ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
रागावर नियंत्रण मिळवायचे असेल तर आताच लावून घ्या या सवयी

रागावर नियंत्रण मिळवायचे असेल तर आताच लावून घ्या या सवयी

राग आला की, काही जणांना तो आवरताच येत नाही. चिडणे, मारणे, शिवीगाळ करणे किंवा एखाद्याशी हिंसा करणे इथपर्यंत काहींचा राग जातो. असा राग आरोग्यासाठी आणि समाजासाठी अजिबात चांगला नाही. तुम्हालाही असा राग येत असेल तर तुम्ही वेळीच स्वत:ला आवरायला हवे. रागावर नियंत्रण मिळवणे हे सोपे नसले तरी अशक्य नाही. काही गोष्टी नियमित करुन रागावर नियंत्रण मिळवता येते. सतत येणारा राग जर कमी करायचा असेल तर तुम्ही आताच काही सवयी लावून घ्या ज्याचा तुम्हाला फायदा होईल.

लिहते व्हा

जर तुम्हाला लिहण्याची सवय असेल तर फारच उत्तम. कधी कधी एखाद्या गोष्टीचा राग आला की, तो सगळ्यांवर व्यक्त करणे गरजेचे नसते आणि तो राग व्यक्त करता ही येत नाही. अशावेळी तुम्ही एका डायरीवर आपल्या खटकत असलेल्या काही गोष्टी लिहून काढा. म्हणजे तुम्हाला थोडं शांत व्हायला मदत मिळेल. कधी कधी शांत राहिल्यानंतर आणि गोष्टी लिहित गेल्यानंतर आपण एखाद्या गोष्टीमध्ये कसे चुकलो हे कळून येते. त्यामुळे आपणच आपला विचार करुन राग नियंत्रणात आणतो. लिहिण्याची ही सवय ही केवळ राग शांत करण्यासाठीच नाही तर तुमच्या विचारांनाही चांगले करण्याचे काम करते.

आवडीच्या व्यक्तिशी बोला

राग येणाऱ्या व्यक्ती या फार कमी लोकांशी बोलणे पसंत करतात. पण असा एकलकोंडेपणा तुमच्यामधील द्वेष आणखी वाढवू शकतो. इतरांना समजून घेण्याची तुमची समज त्यामुळे कमी झालेली असते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुमच्या आवडीच्या व्यक्तिंच्या कायम संपर्कात राहा. कधीकधी तुमच्या प्रियजनांच्या प्रेमामुळेही तुम्हाला रागावर नियंत्रण मिळवणे फार सोपे जाते. आपण कितीही रागात असलो तरी जवळच्या व्यक्तीवर तसा राग काढू शकत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला राग येत असेल त्यावेळी आपल्या आवडीच्या व्यक्तिशी बोला.

मिक्सर अथवा फूड प्रोसेसर वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात, लवकर नाही होणार खराब

ADVERTISEMENT

शॉपिंग करा

शॉपिंग हा खिशाच्या दृष्टिकोनातून चांगली सवय नसली तरी देखील कधी कधी राग अनावर होतो. तेव्हा सेफ झोनमध्ये जाणे फार गरजेचे असते. बरेचदा असे प्रसंग येतात त्यावेळी कशात तरी मन गुंतवून ठेवावे असे वाटत राहते. पण मन कुठे गुंतवावे हे कळत नाही अशावेळी थेट मॉल किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टीची खरेदी करा. तुम्हाला नव्या कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत याचा विचार करा म्हणजे मग वाईट गोष्टी निघून जाण्यास मदत मिळेल. ज्या वेळी अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडत असेल त्यावेळी तुमच्यासाठी असा वेळ काढा.

चुकीच्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी करायलाच हव्यात

खा आणि राग घालवा

खाण्याची सवय ही इतरवेळी त्रासदायक असली तरी देखील राग आल्यानंतर तो राग घालवण्यासाठी खाण्याची सवय ही नक्कीच चांगली आहे. जर तुम्ही तुमच्या आवडीची गोष्ट खाऊन तुम्हा राग शांत केला तर नक्कीच तुम्हाला थोडे बरे वाटू शकेल. त्यामुळे काही राग आला असेल तर आपल्या आवडीची वस्तू खाऊन तुमचा राग घालवा. 

आता या गोष्टी राग आल्यानंतर केल्या की नक्कीच तुम्हाला रागावर नियंत्रण मिळवता येईल.

ADVERTISEMENT

हापूस आंब्याचे चाहते, आंबा घेताना एकदा या गोष्टी वाचा

18 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT