तुळशीचे लग्न झाले. तुळशीच्या लग्नाच्या शुभेच्छा देऊन झाल्या की, लग्नाचे मुहुर्त सुरु होतात. आताचा सगळा सीझन हा लग्नाचा आहे. त्यामुळे सगळीकडे खरेदीला चांगलाच जोर आला आहे. कपड्यांची, सोन्याची खरेदी मोठ्याप्रमाणात होताना दिसत आहे. तुम्हीही या सीझनमध्ये म्हणजेच लग्नाच्या या सीझनमध्ये लग्न करण्याचा विचार करत असाल तर रंगाचे काही खास ट्रेंड फॉलो करायला हवेत. आम्ही या सीझनचे असे काही रंग तुम्हाला सांगणार आहोत. जे तुम्ही नक्कीच तुमच्या लग्नाच्या सीझनमध्ये कुठेतरी वापरायला हवेत. चला जाणून घेऊया असे रंग
लायलॅक (Lilac)
फिक्कट जांभळ्या रंगाची ही शेड सध्या चांगलीच चर्चेमध्ये आहे. डोळ्यांना सुखावणारा असा हा रंग खूप जणांच्या आवडीचा आहे. हा रंग लेहंगा आणि इंडो-वेस्टर्न आऊटफिटमध्ये अगदी सहज मिळू लागला आहे. या रंगाचा लेहंगा तुम्ही निवडला तर तुम्हाला त्यावर छान ज्वेलरी देखील निवडता येतात. मोती किंवा वेगवेगळ्या स्टोन्स ज्वेलरी या रंगावर फारच उठून दिसतात. तुमच्या जोडीदाराला त्यामुळे कोणताही लाईट रंग निवडण्याची मुभा मिळते.तुमचा जोडीदार पांढरा, मोती अशा शेड्समध्ये आरामात जाऊ शकतो. जर फिक्कट रंग तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अगदी हमखास या रंगाची निवड करा.
पीनट कलर (Peanut Colour)
पीनट अर्थात शेंगदाणा. तुम्ही टरफलातून शेंगदाणा काढून खाल्ला असेल तर त्याचे वेगवेगळे शेड तुम्हाला नक्कीच माहीत असेल. गुलाबी- चॉकलेटी याचा उत्तम समतोल साधलेला हा रंग दिसायला खूपच रिच आणि चांगला दिसतो. अगदी कोणत्याही स्किनटोनवर हा रंग उठून दिसणार नाही असे मुळीच होणार नाही. त्यामुळे हा रंगही सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या लेहंग्याचा रंग हा घ्यायचा असेल तर तुम्ही हा रंग निवडू शकता. याला थोडा बोल्ड लुक द्यायचा असेल तर तुम्ही त्यावर हेव्ही वर्क घेऊ शकता.
वाईन रंग (Wine Color)
वाईन रंग हा फॅशनच्या बाहेर कधीच जाऊ शकत नाही. विशेषत: काही ब्राईड्सना गडद रंग घालायला आवडतात. त्यांच्यासाठी हा रंग तर एकदम खासच आहे. जर तुम्हाला गडद रंग आवडत असेल तुम्हाला वाईन शेड घ्यायला काहीच हरकत नाही. या रंगावर तुम्हाला मोती आणि काही इमिटेशन ज्वेलरी वापरता येतात. असा लेहंगा घातल्यानंतर तुम्हाला आजुबाजूचे डेकोरेशन हे थोडे लाईट रंगाचे निवडावे लागते. त्यामुळे तुम्ही हा रंग घेण्याचा विचार करत असाल तर लग्नासाठीचे डेकोरेशन कसे असावे याचा देखील विचार करा.
हॉट पिंक (Hot Pink)
तुम्हाला गडद रंग निवडायचा असेल आणि तो ट्रेंडी हवा असे देखील वाटत असेल तर तुम्ही हॉट पिंक रंग निवडायलाही काहीच हरकत नाही. हा रंग खूपच चांगला उठून दिसतो. हॉट पिंक रंगावर तुम्हाला विरुद्ध म्हणजेच कॉन्ट्रास रंगाचे दुपट्टे किंवा ज्वेलरी निवडू शकता. या रंगाचा ब्लाऊज निवडताना ब्राईडल ब्लाऊजची निवड केली तर ते अधिक चांगे दिसतात.
आता तुम्हाला जर काही खास रंग हवे असतील आणि तुमचा खास दिवस खूपच खास करायचा असेल तर या रंगाची निवड करु शकता.