हापूस आंब्याचे चाहते, आंबा घेताना एकदा या गोष्टी वाचा

हापूस आंब्याचे चाहते, आंबा घेताना एकदा या गोष्टी वाचा

साधारण मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत बाजारात हापूस आंबे यायला सुरुवात होते.खूप जणांना बाजारात आंबे आले की, आल्या आल्या खायचे असतात. मग ते कितीही महाग असतो. सीझनचा पहिला आंबा खाणे हे खूप जणांसाठी महत्वाचे असते. आंब्याच्या बाबतीत तुम्ही करत असाल अशी घाई तर आंबा विकत घेताना काही गोष्टी तुम्हाला नक्कीच माहीत असायला हव्या. सीझनच्या आधी घेतलेल्या आंब्यामध्ये बरेचदा फसवणूक होण्याची शक्यता असते. असे आंबे खराब निघतात. त्यांना फारशी चव नसते. अशावेळी आंब्याची पेटी महाग घेऊनही जीभेचे चोचले काही पूर्ण होत नाही. सीझनच्या आधी आंबा घेत असाल तर काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा म्हणजे तुमचे नुकसान होणार नाही.

अस्सल हापूस आंबे ओळखण्याची ही योग्य पद्धत

आंबा कुठला?

हल्ली हापूस आंबा सगळीकडेच पिकवला जातो. पण हापूस म्हटला की, देवगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग अशा वेगवेगळ्या कोकणातील गावांची नाव आवर्जून घेतली जातात. पण तुम्हाला माहीत आहे का? कोकणातील वेगवेगळ्या भागात पिकवल्या जाणाऱ्या या आंब्यांची चव ही त्या त्या परीसराप्रमाणे बदलत जाते. फळाचा आकार, फळाची चव, रंग असे सगळे बदलते. त्यामुळे आंबा घेताना तो आंबा कुठला आहे हे आधी विचारुन घ्या. तरच तुम्हाला हा आंबा कसा असेल याचा अंदाज येईल. त्यामुळे आंबा घेताना घाई करु नका 

तुम्हाला आहे का हापूस आंब्याची ओळख

आंब्याच्या बाबतीत खूप वेळा फसवणूक केली जाते. खूप जण हापूस आंब्याच्या नावाखाली झाडी आणि रायवळ आंबे विकतात. जर तुम्हाला याची ओळख नसेल तर हापूस आंबा कसा ओळखायचा ते देखील जाणून घ्या. आंबे सुरुवातीच्या काही दिवसात खूपच महाग असतात. साधारण 5 हजारांहून अधिक त्याची किंमत असते.  त्यामुळे एक एक आंबा नीट  बघून घ्या.म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही. 

गुढीपाडव्यासाठी करा घरच्या घरी सोप्या पद्धतीने श्रीखंड

Instagram

ऑरगॅनिक पिकवलेले आंबे 

आंबे विक्रेते आंबा बाजारात लवकर उतरवण्यासाठी इतकी घाई करतात की, त्यामुळे बरेचदा आंबा केमिकल घालून पिकवला जातो. केमिकल घालून पिकवलेले आंबे हे बेचव लागतात. त्याल काहीच चव लागत नाही. हे आंबे गोड लागत नाही. पहिला आंबा खरेदी करताना तुम्ही तुमच्या माहितीच्या आंबेवाल्यांकडून घ्या. कारण जर तुम्ही ओळखीचे असाल तर तुम्हाला योग्य आणि आंबा मिळेल. ऑरगॅनिक पिकवलेला आंबा जरी तुलनेने कमी गोड असला तरी त्याची चव ही नॅचरल लागते. त्यामध्ये एक वेगळाच गोडवा असतो. 


डागाळलेले आंबे 

अवकाळी पाऊसामुळे बरेचदा आंब्यावर परिणाम होते. आंबे हे डागाळलेले असतात. आतून आंबा खराब आहे हे बाहेरुन काही दिसत नाही. बाहेरुन फळ हे नेहमीच चांगले दिसते. त्यामुळे आंबा घेताना तुम्हाला आंब्याची रिप्लेस्मेंट मिळणार की नाही ते पण माहीत करुन घ्या. कारण लवकर पिकलेले आंबे हे बरेचदा खराब असतात. डझनामागे त्याची संख्या जास्त असेल तर मात्र तुम्ही आधीच त्याबद्दल बोलून घेतले तर बरे. 

 

आता लवकर हापूस आंबा घ्यायचा विचार करत असाल तर या काही गोष्टी कायम लक्षात ठेवा.

कोकणातील या पदार्थांमुळे येईल तुम्हाला 'गावची आठवण'