पांढरा रंग कोणत्याही व्यक्तीवर खुलून दिसतो त्यामुळे सर्वांनाच पांढरा रंग विशेष आवडत असतो. तुम्ही पांढऱ्या रंगाचे इंडिअन विअर परिधान करा वा वेस्टर्न विअर तुम्ही या कपड्यांमध्ये छानच दिसता. सहाजिकच प्रत्येकाच्या वार्डरोब कलेक्शनमध्ये काही कपडे खास पांढऱ्या रंगाचे असतातच. व्हाईट शर्ट कोणत्याही बॉटमवर मॅच होतो, व्हाईट कुर्तीवर जीन्स अथवा रंगीत दुपट्टा घालता येतो, एवढंच नाही पांढऱ्या शुभ्र साडीवर मॅचिंग ब्लाऊजची गरज लागत नाही. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनानिमित्त शांतीचा प्रतिक असलेला सफेद रंग तर सगळीकडेच उजळून निघतो. उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमुळे उकाडा कमी जाणवतो आणि डोळ्यांना आराम मिळतो. मात्र असं असलं तरी पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्यावर विशेष काळजी घ्यावीच लागते. यासाठीच जाणून घ्या काही खास फॅशन टिप्स आणि काही नियम जे या रंगाच्या कपड्यांवर फॉलो करायलाच हवे. यासोबतच वाचा ऋतू कोणताही असो ‘या’ गोष्टी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्या
परफेक्ट लुकसाठी पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्यावर हे नियम अवश्य पाळा
पांढऱ्या रंगाचे कपडे कधीच आऊटडेटेड होत नाहीत. त्यामुळे तुमच्या वॉर्डरोबमध्ये एक तरी व्हाईट शर्ट, टीशर्ट, ड्रेस, कुर्ता आणि साडीही असतेच. मात्र सफेद रंगाचे कपडे घालण्यासाठी फॅशनच्या ग्लॅमरस दुनियेत काही खास नियम आहेत. तेव्हा तुमच्या आवडत्या रंगाचे हे कपडे घालण्यापूर्वी तुम्हाला हे नियम माहीत असायला हवे.
जास्त मॅचिंग करण्याचा अट्टहास नको –
व्हाईट रंगासोबत इतर रंगाचे मिक्स मॅच नक्कीच चांगले दिसते. मात्र जास्त मॅचिंग करण्याचा प्रयत्न करू नका. बऱ्याचदा असं मिक्स मॅच करण्याच्या प्रयत्नात तुमचा लुक खराब होण्याची दाट शक्यता असते. यासाठी फक्त एखादा रंग यासोबत मॅच करा आणि दिसा परफेक्ट. जर वेस्टर्न आऊटफिट परिधान करणार असाल तर स्टायलिश दिसण्यासाठी व्हाईट शर्ट असा करा कॅरी
फिटिंग योग्यच असायला हवी –
पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे परिधान करताना सर्वात म हत्त्वाचा नियम हा आहे की तुमचे कपडे योग्य फिटिंगचे असावे. कारण पांढऱ्या रंगाचे ढगळ कपडे मुळीच चांगले दिसत नाहीत. शिवाय त्यामध्ये तुम्ही खूपच ओव्हरवेट वाटू शकता.
ड्रेस घालण्यापू्र्वीच मेकअप करा –
पांढरा रंग हा एक असा रंग आहे ज्यावर एखादा छोटासा डागही अगदी उठून दिसू शकतो. त्यामुळे पांढऱ्या रंगाचे कपडे लवकर खराब होतात. पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्यावर जर तुम्ही मेकअप केला तर फाऊंडेशन, लिपस्टिक, पावडर, काजळ, हायलायलर अशा कोणत्याही मेकअप प्रॉडक्टचे डाग त्यावर लागू शकतात. शिवाय सफेद कपडे घालणार असाल तर मेकअप थोडा कमीच करा. नॅचलर मेकअप यासोबत जास्त खुलून दिसेल.
लिपस्टिकची शेड परफेक्ट निवडा –
जरी तुम्ही पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटवर जास्त मेकअप केला नाही तरी फक्त लिपस्टिक लावूनही तुम्ही परफेक्ट दिसू शकता. मात्र यासाठी लिपस्टिक योग्य रंगाची निवडा. अशा लूकवर रेड, वाईन, ब्राऊन, चेरी, पिंक अशा गडद रंगाच्या लिपस्टिक निवडा.
ज्वैलरी कॅरी करताना राहा सावध –
व्हाईट कलरच्या आऊटफिटवर तुम्ही सिंपल गोल्ड अथवा डायमंड ज्वैलरी नक्कीच परिधान करू शकता. यासाठीच जाणून घ्या हिऱ्याविषयी ’10’ आश्चर्यकारक तथ्य. शिवाय सफेद रंगावर सिल्व्हर, ऑक्साडाईज ज्वैलरीही उठून दिसते. मात्र व्हाईट आऊटफिटवर जास्त ज्वैलरी कॅरी करू नका. छोटे कानातले, चैन आणि पेंडट, ब्रेसलेट अथवा डायमंड रिंग असे दागिने जरूर वापता.
आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या या फॅशन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम