आणि नंतर वरून किसलेले चीज घालून सर्व्ह करा 

पेस्तो पास्ता रेसिपी (Pesto Pasta Recipe In Marathi)

Pesto Pasta Recipe In Marathi

Pesto Pasta Recipe In Marathi

पेनी पास्ताचा वापर करून तयार करण्यात येणारी पेस्टो अर्थात पेस्तो पास्ता रेसिपी (Pasta Recipe In Marathi) खास तुमच्यासाठी. 

साहित्य 

  • 1 वाटी मोठी पेनी पास्ता
  • 25-30 काजू
  • 30 बेसिल पान
  • 1 चमचा मिरी पावडर
  • 1 चमचा चिली फ्लेक्स
  • 4 चमचे ऑलिव्ह ऑईल
  • चवीनुसार मीठ

बनविण्याची पद्धत 

  • पास्ता पाण्यात शिजत ठेवा. पास्ता शिजवताना मीठ आणि तेल घाला म्हणजे पास्ता मोकळा शिजतो. साधारण 15-20 मिनिट्सनंतर पास्ता शिजला की, पाणी काढून टाका.
  • मिक्सरमध्ये बेसिल, काजू, 2 चमचे तेल घालून आणि थोडं पाणी घालून पेस्ट करून घ्या 
  • दुसऱ्या बाजूला गॅसवर पॅन ठेऊन 2 चमचे तेल घाला. त्यामध्ये पास्ता, वाटलेले पेस्तो अर्थात पेस्ट, मीठ, मिरी, चिलीफ्लेक्स घालून साधारण पाच मिनिट्स परतून घ्या 
  • पास्ता तयार आहे. आवडत असल्यास त्यात लाल आणि पिवळी सिमला मिरची, ,झुकीनी, मशरूम, बेबी कॉर्न घाला. चवीला अधिक चांगले लागते

इटालियन पास्ता रेसिपी मराठी (Italian Pasta Recipe In Marathi)

Italian Pasta Recipe In Marathi

Italian Pasta Recipe In Marathi

मूळचा इटालियन असणारा पास्ता हा पदार्थ. त्यामध्येही अनेक प्रकार आहेत. पण सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रकार म्हणजे इटालियन पास्ता (Italian Pasta Recipe In Marathi). याची सहजसोपी रेसिपी. 

साहित्य 

  • 1 कप गव्हाचे पिठ
  • 3 छोटे आकाराचे उकडलेले बटाटे
  • 2 उकडून घेतलेल्या टॉमेटोची प्युरी
  • 2 कांदे चिरून 
  • 5-6 लसूण‌ पाकळ्या
  • 1 सिमला मिरची बारीक चिरलेली
  • 1 चमचा टोमेटो सॉस
  • 2 चमचे रेड चिलीफ्लेक्स
  • 1 चमचा मीठ
  • 2 चमचे लाल तिखट
  • 1 चमचा काळी मिरी पावडर
  • 1 चमचा गरम मसाला
  • 4 चमचे तेल
  • आवश्कतेनुसार पाणी

बनविण्याची पद्धत 

  • पहिल्यांदा बटाटे स्वच्छ धुवून उकडून घ्या. बटाटे थंड झाले की ते एका ताटात स्मॅश करून त्यात गव्हाचे पिठ घेऊन थोडे मीठ घाला. पाणी घाला आणि पीठ मळून घ्या.  या तयार केलेल्या कणकेचे छाटे गोळे करून त्यांना पास्ताचा आकार द्या आणि तुमचा तयार पास्ता बाजूला ठेवा
  • आता दुसऱ्या बाजूला गॅसवर पॅन ठेवा. त्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल घालून उकळी काढा. उकळल्यावर त्यात बनवलेले पास्ता घाला. पास्ता शिजल्यावर पाण्यावर तरंगू लागेल. त्यानंतर त्यातील पाणी काढून टाका
  • आता कढई गॅसवर ठेवा आणि त्यात तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यात चिरलेला कांदा, लसूण, सिमला मिरची घालून परतून घ्या. कांदा ब्राऊन झाल्यावर त्यात लाल तिखट, गरम मसाला, काळी मिरी पावडर, चिलीफ्लेक्स घालून परतून घ्या.
  • नंतर त्यात टोमेटो प्युरी घालून चांगली परतून टोमेटो सॉस आणि मीठ घालून परता. त्यानंतर त्यात पास्ता मिक्स करा आणि पाच मिनिट्स वाफ काढा 
  • गरमागरम पास्ता खाण्यासाठी तयार 

अधिक वाचा – सकाळच्या घाईत नाश्त्याला बनवा चविष्ट रव्याचे धिरडे, रवा चिला रेसिपी

रागी पेस्तो पास्ता रेसिपी मराठी (Ragi Pesto Pasta Recipe In Marathi)

Ragi Pesto Pasta Recipe In Marathi

Ragi Pesto Pasta Recipe In Marathi

मैदा, गव्हाचे पीठ हे पदार्थ काही जणांना आवडत नाहीत. तर काही जणांना अधिक हेल्दी खायचे असते. अशावेळी तुम्ही रागी अर्थात नाचणीच्या पिठाच्या पास्ताची रेसिपी करू शकता. रागी पेस्तो पास्ता रेसिपी (Pasta Recipe In Marathi) तुमच्यासाठी. 

साहित्य 

  • 100 ग्रॅम नाचणी पिठ
  • 50 ग्रॅम कोथिंबीर
  • 20 तुळशी अथवा बेसिलची पानं
  • चवीनुसार मीठ
  • दीड चमचे मिरे पूड
  • 30 ग्रॅम ऑलिव तेल
  • 4 काजूचे तुकडे
  • 4 बदामचे तुकडे
  • 2 चमचे किसलेले चीज
  • 5-6 लसूण पाकळ्या
  • 1 चिरलेला टॉमेटो

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात पहिले कोथींबीर, बेसिल अथवा तुळशीची पाने, लसूण, चीज, अर्धे ऑलिव्ह तेल, काजू, बदाम, एक चमचा मिरे पूड हे सर्व एकत्र करुन बारीक पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट अर्थात तुमचे पेस्टो सॉस तयार झाले
  • त्यानंतर नाचणीच्या पिठाची उकड काढा किंवा ज्वारीच्या पिठासारखे गरम पाण्यानी भिजवून घ्या आणि त्याच्या लाटून लांब पट्ट्या कापून घ्या. तुम्हाला पट्ट्यांचा आकार आवडत नसेल तर तुम्हाला हव्या त्या आकारातील पास्ता बनवून घ्या
  • पाणी उकळून त्यात थोडे मीठ घाला आणि नाचणीचा ताजा पास्ता पाच ते सात मिनिट उकळून घ्या. दुसरीकडे ऑलिव्ह तेल पॅन मधे घाला. चिरलेला टॉमेटो घाला आणि थोडा परता. त्यानंतर त्यात पास्ता घाला
  • आता तुमच्या चवीनुसार त्यात तयार केलेले पेस्तो सॉस घाला आणि अति घट्ट वाटत असल्यास, पाणी घाला आणि छान एकत्र करा 
  • एक दोन मिनिट्स वाफ काढून नंतर पास्ता सर्व्ह करा. तुम्हाला हवं असेल तर वरून चीज घाला

व्हेजिटेबल पास्ता रेसिपी इन मराठी (Vegetable Pasta Recipe In Marathi)

Vegetable Pasta Recipe In Marathi

Vegetable Pasta Recipe In Marathi

लहान मुलांना नुसती भाजी खा म्हटलं तर त्यांना ते शक्यच नसतं. पण अशा टेस्टी पास्तामधून भाज्या नक्कीच त्यांच्या पोटात जातात. मग अशावेळी व्हेजिटेबल पास्ता रेसिपी (Pasta Recipe In Marathi) कामी येते. 

साहित्य

  • 200 ग्रॅम कणीक (गव्हाची)
  • पाऊण चमचा मैदा
  • चवीनुसार मीठ
  • 1 चमचा ऑलिव्ह ऑईल
  • एक जुडी पालक
  • 5 ग्रॅम तुळशीची पाने
  • 5 ग्रॅम अक्रोड
  • 5 ग्रॅम काजू बदाम
  • 7-8 हिरव्या मिरच्या
  • 4-5 लसूण पाकळ्या
  • चवीनुसार मीठ
  • 1/2 चमचा चिली फ्लेक्स
  • 2 टॉमेटो चौकोनी आकारात कापलेले
  • 1 शिमला मिर्ची चौकोनी आकारात कापलेली
  • थोडीशी कोबी लांब कापून घेतलेली

