ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
चॉकलेट, रिका अथवा रेग्युलर, कोणतं Wax आहे तुमच्यासाठी अप्रतिम, जाणून घ्या

चॉकलेट, रिका अथवा रेग्युलर, कोणतं Wax आहे तुमच्यासाठी अप्रतिम, जाणून घ्या

तुम्हाला प्रत्येक महिन्यात एकदा तरी वॅक्सिंग सेशन पार्लरमध्ये जाऊन करावं लागत असेलच. पार्लरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमची पार्लरवाली प्रत्येकवेळी Wax चा एक नवा पर्याय नक्कीच सांगत असेल ना? आपण आपल्या प्रत्येकालाच हा प्रश्न नेहमी पडतो की, चॉकलेट, स्ट्रॉबेरी अथवा व्हाईट, रिका वॅक्सने नक्की काय फरक पडतो? हा फरक पाहण्यासाठी कदाचित काही जणी वेगवेगळं वॅक्स करून पाहत असतील. पण नक्की या वॅक्समध्ये काय फरक आहे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रेग्युलर वॅक्स की अन्य कोणत्या वॅक्सची निवड करायला हवी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये तुम्हाला कोणत्या वॅक्समध्ये कमी दुखेल याबाबतही आम्ही माहिती देत आहोत.

कोणत्या प्रकारचं वॅक्स आहे तुमच्यासाठी चांगलं – Which Wax is Good for Skin?

तुमच्यासाठी नक्की कोणतं वॅक्स चांगलं आहे आणि वॅक्स म्हणजे नक्की काय असतं याची माहिती आपण जाणून घेऊया. नक्की कोणत्या प्रकारचं वॅक्स आपल्यासाठी चांगलं ठरू शकतं हे पाहूया.

रेग्युलर वॅक्स (Regular Wax)

Shutterstock

ADVERTISEMENT

लिंबू आणि साखरेच्या मिश्रणाने तयार होणारं हे साधारण वॅक्स अनेक वर्षांपासून चालत आलं आहे. बरेच जण कित्येक वर्षांपासून या मिश्रणानेच वॅक्स करतात. हे वॅक्स केल्याने केस तर मुळापासून निघतात पण या प्रक्रियेत तुम्हाला खूपच त्रास होतो. त्यामुळे यानंतर तुमच्या त्वचेवर लालसर डाग आणि पुळ्यादेखील येतात. शिवाय तुमची त्वचा जर संवदेनशील असेल तर रॅशेस आणि पुळ्या किमान 2 ते 3 दिवस तशाच राहतात. रेग्युलर वॅक्सने पातळ आणि लहान केस हे सहजपणे साफ होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला नेहमी वॅक्स करण्याची वेळ येते. एकदा वॅक्स केल्यास याचा अगदी चांगला परिणाम दिसून येत नाही. 

चॉकलेट वॅक्स (Chocolate Wax)

Shutterstock

चॉकलेट वॅक्स आणि अन्य कोणत्याही फ्लेवर्ड वॅक्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे वॅक्स कोको, सोयाबीन तेल, बदाम तेल, ग्लिसरीन, ऑलिव्ह ऑईल आणि विटामिन्ससारख्या तत्वानी मिश्रण तयार करण्यात येतं. तसंच या वॅक्समुळे तुमच्या त्वचेवर जळजळ होत नाही. त्वचेवर लालसरपणा अर्थात रॅशेस येण्याचीही शक्यता कमी असते. वास्तविक या वॅक्समुळे लहान केस काढून टाकले जाण्यासाठी मदत होते. याशिवाय यामुळे सनटॅन काढून टाकण्यास मदत होते. यामध्ये मिक्स केलेल्या तेलाच्या प्रमाणामुळे त्वचा मुलायम राखण्यास मदत होते. तसंच हे सर्व तऱ्हेच्या स्किन टोनसाठी सूटेबल आहे. अगदी संवेदनशील त्वचेसाठीही हे उपयुक्त आहे. त्वचेला हे अधिक चमकदार आणि मुलायम बनवतं. फक्त चॉकलेट वॅक्स हे रेग्युलर वॅक्सपेक्षा थोडं महाग असतं. 

ADVERTISEMENT

रिका वॅक्स (Rica Wax)

Shutterstock

रिका वॅक्सला व्हाइट चॉकलेट वॅक्स असंदेखील म्हटलं जातं. हे मेड इन इटली वॅक्स असून भाज्यांचंं तेल आणि हिरव्या पानांपासून बनवलं जातं. हे 100 टक्के तारपिनरहित वॅक्स असतं. तारपिन म्हणजे एक चिकट पदार्थ असतो जो पाईन आणि स्प्रूसच्या झाडांपासून तयार होतो. यामुळे तुमच्या त्वचेला अलर्जी आणि रॅशेस येण्याची शक्यता असते. त्यामुळे या वॅक्समध्ये ही गोष्ट नसल्याने त्याचा परिणाम त्वचेवर अतिशय चांगला होतो. हे वॅक्स इतर वॅक्सच्या तुलनेत गरम करावं लागत नाही. त्यामुळे त्वचेला हानी पोहचत नाही. तसंच याबरोबर त्वचा साफ करण्यासाठी एक प्रीवॅक्स जेलदेखील देण्यात येतं, जे त्वचेला आतपर्यंत जाऊन सुंदर होण्यास मदत करतं. यामध्ये एकाच वेळी सर्व केस काढून टाकण्याची क्षमता असते. त्यामुळे सतत वॅक्स करण्याची गरज भासत नाही. तसंच हे सर्व तऱ्हेच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. अगदी संवेदनशील त्वचेसाठीही याचा उपयोग होतो. त्वचेला अधिक चमकदार आणि मुलायम करण्यास याचा उपयोग होतो. इटलीवरून आयात करत असल्याने याची किंमत रेग्युलर वॅक्सच्या तुलनेत जास्त असते. 

आमचा सल्ला : रेग्युलर वॅक्स आता तसं तर खूप कमी प्रमाणात केलं जातं. आपल्याला जास्त नुकसान होणार नाही अशा तऱ्हेच्या वॅक्सची गरजच आपल्याला भासते. तसंच फ्लेवर्ड वॅक्स त्वचेवरून जिद्दी केस काढून टाकण्याचं काम करतात, जे पुन्हा लवकर येत नाहीत. त्यामुळे तुम्ही नेहमी पार्लरमध्ये गेल्यानंतर चॉकलेट अथवा अन्य वॅक्सचा वापर करा. रिका वॅक्स सर्व ठिकाणी उपलब्ध होत नाही. पण जिथे उपलब्ध असेल तिथे याचा वापर करणं योग्य आहे.

ADVERTISEMENT

हेदेखील वाचा

Waxing केल्यावर टाळा ‘या’ 7 गोष्टी!! – Post Waxing Care in Marathi

वॅक्स करण्यापूर्वी वॅक्सचे प्रकार तुम्हाला माहीत असायला हवे (Different Types Of Wax )

स्ट्रेच मार्क्स आणि एंटी एजिंग ट्रिटमेंटसाठी घ्या ‘हॉट कॅंडल वॅक्स मसाज थेरपी’

ADVERTISEMENT

 

 

02 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT