‘तेरी आख्याका यो काजल मन करेसे कोई घायल’, हे गाणं आठवल की पहिल्यांदा आठवते ती सपना चौधरी. तिच्या अदांनी तिने कित्येकांना घायाळ केले आहे. ती स्टेजवर आल्यानंतर ज्या एनर्जीने नाचते ते पाहायला अनेक लोक येतात. पण आता हीच सपना चौधरी तिचे हे करीअर सोडत आहे. बसला ना धक्का! हो सपना चौधरीने आपले करीअर सोडण्याचा निर्णय केवळ तिच्या मैत्रीखातर घेतला आहे. हो हे अगदी खरं आहे आणि तिचा हा मित्र आणखी कोणी नसून चित्रपट आहे. लवकरच सपना चौधरी एका चित्रपटात दिसणार आहे. ‘दोस्ती के साईट इफेक्टस’ असे या चित्रपटाचे नाव असून यात सपनाची भूमिकापण एकदम खास आहे. त्यामुळेच ती काही काळ या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यग्र असणार आहे. पण ती करीअर सोडण्यामागेही एक खास व्यक्ती आहे.
सपनाचा पहिला सिनेमा
बीग बॉसनंतर सपना चौधरीला एक वेगळीच ओळख मिळाली. आजही तिचे शो लागले की, ते हाऊसफुल्ल असतात. पण सपना चौधरीला एका सिनेमाची ऑफर आली. ती स्क्रिप्ट तिला आवडली आणि तिने चित्रपटाला लगेच होकार देऊन टाकला. आता सांगायचे झाले तर सपना या सिनेमात एका तडफदार महिला पोलीस अधिकाऱ्याचे काम करत आहे अशी माहिती मिळत आहे. दोस्ती के साईड इफेक्ट असे या चित्रपटाचे नाव आहे. आता हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. सपनाने याचे पोस्टर स्वत: तिच्या फॅन्ससाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. सध्या या चित्रपटाचे ट्रिंग ट्रिंग हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यातही सपना एकदम झकास परफॉर्मन्स करताना दिसत आहे. तर ट्रेलरमध्ये सपना अॅक्शन करताना दिसत आहे.
नव्या वर्षात इतिहास उलगडणारे हे ५ चित्रपट
तर सपना सोडेल करीअर
आता तुम्हाला वाटेल चित्रपटासाठी सपना ब्रेक घेईल करीअर कशाला सोडेल? पण सपनाने दिलेल्या एका मुलाखतीत ती तिचे हे सगळे स्टारडम सोडू शकते,असे म्हटले आहे. सपनाचे तिच्या आईशी घनिष्ठ संबंध असू आईने सांगितल्यास ती या सगळ्या गोष्टी सोडून साधारण आयुष्यही जगायला तयार होईल असे सांगितले आहे. तिच्यासाठी तिची आई सर्वेसर्वा असल्याचे देखील ती म्हणाली आहे. त्यामुळे आता ती चित्रपटांमुळे करीअर सोडेल,असे कधीही होणार नाही. पण जर तिच्या आईने तिला सांगितले तर ती नक्कीच हे सगळे सोडून देणार आहे. पण सध्या तर तिच्या फॅन्समध्ये तिच्या येणाऱ्या चित्रपटाची चर्चा आहे. पोलिसाच्या वेशात सपना नक्कीच चांगली दिसेल अशी तिच्या फॅन्सना आशा आहे.
या वर्षी पाहायला मिळणार आहेत हे महिला बायोपिक
इंटरनेट सेन्सेशन सपना
बीग बॉसच्या सीझन ११ मध्ये सपना आली तेव्हा तिच्या गॉसिपमुळे ती अधिक प्रसिद्ध झाली. या सीझन दरम्यान सपना चौधरी कोण यासाठी इंटरनेटवर तिला अधिक शोधले गेले. त्यामुळे ती इंटरनेट सेन्सेशनदेखील होती. आजही तिचे कोटीच्या घरात चाहते आहेत आणि तिची गाणी प्रसिद्ध आहेत. तिने स्टेज परफॉर्मन्सशिवाय तिचे अनेक डान्स व्हिडिओजदेखील आहेत. ज्यांचे व्ह्यूज ही कोटींच्या घरात आहे. त्यामुळेच ती इंटरनेट सेन्सेशन आहे.
(फोटो सौजन्य-Instagram)