ADVERTISEMENT
home / मनोरंजन
कोरिओग्राफर रेमोने बायकोसाठी लाटण्याचा वापर न करताच बनवला ‘स्वीट पराठा’

कोरिओग्राफर रेमोने बायकोसाठी लाटण्याचा वापर न करताच बनवला ‘स्वीट पराठा’

लॉकडाऊन संपला तरी कोरोनाचा कहर काही कमी झालेला नाही. त्यामुळे अनेक सेलिब्रेटीज घरीच राहून आपापली कामं करत आहेत. कलाकार अशी घरची कामं करत असतानाचे बरेच व्हिडिओ गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच कोरिओग्राफर रेमो डिसूझानेही एक असाच मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. झालं असं की, रेमोच्या बायकोने त्याला तिच्या चीट डेसाठी स्वीट पराठा तयार करण्याची विनंती केली. रेमोचे त्याच्या बायकोवर म्हणजेच लिझेल डिसूझावर खूपच प्रेम आहे. बायकोची विनंती तो कशी नाही मान्य करणार. म्हणून मग त्याने तिने सांगताच लगेचच पराठा लाटायला सुरूवात केली. पण घाईघाईत त्याला पराठा लाटण्यासाठी लाटणंच मिळालं नाही. म्हणून त्याने चक्क ‘या’ गोष्टीचा वापर करत स्वीट पराठा तयार केला. 

Instagram

रेमोने असा तयार केला लिझेलसाठी पराठा

रेमोने या व्हिडिओसोबत त्याच्या इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं आहे की, “जेव्हा चीट डेसाठी तुमची बायको स्वीट पराठा मागते. मग अशा वेळी लाटणं मिळो अथवा नाही पराठा तर बनवावाच लागणार ना” या व्हिडिओमध्ये “अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का” हे गाणं बॅकग्राऊंडला सुरू आहे आणि रेमो चक्क काचेच्या ग्लासने पराठा लाटत आहे. अशा रितीने अनेकांना चित्रपटात आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा रेमो खऱ्या खुऱ्या जीवनात मात्र त्याच्या बायकोच्याच इशाऱ्यावर नाचतो हे चाहत्यांना कळून चुकलं आहे. या व्हिडिओवर त्याची पत्नी लिझेल डिसूझा हिने ” म्हणुनच आय लव्ह यू सो मच… तू तर माझा जिनी आहेस” अशी कंमेट दिली आहे. तर रेमोच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कंमेट्सचा पाऊसच पाडला आहे. मागच्या वर्षीच रेमो आणि लिझेलच्या लग्नाला वीस वर्षे पुर्ण झाली आहेत. वीस वर्षांचा हा सहवास आणि आनंद त्रिगुणीत करण्यासाठी त्याने मागच्यावर्षी पुन्हा एकदा शाहीथाटात लग्न केले होते. ज्यात बॉलीवूडमधील त्याचे खास मित्रमैत्रिणी सहभागी झाले होते. 

ADVERTISEMENT

रेमोचे सुपरहिट चित्रपट

रेमो डिसूझाच्या एबीसीडीचा सिक्वल म्हणजेच ‘स्ट्रीट डान्सर’ मागच्या वर्षी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट रेमोच्या ‘एबीसीडी’ या चित्रपटाचा हा तिसरा भाग होता. यापूर्वी त्याने ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी 2’  हे चित्रपट निर्माण केले होते. रेमोचे हे तिन्ही चित्रपट डान्स बेस्ड चित्रपट आहेत. या तिन्ही चित्रपटात वरूण धवन आणि श्रद्धा कपूर ही जोडी झळकली होती. रेमोने डान्सवर आधारित निर्माण केलेल्या या तिन्ही चित्रपटांना आतापर्यंत चांगले यश मिळाले आहे. रेमो लवकरच बॉलीवूडच्या मास्टरजी म्हणजेच दिवंगत कोरिओग्राफर सरोज खान यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण करणार आहे. ज्यामुळे त्याच्या या बायोपिकबाबत चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली आहे.

Instagram

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

चला सज्ज व्हा कपिल शर्मा येतोय पुन्हा एकदा तुम्हाला हसवायला

हिना खानने नाईट ड्रेस घालून केला हॉट व्हिडिओ शेअर, ट्रोलर्सचे तोंड केले बंद

सलमान खान फार्महाऊसवर करत आहे शेती, भर पावसात चालवला ट्रॅक्टर

ADVERTISEMENT
23 Jul 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT