पावसाळा सुरु झाला की मस्त काहीतरी चटपटीत खाण्याचा मूड होऊ लागतो. पण आता हे चटपटीत पदार्थ वडा, भजी आणि चिकन यांच्या पुरते मर्यादित राहिलेले नाही. कारण पावळ्यात मिळणाऱ्या खास मक्याच्या कणसापासून आम्ही काही खास रेसिपीज शोधून काढल्या आहेत. या रेसिपी तुम्हाला रोज किंवा एखाद्या फॅमिली गॅदरींच्यावेळी करता येतील या रेसिपी इतक्या मस्त लागतात की तुमच्या घरी आलेले पाहुणे हे पदार्थ खाऊन एकदम खूश होऊन जातील. जाणून घेऊया कॉर्नच्या हटके रेसिपीज
लुसलुशीत ढोकळा बनवायचा असेल तर वापरा सोप्या ट्रिक्स
कॉर्न चटपटे
कॉर्न चटपटे करणे हे खूपच सोपे आहे. ही रेसिपी करण्यासाठी तुम्हाला साहित्यही फार कमी लागते.
साहित्य: 1 स्वीट कॉर्न, 1 बारीक चिरलेला कांदा- टोमॅटो, आरआरुट, चाट मसाला, लाल तिखट, मीठ, तेल
कृती:
- स्वीट कॉर्न घेऊन त्याचे दाणे काढून घ्या. त्यामध्ये आरारुट पावडर घालून तेल गरम करुन त्यामध्ये ते तळूण घ्या.
- एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा- टोमॅटो, चाट मसाला, लाल तिखट घालून ते सगळे एकजीव करा.त्यामध्ये तळलेले कॉर्न टाकून सगळं एकजीव करुन मस्त चहासोबत ही रेसिपी सर्व्ह करा.
पावसाळ्यात हमखास ताव मारायला हवा या पदार्थांवर
बटरी कॉर्न
जर तुम्हाला बटर लावलेला कॉर्न खायची इच्छा असेल तर तुम्ही ही बटरी कॉर्न रेसिपी करु शकता.
साहित्य:
मक्याचे कणीस, बटर, मीठ, लाल तिखट
कृती :
- मक्याचे कणीस चांगले भाजून घ्या. गरम गरम कणसाला कडक बटर लावून त्यामध्ये लाल तिखट, मीठ लावून असे मस्त कणीस खा.
- जर तुम्हाला कणीस अधिक क्रिस्पी हवे असेल तर तुम्ही थोड्यावेळ बेक्ड करा. अशी रेसिपी मजा आणते.
चिकन खायची इच्छा होत असेल तर असे करा मस्त ग्रीन सुकं चिकन
कॉर्न कुरकुरे
कॉर्नची भजी ही नेहमीच उत्तम लागते. कॉर्नच्या उपयोगाने केलेली रेसिपी खाल्ल्यानंतर तुम्हाला इतर भजी खाण्याची इच्छा होणार नाही.
साहित्य: कॉर्नचे दाणे, आरारुट पावडर, मीठ, तेल, चाट मसाला, लाल तिखट, मैदा
कृती:
- एका भांड्यात कॉर्नचे दाणे घेऊन त्यामध्ये सगळे साहित्य एकत्र करुन घ्यावे. कढईत तेल गरम करुन त्यामध्ये भजीप्रमाणे हे बॅटर हळुहळू सोडा.
- आता कॉर्नपासून या रेसिपीज तयार करा आणि खा.
आता घरी कॉर्न आणि अशा वेगवेगळ्या रेसिपीज नक्की ट्राय करुन पाहा. या शिवाय तुम्हालाही काही रेसिपी येत असतील तर आम्हाला नक्की पाठवा.