ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
cotton-saree-classy-look-for-office-in-summer-in-marathi

कॉटनच्या साड्या ज्या ऑफिसमध्येही देतील क्लासी लुक

लग्न असो वा ऑफिस साडी एक असे आऊटफिट आहे अथवा अशी फॅशन आहे जी कुठेही आणि कधीही कॅरी करता येऊ शकते. लग्नसराईसाठी साड्यांचे अनेक प्रकार असतात, मात्र उन्हाळ्याच्या दिवसात कोणत्याही समारंभात अथवा ऑफिसमध्ये तुम्हाला साडी नेसायची असेल तर कॉटनची साडी हा उत्तम पर्याय आहे. अत्यंत हलकी आणि तितकीच प्रभावी अशी कॉटनची साडी, ज्यांनी बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही भुरळ घातली आहे. कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जाड भरजरी आणि खूप बोजड साड्या नेसण्यापेक्षा कॉटनच्या साड्यांचा (Cotton Saree) लुकही छान दिसतो आणि ही सांभाळायला पण सोपी जाते. ज्यांना साडी कशी नेसावी हे पण माहीत नसेल अशा व्यक्तींनाही कॉटनची साडी व्यवस्थित कॅरी करता येते. तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी साडी नेसायची असेल तर कॉटनच्या साडीबाबत काही स्टायलिंग टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जे तुम्हाला अत्यंत क्लासी लुक (Classy Look) देण्यास मदत करतील.  

प्लेन कॉटन साडी (Plain Cotton Saree)

कॉटन साडी अनेक महिलांना अत्यंत साधी वाटते. पण कॉटनच्या साडीतही तुम्हाला स्टायलिश लुक करता येतो. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या कॉटनच्या साड्या बाजारामध्ये निवडू शकता. तुम्हाला डिझाईनर ब्लाऊज आणि प्लेन कॉटन साडी असाही लुक करता येईल. स्टायलिश ब्लाऊजसह साधी कॉटनची साडीही तुमचा लुक बदलते. ऑफिसच्या पार्टीसाठी अथवा तुम्हाला एखाद्या मीटिंगसाठीही असा स्टायलिश लुक करून जाता येतो. मुळात कॉटनची साडी ही उन्हाळ्यात अंगाला व्यवस्थित फिट बसते आणि तुम्हाला गरमही होत नाही. 

प्रिंट्स चेक्स कॉटन साडी (Prints Checks Cotton Saree)

ऑफिसमध्ये स्टायलिश आणि सुंदर लुकसाठी तुम्ही प्रिंट्स चेक्स साडीचा वापर करून घेऊ शकता. साडीसह तुम्ही प्रिंटेड कॉन्ट्रास्टिंग ब्लाऊज घाला. जो अत्यंत युनिक दिसतो. युनिक कलर कॉम्बिनेशन साडीमध्ये तुम्हाला अत्यंत चांगला लुक करून घेता येतो. ग्रेसफुल लुकसाठी तुम्ही अत्यंत लाईट आणि मिनिमल मेकअप करा आणि दिसा अधिक आकर्षक!

व्हाईट कॉटन साडी (White Cotton Saree)

पांढऱ्या रंगाची कॉटन साडी ही नेहमीच आकर्षक लुक देण्यास मदत करते. यावर जर एखादा डिझाईनर ब्लाऊज असेल तर या साडीला आणि तुमच्या सौंदर्यालाही अधिक चांगला लुक मिळतो. तसंच तुम्ही हे कॅज्युअल वेअर पासून अगदी नियमित वेअरमध्येही घालू शकता. पांढऱ्या कॉटनच्या साडीसह तुम्हाला कोणत्याही गडद रंगाचा ब्लाऊज अधिक उठावदार दिसतो. तर कोणताही कॉन्ट्रास्ट रंग तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने कॅरी करू शकता. तर साडीसह लाईट मेकअप आणि हाय हिल्स असेल तर तुमचा लुक अधिक उठावदार आणि आकर्षक दिसेल. 

ADVERTISEMENT

तांत कॉटन साडी (Tant Cotton Saree)

तुम्हाला कॉटन साडी नेसायची असेल तर तुम्ही तांत साडी नेसू शकता. ही साडी पश्चिम बंगालमध्ये अधिक प्रमाणात नेसली जाते. ऑफिसमध्ये जाणे असो अथवा ऑफिसची पार्टी असो तुम्ही अशा लुकची साडी नेसल्यास, तुम्हाला चांगला लुक मिळू शकतो. या साड्यांमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक असे उत्तम डिझाईन्स मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन निवडून साडी नेसू शकता. 

प्रिंटेड साडी (Printed Saree)

कॉटनची प्रिंटेड साडी प्रत्येक वयाची महिला नेसू शकते. या साड्या अत्यंत सॉफ्ट आणि हलक्या असतात. या साड्या तुम्ही उन्हाळ्यात नेसल्यास, तुम्हाला अत्यंत आरामदायी वाटतं. ऑफिसमध्ये स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रिंटेड कॉटनच्या साड्या नेसू शकता. यामध्ये तुम्ही साडी आणि त्यासह कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालू शकता. याशिवाय यावर तुम्ही साधी आणि सोपी हेअरस्टाईल केल्यास, तुमच्या लुकमध्ये अधिक चांगली भर पडते. यासह तुम्ही स्लीव्हलेस ब्लाऊजदेखील घालू शकता. 

कलरफुल कॉटनची साडी (Colorful Cotton Saree)

कलरफुल कॉटन साडी दिसायला अत्यंत सुंदर दिसते आणि नेसायला, तसंच वावरायलाही अत्यंत आरामदायी असते. उन्हाळ्यात तुम्ही लाईट रंगाची कॉटन साडी नेसू शकता. कारण या ऋतूत लाईट रंग घातल्याने शरीराला थंडावा मिळतो. ऑफिससाठी अशी रंगबेरंगी अर्थात कलरफुल साडी अत्यंत चांगली दिसते. 

उन्हाळ्यात तुम्हाला अत्यंत आरामदायी वाटावे आणि ऑफिसमध्येही तुम्हाला नेसायला कम्फर्टेबल असावे यासाठी तुम्ही कॉटनच्या साडीचा आधार तुमच्या फॅशनसाठी करून घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

25 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT