ADVERTISEMENT
home / Recipes
Batata Vada Recipe In Marathi

बटाटा वडा रेसिपी मराठीतून, विविध पद्धतीने बनवा बटाटावडा (Batata Vada Recipe In Marathi)

 

बटाटावडा अथवा वडापाव म्हटलं की तोंडाला पाणीच सुटतं. खमंग आणि खुसखुशीत असा गरमागरम बटाटावडा खाण्याची मजाच काही और आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात ठिकठिकाणी वडापावच्या गाड्या असतात. पावापेक्षाही वडे खाण्यात आपल्याकडे सगळेच पटाईत आहेत. मस्तपैकी लसूण चटणी, गरमागरम वडा आणि तळलेली हिरवी मिरची ही फक्कड मेजवानी असली की इतर कोणत्याही गोष्टीकडे बघण्याची गरजच भासत नाही. बरेचदा पावसाळा आला की, गरमागरम भजी आणि वडे असा फक्कड बेत बऱ्याच घरांमध्ये आखला जातो. पण कधी कधी जसा बटाटावडा बाहेर मिळतो तसा घरी होत नाही अशी तक्रार असते. पण तुम्ही आता घरच्या घरीदेखील अगदी सोप्या पद्धतीने हा लज्जतदार बटाटावडा (Batata Vada Recipe In Marathi) करू शकता. आम्ही तुम्हाला या लेखातून बटाटावड्याची रेसिपी देत आहोत. तुम्हाला हवं तर पावाला चटणी लावा आणि त्याबरोबर हा बटाटावडा हाणा अथवा नुसता गरमागरम बटाटावडा आणि चटणी तुम्ही खाऊ शकता. जाणून घेऊया महाराष्ट्रीयन पदार्थ असणाऱ्या फक्कड बटाटा वडा रेसिपी मराठीत. बटाटावडा केवळ एकाच पद्धतीने बनवता येतो असं नाही. तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बटाटा वडा बनवू शकता. अशाच सर्व रेसिपी तुमच्यासाठी खास.

बटाटा वडा साधी रेसिपी (Simple Batata Vada Recipe In Marathi)

बटाटा वडा साधी रेसिपी ( Simple Batata Vada Recipe In Marathi)

Instagram

अगदी घरातील साहित्य घेऊन तुम्ही साधा बटाटावडा नक्कीच घरी करू शकता. यासाठी तुम्हाला बाजारात जाऊन वेगळं काही सामान आणण्याची गरज भासणार नाही

ADVERTISEMENT

साहित्य

  • 4-5 उकडलेले बटाटे 
  • 1 वाटी बेसन 
  • पाणी
  • 1 चमचा जिरे 
  • 1 चमचा हळद
  • चिमूटभर हिंग
  • चवीनुसार मीठ 
  • 5-6 मिरच्या
  • कोथिंबीर 
  • 5-6 लसणीच्या पाकळ्या 
  • 7-8 कडिपत्ता पाने 
  • तळण्यासाठी तेल 

बनविण्याची पद्धत 

  • कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या. त्यानंतर ते व्यवस्थित मॅश करा 
  • दुसऱ्या बाजूला एका भांड्यात तेल घेऊन ते तापवा त्यात अख्ख्या मिरच्या परतून घ्या. त्यानंतर खलबत्यामध्ये या भाजलेल्या मिरच्या, लसूण आणि जिरे घालून कुटून घ्या. याची जाडसर पेस्ट तयार करा
  • मॅश केलेल्या बटाट्यामध्ये वरील पेस्ट, मीठ मिक्स करून व्यवस्थित एकत्र करून घ्या
  • त्यानंतर पॅनमध्ये तेल तापवा. त्यात हिंग, कडिपत्ता आणि हळद याची फोडणी करून व्यवस्थित कडिपत्ता परतून घ्या.
  • वरून तयार झालेले बटाट्याचे मिश्रण घालून एकत्र करून घ्या. वरून कोथिंबीर पेरा आणि एकजीव करून घ्या.
  • त्यानंतर त्याचे लहान गोळे करा
  • दुसऱ्या भांड्यात बेसन, चिमूटभर हळद, पाणी घालून व्यवस्थित भिजवून घ्या. अति पातळ अथवा अति जाड ठेऊ नका
    वरील गोळे पिठात भिजवा आणि तेल तापत ठेऊन त्यामध्ये तळा आणि गरमागरम वडे चटणीसह खायला द्या. 

वाचा – खमंग चिवडा रेसिपी, बनवा घरच्या घरी

महाराष्ट्रीन स्टाईल बटाटावडा (Maharashtrian Style Batata Vada In Marathi)

महाराष्ट्रीन स्टाईल बटाटावडा (Maharashtrian Style Batata vada)

ADVERTISEMENT

Instagram

 

महाराष्ट्रीयन स्टाईल बटाटावडा म्हणजे झणझणीत आणि तोंडाला पाणी आणणारा असा बटाटावडा. तुम्हीही घरी हा वडा करून पाहू शकता

साहित्य 

  • 4-5 उकडलेले बटाटे 
  • आलं – लसूण – हिरवी मिरची पेस्ट
  • चिरलेला कांदा
  • हळद 
  • कोथिंबीर 
  • चवीनुसार मीठ 
  • तळण्यासाठी तेल
  • बेसन 
  • खाण्याचा सोडा

बनवण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या. उकडलेले बटाटे साल काढून सोला आणि व्यवस्थित मॅश करा
  • एका कढईत तेल घ्या. त्यात चिरलेला कांदा परतून घ्या. त्यात हळद मिक्स करून कांदा थंड होऊ द्या
  • आले चिरून घ्या आणि लसणीच्या पाकळ्या काढा. मिरचीचे देठ काढून घ्या. हे तिन्ही एकत्र मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करून घ्या
  • दुसऱ्या भांड्यात बेसन (चण्याच्या डाळीचे पीठ) पाण्याने भिजवा. त्यात मीठ आणि खाण्याचा सोडा चवीपुरता घाला आणि मध्यम स्वरूपात भिजवा 
  • मॅश केलेल्या बटाट्यांवर परतलेला कांदा, आलं – लसूण – मिरची पेस्ट, मीठ घाला आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्या. त्याचे गोळे करा 
  • हे गोळे पिठात भिजवा आणि तेल मध्यम आचेवर ठेऊन तळा. गरमागरम खुसखुशीत आणि खमंग वडे गोड आणि तिखट चटणीसह खायला द्या

वाचा – Dosa Recipes In Marathi

पांढऱ्या भाजीचा बटाटावडा (White Bhaji Batata Vada Recipe In Marathi)

पांढऱ्या भाजीचा बटाटावडा (White Bhaji Batata Vada Recipe In Marathi)

Instagram

 

आतापर्यंत आपण नेहमी पिवळ्या भाजीचा बटाटावडा खाल्ला आहे. पण तो नियमित बटाटावडा न खाता तुम्ही पांढऱ्या भाजीचा खमंग आणि खुशखुशीत बटाटावडा बनवला आहे का? असाच वडा तुम्ही वेगळी रेसिपी म्हणून नक्कीच ट्राय करू शकता. 

ADVERTISEMENT

साहित्य

  • 4-5 उकडलेले बटाटे 
  • 1 वाटी बेसन 
  • पाणी
  • 1 चमचा जिरे 
  • चिमूटभर हिंग
  • चवीनुसार मीठ 
  • 5-6 मिरच्या
  • कोथिंबीर 
  • 5-6 लसणीच्या पाकळ्या 
  • 7-8 कडिपत्ता पाने 
  • तळण्यासाठी तेल 

बनविण्याची पद्धत 

  • कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या. त्यानंतर ते व्यवस्थित मॅश करा 
  • दुसऱ्या बाजूला एका भांड्यात तेल घेऊन ते तापवा त्यात अख्ख्या मिरच्या परतून घ्या. त्यानंतर खलबत्यामध्ये (खलबत्ता नसेल तर मिक्सरमधून वाटून घ्या) या भाजलेल्या मिरच्या, लसूण आणि जिरे घालून कुटून घ्या. याची जाडसर पेस्ट तयार करा
  • मॅश केलेल्या बटाट्यामध्ये वरील पेस्ट, मीठ मिक्स करून व्यवस्थित एकत्र करून घ्या
  • त्यानंतर पॅनमध्ये तेल तापवा. त्यात हिंग, कडिपत्ता याची फोडणी करून व्यवस्थित कडिपत्ता परतून घ्या. वरून तयार झालेले बटाट्याचे मिश्रण घालून एकत्र करून घ्या. वरून कोथिंबीर पेरा आणि एकजीव करून घ्या. त्यानंतर त्याचे लहान गोळे करा
  • दुसऱ्या भांड्यात बेसन, चिमूटभर हळद, पाणी घालून व्यवस्थित भिजवून घ्या. अति पातळ अथवा अति जाड ठेऊ नका
    वरील गोळे पिठात भिजवा आणि तेल तापत ठेऊन त्यामध्ये तळा आणि गरमागरम वडे चटणीसह खायला द्या. 

कट बटाटा वडा (Kat Batata Vada Recipe In Marathi)

कट बटाटा वडा (Kat Batata Vada Recipe In Marathi)

Instagram

ADVERTISEMENT

ज्यांना झणझणीत आणि सकाळच्या नाश्त्यालाही वडा चालतो अशा व्यक्तींसाठी कट वडा हा उत्तम उपाय आहे. तुम्ही मस्तपैकी तेल आलेल्या रश्श्यात बटाटावडा बुडवून खायची मजा अनुभवली आहे का? ही मजा तुम्ही घरीही घेऊ शकता. जाणून घेऊया कट बटाटा वडा रेसिपी मराठीत

साहित्य वड्यासाठी 

  • 4-5 उकडलेले बटाटे 
  • 3-4 हिरव्या मिरच्या
  • 7-8 कडिपत्ता पाने
  • चिरलेला कांदा
  • हळद 
  • कोथिंबीर 
  • आलं – लसूण पेस्ट
  • जिरे, मोहरी आणि हिंग
  • चवीनुसार मीठ 
  • तळण्यासाठी तेल
  • बेसन 
  • लाल तिखट
  • चमचाभर मोहन 

कटासाठी साहित्य 

  • एक वाटी कांद्याची पेस्ट
  • एक वाटी टॉमेटो प्युरी 
  • एक वाटी खवलेले ओले खोबरे 
  • एक वाटी फरसाण 
  • एक वाटी स्मॅश केलेली बटाटा भाजी 
  • तमालपत्र 
  • 3-4 लवंगा 
  • तिखट 
  • चवीनुसार मीठ 
  • 2 आमसूल

बनवण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घ्या
  • गॅसवर एका कढईमध्ये तेल घाला. तापल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मिरच्यांची फोडणी करा. त्यात कांदा परतून घ्या. त्यात आलं – लसूण पेस्ट घाला
  • त्यावर कापलेल्या बटाट्याच्या फोडी परतून घ्या. वरून चवीनुसार मीठ घाला आणि नीट मिक्स करा 
  • त्यानंतर या मिश्रणाचे गोळे बनवून ठेवा
  • दुसऱ्या बाजूला एका भांड्यात बेसन, तिखट, मोहन घालून भिजवून घ्या. तुम्हाला हवं तर यात ओवा घालू शकता. 
    कढईत तेल तापत ठेवा आणि वडे तळून घ्या 

कट बनवण्याची पद्धत 

  • गॅसवर एका पॅनमध्ये थोडेसे तेल घ्या. त्यात तमालपत्र, लवंग आणि दालिचिनी परतून घ्या. त्यावर कांदा पेस्ट घालून परता 
  • वरून ओलं खोबरं घाला आणि व्यवस्थित भाजून घ्या. त्यामध्ये टॉमेटो प्युरी घाला आणि शिजवून घ्या
  • हे सगळं मिश्रण थंड करा आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या 
  • बारीक केलेल्या मिश्रणात बटाट्याची भाजी आणि पापडी आणि फरसाण चुरा मिसळा
  • गॅसवर एक पॅन घ्या त्यात जास्त तेल घ्या. त्यामध्ये तापल्यानंतर लाल तिखट घाला आणि पटकन पळीने हलवा. त्यात बारीक केलेली पेस्ट घाला आणि हवं तेवढं पाणी, मीठ आणि आमसूल घालून उकळी काढा 
  • चांगली उकळी आल्यावर तुमची तर्री अर्थात कट तयार आहे
  • सर्व्हिंग डिशमध्ये दोन बटाटेवडे घाला. त्यात कट ओता. वर फरसाण, चिरलेला कांदा, कोथिंबिर घाला आणि लिंबाच्या फोडीसह खायला द्या

कोल्हापुरी वडा (Kolhapuri Vada Recipe In Marathi)

कोल्हापुरी वडा (Kolhapuri vada)

Instagram

कोल्हापूर म्हटलं की, डोळ्यासमोर येतो तो म्हणजे तांबडा – पांढरा रस्सा. पण, कोल्हापुरचा बटाटा वडाही तितकाच प्रसिद्ध आहे. झणझणीत आणि जिभेला चटका लावणाऱ्या अशा या कोल्हापुरी बटाटा वडा रेसिपी मराठीत जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • 4-5 उकडलेले बटाटे
  • कोथिंबीर
  • आलं – लसूण 
  • हिरव्या मिरच्या
  • हळद
  • चिरलेला कांदा 
  • उकडलेले वाटाणे 
  • चवीनुसार मीठ
  • जिरे, मोहरी
  • कोल्हापुरी लाल तिखट 
  • तेल
  • बेसन
  • पाणी 

बनविण्याची पद्धत

  • हिरव्या मिरच्या, आलं – लसूण आणि कोथिंबीर एकत्र मिक्सरमध्ये वाटून बारीक पेस्ट करून घ्या
  • दुसऱ्या पॅनमध्ये तेल घालणे आणि तापवणे त्यात जिरे, मोहरी आणि चिरलेला कांदा घालून परतून घेणे. कांदा ब्राऊन होत आला की त्यात आलं – लसणीची तयार केलेली पेस्ट घालून पुन्हा परतणे 
  • त्यानंतर हळद आणि मीठ घालून नीट मिक्स करून घ्या. हे तयार झाल्यावर त्यात उकडलेले वाटाणे घालून परतणे आणि मग तिखट घालून वरून मॅश केलेल्या बटाट्याचे मिश्रण आणि मीठ घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करणे 
  • दुसऱ्या भांड्यात बेसन, ओवा, मीठ, जिरे, हळद आणि लाल तिखट घालून व्यवस्थित पीठ पाण्याने भिजवून घेणे
    वरील मिश्रणाचे गोळे बनवून पिठात भिजवणे आणि तापलेल्या तेळात तळणे. सुक्या चटणीसह हा झणझणीत कोल्हापुरी वडा खायला देणे 

घरगुती बटाटा वडा रेसिपी मराठीत (Homemade Batata Vada Recipe In Marathi)

घरगुती बटाटा वडा रेसिपी मराठीत (Homemade batata vada)

Instagram

ADVERTISEMENT

घरगुती बटाटेवडे तुम्ही आप्पेपात्रात आणि कमी तेलातही करू शकता. तुम्हाला जर तेलकट बटाटा वडा नको असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बटाटा वडा करून पाहा. 

साहित्य 

  • अर्धा किलो बटाटे
  • दोन चमचे आले लसणाची पेस्ट 
  • चार ते पाच हिरव्या मिरचीचे वाटण 
  • चवीपुरते मीठ 
  • एक चमचा लिंबूरस 
  • एक वाटी बेसन
  • आप्पे पात्र 
  • तेल

बनवण्याची पद्धत 

  • सर्वात आधी बटाटेवडे कुकरमध्ये उकडून घ्यावेत. उकडलेले बटाटे सोलून ते व्यवस्थित कुस्करून एकजीव करावेत. 
  • या सारणामध्ये आले लसणाची पेस्ट, मिरचीचे वाटण टाकून पुन्हा एकजीव करावे. सारणाला वरून एक चमचा तेल, हिंग, कडीपत्त्याची फोडणी देऊन वरून लिंबूरस पिळून भाजीचे सारण पुन्हा एकत्र करावे. 
  • या सारणाचे आप्पेपात्राच्या आकाराप्रमाणे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावेत. 
    बेसनाच्या पिठात चवीपुरते मीठ आणि मोहनाचे तेल टाकून भजीप्रमाणे सरसरीत पीठ भिजवून घ्यावे. पीठ भिजवताना ते
  • कढईत तळण्यासाठी केल्या जाणाऱ्या बटाट्यावड्याच्या पीठाप्रमाणे न भिजवता थोडे घट्ट भिजवावे.
  • आप्पेपात्रात एक छोटा चमचा तेल सोडावे त्यावर बटाटेवडे सोडावेत आणि वरून झाकण लावावे. बटाट्यावड्यांची एक बाजू तळून झाली की वडे पलटून दुसरी बाजू तळून घ्यावी. 
  • गरज असल्यास पुन्हा  थोडे तेल वरून सोडावे. गरमागरम आणि स्वादिष्ट बटाटेवडे ओल्या नारळाची चटणी अथवा लसणाच्या तिखट चटणीसोबत खावे. 

स्ट्रीट स्टाईल बटाटा वडा रेसिपी मराठीत (Street Style Batata Vada Recipe In Marathi)

स्ट्रीट स्टाईल बटाटा वडा रेसिपी मराठीत (Street Style batata vada)

ADVERTISEMENT

Instagram

घरी कितीही वडे केले तरी ते बाहेरच्यासारख्या चवीचे होत नाहीत असं बरेचदा आपण ऐकतो. पण स्ट्रीट स्टाईल बटाटा वडा तुम्ही घरीही करू शकता. 

साहित्य

  •  4-5 उकडलेले बटाटे 
  • आलं – लसूण – हिरवी मिरची पेस्ट
  • चिरलेला कांदा
  • हळद 
  • कोथिंबीर 
  • चवीनुसार मीठ 
  • तळण्यासाठी तेल
  • बेसन 
  • खाण्याचा सोडा
  • मोहन

बनवण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या. उकडलेले बटाटे साल काढून सोला आणि व्यवस्थित मॅश करा
  • एका कढईत तेल घ्या. त्यात चिरलेला कांदा परतून घ्या. त्यात हळद मिक्स करून कांदा थंड होऊ द्या
  • आले चिरून घ्या आणि लसणीच्या पाकळ्या काढा. मिरचीचे देठ काढून घ्या. हे तिन्ही एकत्र मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करून घ्या
  • दुसऱ्या भांड्यात बेसन (चण्याच्या डाळीचे पीठ) पाण्याने भिजवा. तेल गरम करून त्यात ते मोहन घाला. मीठ आणि खाण्याचा सोडा चवीपुरता घाला आणि मध्यम स्वरूपात भिजवा 
  • मॅश केलेल्या बटाट्यांवर परतलेला कांदा, आलं – लसूण – मिरची पेस्ट, मीठ घाला आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्या. त्याचे गोळे करा 
  • हे गोळे पिठात भिजवा आणि तेल मध्यम आचेवर ठेऊन तळा. गरमागरम खुसखुशीत आणि खमंग वडे गोड आणि तिखट चटणीसह खायला द्या

उपवासाचा बटाटा वडा (Fast Special Batata Vada Recipe In Marathi)

उपवासाचा बटाटा वडा (Fast special batata vada)

Instagram

 

इतर वेळी आपण मस्तपैकी बटाटावडा खातोच. पण तुम्ही उपवासासाठीही मस्त गरमागरम बटाटावडा घरच्या घरी बनवून खाऊ शकता. महाशिवरात्रीच्या उपवासाला अथवा अन्य कोणत्याही उपवासाला उपवासाच्या पदार्थांमध्ये तुम्ही बटाटा वड्याचा समावेश करून घेऊ शकता.

साहित्य 

ADVERTISEMENT
  • अर्धा किलो उकडलेले बटाटे
  • आले 
  • एक कच्चा बटाटा किसलेला 
  • हिरव्या मिरच्या आणि जिरे भाजून केलेली पेस्ट 
  • चवीनुसार मीठ
  • साखर 
  • 2 चमचे शेंगदाणे कूट 
  • ओले खोबरे खवलेले 
  • 2 चमचे लिंबाचा रस 
  • अर्धी वाटी राजगिऱ्याचे पीठ
  • अर्धी वाटी शिंगाडा पीठ 
  • अर्धी वाटी साबुदाणा पीठ
  • तेल 

बनवण्याची पद्धत 

  • उकडलेले बटाटे सोलून स्मॅश करा
  • एका बाऊलमध्ये स्मॅश केलेले बटाटे घ्या. त्यात आले, हिरव्या मिरच्या आणि जिऱ्याची पेस्ट, मीठ, साखर, कूट, कोथिंबीर, खोबरे, लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्या. त्याचे गोळे बनवा 
  • दुसऱ्या बाऊलमध्ये वरील सर्व पिठे एकत्र करून पाणी घालून भिजवा. त्यात मीठ, मिरचीचा ठेचा, एक कच्चा किसलेला बटाटा घालून मिक्स करा
  • कढईत तेल गरम करा. पिठात वडे बुडवून ते या तेलात तळा
  • गरमागरम उपवासाचे वडे खोबऱ्याच्या चटणीसह खायला द्या

जैन बटाटा वडा (Jain Batata Vada Recipe In Marathi)

जैन बटाटा वडा (Jain Batata vada)

Instagram

 

खरं तर जैन असणाऱ्या व्यक्ती बटाटा खात नाहीत असं म्हटलं जातं. पण आता सर्रास काही जैन बटाटा वडा खातात. त्यामुळे अनेक ठिकाणी आता कांदा – लसूण विरहीत जैन बटाटा वडा तयार करताना दिसतात. जाणून घेऊया जैन बटाटा वडा रेसिपी 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • अर्धा किलो बटाटे
  • दोन चमचे आले पेस्ट 
  • चार ते पाच हिरव्या मिरचीचे वाटण 
  • चवीपुरते मीठ 
  • हिंग, मोहरी, जिरे, कडिपत्ता
  • एक चमचा लिंबूरस 
  • एक वाटी बेसन
  • पाणी
  • तेल

बनविण्याची पद्धत 

  • कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या. त्यानंतर ते व्यवस्थित मॅश करा 
  • दुसऱ्या बाजूला एका भांड्यात तेल घेऊन ते तापवा त्यात अख्ख्या मिरच्या परतून घ्या. त्यात आले घालून पेस्ट करून घ्या
    मॅश केलेल्या बटाट्यामध्ये वरील पेस्ट, मीठ मिक्स करून व्यवस्थित एकत्र करून घ्या
  • त्यानंतर पॅनमध्ये तेल तापवा. त्यात हिंग, कडिपत्ता याची फोडणी करून व्यवस्थित कडिपत्ता परतून घ्या. वरून तयार झालेले बटाट्याचे मिश्रण घालून एकत्र करून घ्या. वरून कोथिंबीर पेरा आणि एकजीव करून घ्या. त्यानंतर त्याचे लहान गोळे करा
  • दुसऱ्या भांड्यात बेसन, चिमूटभर हळद, पाणी घालून व्यवस्थित भिजवून घ्या. अति पातळ अथवा अति जाड ठेऊ नका
    वरील गोळे पिठात भिजवा आणि तेल तापत ठेऊन त्यामध्ये तळा आणि गरमागरम वडे चटणीसह खायला द्या. जैन वडा असल्याने त्यात कांदा आणि लसूण घालू नये. 

नाशिक स्पेशल पाव वडा (Nashik Special Pav Vada Recipe In Marathi)

नाशिक स्पेशल पाव वडा (Nashik Special Pav Vada)

Instagram

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे बटाटेवडे मिळतात. कोल्हापुरी वडा तर आपण जाणून घेतलाच आहे. आता नाशिक स्पेशल पाव वड्याची रेसिपीही जाणून घ्या. 

साहित्य 

  • पाव
  • 4-5 उकडलेले बटाटे 
  • आलं – लसूण – हिरवी मिरची पेस्ट
  • चिरलेला कांदा
  • हळद 
  • हिंग, मोहरी, जिरे
  • गरम मसाला
  • कोथिंबीर 
  • चवीनुसार मीठ 
  • तळण्यासाठी तेल
  • बेसन 
  • पाणी 

बनविण्याची पद्धत 

  • बटाटे उकडा आणि सोलून मॅश करून घ्या
  • एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे, मोहरी, हिंग, कडिपत्ता घालून परता. त्यात कांदा परतून घ्या. वरून आलं-लसूण-मिरची पेस्ट घालून पुन्हा परता 
  • वरून हळद, मीठ, गरम मसाला घालून नीट मिक्स करा. त्यात मॅश्ड बटाटे मिक्स करा आणि एकजीव करून घ्या
    दुसऱ्या भांड्यात बेसन घ्या. त्यात जिरे, आलं – लसूण – मिरची पेस्ट, मीठ घालून व्यवस्थित पाण्याने भिजवून घ्या
  • पाव कापून त्यात वर तयार केलेली भाजी भरा आणि मग भिजवलेल्या बेसनमध्ये बुडवून तापलेल्या तेलात तळा. तुमचा चविष्ट नाशिक स्पेशल पाववडा तयार
06 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT