कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. सर्वसामान्याप्रमाणेच अगदी सर्व सेलिब्रेटीजच्या आयुष्यावरही या लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वांना आपल्या घरात कोंडून राहवं लागत आहे. शिवाय त्यामुळे चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग पूर्णपणे ठप्प झालं आहे. सुरक्षेसाठी सध्या कोणाकडेही मदतनीस अथवा मेड येत नाही आहेत. त्यामुळे सेलिब्रेटीजनादेखील स्वतःची कामे स्वतःच करावी लागत आहेत. असं असलं तरी सोशल मीडियावर मात्र हे सेलिब्रेटीज सध्या फारच अॅक्टिव्ह झाले आहेत.कारण प्रत्येकजण घरातील अॅक्टिव्हिटीज या माध्यमातून शेअर करत आहेत. कोणी भांडी घासत आहे, कोणी स्वयंपाक करत आहे तर कोणी चक्क लादी पुसत आहे. नुकतंच कॉमेडियन भारती सिंहने लादी पुसत असलेला तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आणि त्यामागची संकल्पना ऐकून कोणालाही नक्कीच हसू येईल.
भारती सिंहचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू
कॉमेडियन भारती सिंह जी तिच्या विनोदातून सर्वांना हसवते ती या व्हिडिओमध्ये अक्षरशः रडकुंडीला आलेली दिसत आहे. याचं कारण असं की तिला आता तिच्या घरची लादीदेखील पुसावी लागत आहे. घरातील सर्व कामं करून हैराण झाल्याने भारतीने हा व्हिडिओ तयार केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करताना तिने त्याला एक विनोदी कॅप्शनपण दिली आहे. या व्हिडिओखाली तिने शेअर केलं आहे की, “काही दिवसांपूर्वीच मी हर्शला सांगत होती की आपलं घर जरा लहान पडत आहे तर आपण लवकरच एक मोठं घर घेऊया. मात्र आता मी त्याला असं मुळीच सांगणार नाही. खरंच एकदा घरातील कामं करून बघा तुम्हालाही कारण नक्कीच कळेल ” भारतीने शेअर केलेल्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारण हा व्हिडिओ सध्या प्रत्येकाच्या घरातील वातावरणासोबत मिळता जुळता आहे. कॉमेडियन नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी काही तरी मनोरंजक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्याच्या परिस्थितीमुळे घरात अडकून पडली असली तरी भारती सिंह तिच्या चाहत्यांना हसवण्यासाठी प्रयत्न या माध्यमातून करतच आहे. ज्यामुळे चाहत्यांकडून तिच्यावर अशाप्रकारे प्रेमाचा वर्षाव होत आहे.
भारती आणि हर्षचं सुखी कुटुंब
कॉमेडियन भारती सिंहने स्क्रिप्ट रायटर हर्ष लिंबाचिया यांच्याशी लग्न केलं आहे. आता या दोघांच्या लग्नाला जवळजवळ अडीच ते तीन वर्ष पूर्ण होतील. दोघेही आपल्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात खुश आहेत. हर्ष आणि भारतीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांची लव्हस्टोरीदेखील खासच होती. हर्ष आणि भारती अनेक कॉमेडी शो मध्ये एकत्र काम करतात. शिवाय सोशल मीडियावरदेखील सतत टिकटॉक व्हिडिओ करून ते त्यांच्या चाहत्यांचे नेहमीच मनोरंजन करतात. काही दिवसांपूर्वी भारती प्रेग्ननंट असल्याच्या अफवा येत होत्या. मात्र सध्या हे दोघेही त्यांच्या करिअरवर लश्र केंद्रित करत असल्याचं भारतीने स्पष्ट केलं होतं. शिवाय लवकरच आम्ही बाळाचा विचार करू असंही तिने सांगितलं होतं.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –
Video : सोशल मीडियावर अभिनेत्री कंगनाने केला धक्कादायक खुलासा
अजय देवगणच्या निसाला कोरोनाची लागण, काय म्हणाला अजय
गायिका कनिका कपूरचा कोरोनाचा चौथा रिपोर्टही आला पॉझिटिव्ह