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात आधी पास्ता तयार करण्यासाठी कणीक, मैदा, मीठ आणि तेल व आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या
    कणकेची लांबट लोळी करुन अर्ध्या अर्ध्या इंचाचे उभे काप करून घ्या आणि आता काटेरी चमचा घेऊन त्यावर
  • चमच्याच्या उलट्या दिशेने कापलेल्या कणकेचा काप ठेवा. त्याला समोरच्या बाजूने प्रेस करा आणि मागच्या बाजूने गुंडाळून घ्या. अशाप्रकारे आपल्याला पास्ता तयार करून ठेवायचा आहे
  • आता एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे मीठ आणि तेल घाला. पाण्याला उकळी आल्यावर केलेले पास्ता त्यात घाला आणि पाच मिनिटे शिजू द्या. पास्ता शिजले की ते आपोआप वरती येतात. आता चाळणीत ओतून त्यावर थंड पाणी घाला आणि हे पास्ता बाजूला ठेऊन द्या
  • आता पेस्तो साॅस बनविण्यासाठी पालक स्वच्छ धुवा आणि चिरून घ्या. पालक आणि तुळशीची पाने दोन मिनिट्स उकळून घ्या
  • उकळून घेतलेले पालक आणि तुळशी मिक्सरमध्ये घाला. त्यात लसूण पाकळ्या, काजू, बदाम, अक्रोड, मीठ, १ चमता तेल, हिरव्या मिरच्या घालून त्याची पेस्ट करून घ्या
  • दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये तेल घाला. चिली फ्लेक्स, कोबी आणि उकळलेला पास्ता त्यामध्ये घाला. हे करत असताना गॅसची फ्लेम फास्टच ठेवा. लगेच केलेला पेस्तो साॅस, मीठ, काळीमिरी पावडर, टॉमेटो, सिमला मिरची घालून व्यवस्थित शिजवा 
  • पास्ता तयार झाल्यावर चीज घालून सर्व्ह करा. 

मॅक अँड चीज पास्ता रेसिपी इन मराठी (Mac And Cheese Pasta Recipe In Marathi)

Mac And Cheese Pasta Recipe In Marathi

Mac And Cheese Pasta Recipe In Marathi

पास्तामधील सर्वात आवडता प्रकार म्हणजे मॅक अँड चीज पास्ता. मुलांना तर हा पास्ता खूपच आवडतो. यामधील चीजचा स्वाद अप्रतिम लागतो. पाहूया मॅक अँड चीज पास्ता रेसिपी (Mac And Cheese Pasta Recipe In Marathi)

साहित्य 

  • 1 कप शेल पास्ता
  • 2 चमचा मैदा
  • 1 कप मोझेरेला चिझ
  • 1 कप दूध
  • चवीनुसार मीठ
  • 1 चमचा बटर

बनविण्याची पद्धत 

  • पहिल्यांदा एका भांड्यात पाणी घालून उकळायला ठेवा. पाणी उकळले की त्यात शेल पास्ता घाला. पास्ता पंधरा मिनिट्स चांगला शिजवून घ्या. मग एका चाळणीत काढून त्यावर थंड पाणी घाला आणि बाजूला ठेवा 
  • मग एका पातेलीत बटर गरम करा. मग त्यात मैदा परतून घ्या आणि मग त्यात कोमट दूध घालून सतत फिरवत राहा. मैद्याच्या गुठळ्या होऊ देऊ नका. मग त्यात चवीुसार मीठ घालून सॉस शिजवून घ्या. सॉस शिजल्यानंतर त्यात शिजलेले शेल पास्ता घालून भरपूर चीज घाला. चीज किसून घ्या. 
  • एक मिनिट झाल्यावर गॅस बंद करा. गरम गरम पास्ता बाऊलमध्ये सर्व्ह करणे. सर्व्ह करताना वरून थोडे चीज घाला

घरच्या घरी तुम्हीही अशा प्रकारे पास्ता रेसिपी करून पाहू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला नक्की आम्हाला कळवा आणि सध्या घरात असल्यामुळे तुम्हाला या पास्ता रेसिपी ट्राय करून पाहायला काहीच हरकत नाही. 

You Might Also Like

Bread Pizza Recipe in English