ADVERTISEMENT
home / फॅशन
पावसाळ्यात वापरा या रंगाचे कपडे, दिसाल अधिक सुंदर

पावसाळ्यात वापरा या रंगाचे कपडे, दिसाल अधिक सुंदर

पावसाळ्यात वातावरण प्रसन्न आणि  उत्साही असतं. सगळीकडे परसरेल्या हिरवाईचा गारवा आणि ताजेपणा वातावरणात असतो. अधुन मधून इंद्रधनुष्याचे सप्तरंग आपलं दर्शन घडवत असतात. अशा वातावरणात तुमचे मनही प्रसन्न आणि आनंदी असतं. निसर्गातील या रंगाप्रमाणेच आपण ज्या रंगाचे कपडे  वापरतो. त्याचाही परिणाम तुमच्या मनावर आणि व्यक्तिमत्त्वावर पडत असतो.  प्रत्येक ऋतूची एक खासियत असते. त्यामुळे अशा वातावरणात काही खास रंग जास्त उठून दिसतात. सध्या पावसाळा सुरू आहे. तर जाणून घ्या पावसाळ्यात कोणते रंग जास्त सुंदर दिसतात.

पावसाळ्यात कोणते रंग वापरावे –

प्रत्येकाचा एक आवडता रंग असतो. त्या रंगाचे कपडे घातले की मन प्रसन्न असतं आणि ती प्रसन्नता तुमच्या व्यक्तिमत्त्वातून दिसू लागते. यासाठी ऋतू कोणताही असो सर्वात आधी तुमच्या आवडीच्या रंगाचे  कपडे नक्की वापरा. याशिवाय या काही खास रंगाचा पावसाळी वॉर्डरोबमध्ये नक्की समावेश करा. शिवाय ऋतू कोणताही असो ‘या’ गोष्टी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्या

  • पावसाळ्यात नेहमीपेक्षा बोल्ड आणि कलरफुल कपडे घालावेत. ज्यामुळे तुम्ही पावसाळ्यात जास्त फॅशनेबल आणि ट्रेंडी दिसू शकता.
  • हिरवा आणि निळा रंग हा निसर्गाचा प्रतिक आहे. पावसाळ्यात या रंगाच्या छटा सर्वत्र पाहायला मिळतात. शिवाय कोणत्याही कॉम्बिनेशनमध्ये या रंगांना मिसळता येतं. विशेष म्हणजे हे रंग तुमच्या स्कीन टोनवर असे रिफ्टेक्ट होतात की तुमचा स्कीन टोन  आहे त्यापेक्षा जास्त उजळ दिसतो. ज्यामुळे तुम्ही सतत फ्रेश दिसतात. 
  • तुम्हाला सतत बाहेर फिरावं लागत असेल तर पावसाळ्यात पाणी, चिखल आणि इतर गोष्टींपासून वाचण्यासाठी काळा रंग नक्कीच सोयीचा ठरेल. कारण या रंगामुळे तुमचे कपडे जास्त खराब होणार नाहीत आणि जरी झाले तरी ते पटकन मळलेले दिसणार नाहीत. ट्रॅव्हल करताना दिसायचं आहे स्टायलिश तर असे कॅरी करा कपडे
  • जर तुम्हाला पावसाळी पिकनिकला जायचं असेल आणि वातावरणाप्रमाणे थोडा कूल लुक करायचा असेल. तर  फ्लोरोसंट अथवा नियॉन रंगाचे कपडे वापरा. ज्यामुळे तुम्ही सतत फ्रेश आणि उत्साही दिसाल. 
  • पांढरा रंग लवकर खराब होत असला तरी पावसाळ्यात हा रंग खूप छान दिसतो. यासाठी थोडी काळजी घेत काही खास कार्यक्रमांसाठी पांढऱ्या रंगाची फॅशन करायला काहीच हरकत नाही. मात्र पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे परिधान करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
  • इतर वेळी तुम्ही मरून, चॉकलेटी. ब्राऊन  रंगाचे कपडे वापरू शकता. कारण हा रंग पावसाळ्यात जास्त खराब होत नाही. यासाठी जंपसूट, ऑफ शोल्डर टॉप्स किंवा मॅक्सी गाऊन तुम्ही या रंगाचे नक्कीच निवडू शकता.
  • पीच कलर कोणत्याही रंगाच्या स्कीन टोनवर छान दिसतो. शिवाय पावसाळ्यासाठी हा रंग अगदी क्लासिक वाटू शकतो. यासाठी जर तुम्हाला शॉपिंग अथवा मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जायचं असेल तेव्हा तुम्ही पीच रंगाचा ड्रेस निवडू शकता. मात्र अशा रंगावर परफेक्ट अॅक्सेसरीज कॅरी करायला विसरू नका. 

आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुमचा आवडता रंग कोणता हे आम्हाला कंमेट बॉक्समधून जरूर कळवा.

05 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT