logo
ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
सध्या घरात फ्रोझन फूडचा पर्याय, चटपटीत पदार्थांची रेलचेल

सध्या घरात फ्रोझन फूडचा पर्याय, चटपटीत पदार्थांची रेलचेल

सध्या लहान मुलांचे व्हेकेशन (vacation) अर्थात ऑनलाईन क्लास (Online Class) असले तरीही सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. घरात रोज नवीन काहीतरी खायला हवं असतं. पण आई वडिलांचेही घरातून काम सुरू असल्याने (Work From Home) घरात खूपच कामं असतात. त्यामुळे व्हेकेशन पार्टी असो अथवा काही सणांनिमित्त आपल्या आप्तेष्टांना काही गिफ्ट पाठवायचे असो त्यासाठी फ्रोझन फूडचा (Frozen Food) पर्याय खूपच उत्तम ठरतो आहे. यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आवडणारे अनेक पदार्थ उपलब्ध असतात. यावेळी आम्ही हायफन फूड्स (HyFun foods) कडून आलेले काही पदार्थांची चव चाखून पाहिली आहे आणि तुम्हालादेखील याचा आस्वाद घेता येईल. अर्थात हे पदार्थ आपण नियमित खात नसलो तरीही अशा चटपटीत पदार्थांची रेलचेल घरात कधीतरी करायला काहीच हरकत नाही.  फ्रेंच फ्राईज (French Fries) असोत वा पोटॅटो वेजेस असोत लहान मुलांनाच नाही तर अगदी घरातील सर्वांनाच याचा स्वाद आवडतो. तसंच घरात एखादी लहानशी पार्टी असेल तरीही हा पर्याय सध्या उत्तम ठरत आहे. 15 मे रोजी कुटुंब दिवस (Family Day) साजरा करण्यात येतो. त्यामुळे तुम्हीही सध्या घरात काहीतरी वेगळं करायचा विचार करत असाल तर फ्रोझन फूड्स तुमच्यासाठी वेळही वाचवते आणि चवही उत्तम देते. 

क्रिंकल फ्राईज (Crickle Fries) –

क्रिंकल फ्राईज (Crickle Fries) -

आपण वेगवेगळ्या ठिकाणी फ्रेंच फ्राईज खातो. त्याची चवही वेगवेगळी असते. असाच एक फ्राईजचा प्रकार हायफनने आणला आहे तो म्हणजे क्रिंकल फ्राईज. याचा कुरकुरीतपणा हेच याचे वैशिष्ट्य आहे. तसंच नेहमीच्या फ्राईजपेक्षा दिसायलाही वेगळे असल्याने मुलांना याचे आकर्षण अधिक वाटते. याशिवाय याची चवही अप्रतिम लागते. घरातल्या घरात वाढदिवसाच्या पार्टीसाठीही तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. कारण मुलांना अशा प्रकारचे फ्राईज नक्कीच आवडतात. यामध्ये अति मीठही नसते. अगदी योग्य प्रमाणात सर्व पदार्थांचा सुरेख मेळ क्रिंकल फ्राईजमधून मिळतो. त्यामुळे तुम्ही घरातील मोठ्या माणसांनाही याचा आस्वाद घेऊ देऊ शकता.

ADVERTISEMENT

पोटॅटो वेजेस

पोटॅटो वेजेस

अनेक ठिकाणी हा प्रकार आपण खात असतो. घरी मात्र आपल्याला तशा परफेक्ट चवीचे पोटॅटो वेजेस बनवता येतील की नाही ही शंका असते. अर्थात तसे तुम्ही घरीही नक्कीच बनवू शकता. पण तुमच्याकडे वेळ नसेल तर आणि तुम्हाला चवीतही वेगळेपणा हवा असेल तर तुम्ही हायफनचे लाईम अँड मिंट पोटॅटो वेजेस नक्कीच ट्राय करून पाहू शकता. यामध्ये बटाटा, लिंबू आणि मसाल्याचा सुरेख मेळ असल्याने अत्यंत चविष्ट लागतात आणि तुमच्या घरातील पार्टीची शान नक्कीच वाढवतात. काही ठिकाणी पोटॅटो वेजेसना मीठ नीट लागले नाही तर चव लागत नाही. पण या वेजेसची चव मात्र कमाल आहे. विशेषतः मुलांना हे वेजेस अधिक प्रमाणात आवडतात.

हाताची बोटं चाटत राहाल असा चविष्ट मसाला पाव बनवा घरी, सोपी रेसिपी

ADVERTISEMENT

आलू टिक्की (Aloo Tikki) –

आपल्याकडे आलू टिक्कीशिवाय कोणतीही पार्टी अथवा घरातील कार्यक्रम हल्ली पूर्णच होत नाही. विशेषतः बटाट्याचे असे चमचमीत पदार्थ लहान मुलांना खूपच आवडतात. त्यातही हायफनची ही आलू टिक्की तिखट, आंबट आणि चविष्ट अशी असल्याने तोंडावर ताबा ठेवणे अत्यंत कठीण जाते. याचा केवळ स्वादच नाही तर तळल्यानंतर येणारा सुगंधही पोटामध्ये भूक निर्माण करतो. मुलांची भूकही चाळवली जाते. याशिवाय तुम्ही घरात याची आलू टिक्की चाटही करू शकता. तुमचा वेळ वाचविण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. 

तोंडाची चव बदलतील या 5 चटकदार रेसिपी,नक्की करुन पाहा

अलेपिनो चिजी पॉप्स (Jalapeno Cheesy pops) –

अलेपिनो चिजी पॉप्स (Jalapeno Cheesy pops) -

ADVERTISEMENT

नगेट्स हा प्रकारही सध्या खूपच प्रसिद्ध आहे. त्यातही अलेपिनो आणि चीज एकत्र असेल तर अधिक चविष्ट लागते. अधिक कुरकुरीत आणि वेगळ्या चवीचे हे नगेट्स मुलांना खूपच आवडतात. इतकंच नाही तर तुम्ही जेवणाच्या आधी घरात असे कुरकुरीत नगेट्स स्टास्टर्स म्हणूनही कधीतरी खाण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता. याचा स्पाईसी आणि चिजी फ्लेवर अर्थात तिखट – चिजी असा स्वाद तुमच्या जिभेचे चोचले पुरविण्यास नक्कीच मदत करतो. तसंच तुम्हाला कोणत्याही सणासाठी कोणाला गिफ्ट पाठवायचे असेल तर तुम्ही या फ्रोझन फूडचा नक्कीच उपयोग करून घेऊ शकता. इतर कोणतंही गिफ्ट पाठविण्यापेक्षा असे चविष्ट खाणे पाठवणे हे केव्हाही चांगलेच. 

सूचना – फ्रोझन फूड्स हा चांगला पर्याय असला तरीही त्याचा अतिरिक्त उपयोग करू नये. महिन्यातून एकदा अथवा दोन वेळा तुम्ही वापर नक्कीच करू शकता. 

बटाटा वडा रेसिपी मराठीतून, विविध पद्धतीने बनवा बटाटावडा (Batata Vada Recipe In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
13 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT