ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
लहान बाळांना डायपर्स घालताय मग एकदा वाचाच

लहान बाळांना डायपर्स घालताय मग एकदा वाचाच

लहान बाळांना बाहेर घेऊन जायचे असेल तर अशावेळी खूप जण त्यांना डायपर घालतात. बाहेर असताना मुलांनी शीशी आणि सूसू करु नये म्हणून त्यांना हे डायपर्स घातले जातात. पण खूप जण मुलांना सतत डायपर्स घालून ठेवतात. पण मुलांना सतत डायपर्स घालायला हवे का? मुलांनी साधारण किती तासांसाठी डायपर्स घालायला हवा असा विचार तुम्हाला पडला असेल तर लहान बाळांना डायपर्स घालण्याचे फायदे आणि तोट जाणून घेऊया. फायद्यापेक्षा डायपर्स घालण्याचे तोटे हे अधिक आहेत असे लक्षात येईल. जर तुम्ही आई होणार असाल किंवा तुमच्या घरातही तान्हुले बाळ असेल तर तुम्ही एकदा ही महत्वाची माहिती वाचाच.

दूध पिताना बाळ सतत उलटी करत असेल तर त्यामागे असू शकतं हे कारण

डायपर्स म्हणजे काय?

लहान मुलं सतत सू सू आणि शी शी करत असतात त्यामुळे खूप वेळा त्यांचे कपडे बदलायला कंटाळा येतो. अशावेळी मुलांची सू आणि शी काढण्याचा त्रास कमी करण्यासाठी डायपर्स  बनवलेले आहेत. डायपर्सच्या वापरामुळे शी शी सू सू साफ करणे सोपे जाते.  त्यांना कोणाकडेही देणे शक्य होते. डायपर्सच्या शोधामुळे खूप त्रास हा कमी होतो. डायपर्समध्ये अनेक प्रकार देखील मिळतात. ज्यांच्या वापरामुळे अधिक वेळेसाठी शीशी सूसू धरण्यास मदत मिळते. 

पहिल्या दिवसापासूनच बाळाची घ्या अगदी सौम्यपणे काळजी, महत्त्वाच्या गोष्टी

ADVERTISEMENT

डायपर्स घालत असाल तर…

जर तुम्ही डायपर्स घालत असाल तर काही गोष्टी या तुम्हाला माहीत असायला हव्यात. सतत डायपर घातल्यामुळे मुलांना काही त्रास होण्याची शक्यता असते. 

  • डायपर जास्त वेळ मुलांना घातल्यामुळे मुलांच्या नितंबाची त्वचा ही सोलल्यासारखी होते. 
  • खूप वेळ सूसू मध्ये त्वचा राहिल्यामुळे मुलांना रॅशेश येण्याची शक्यता जास्त असते. 
  • रेडिमेड मिळणारे डायपर हे प्लास्टिकचे असतात ते इतके जाड असतात की, त्यामध्ये पाणी जास्त काळ धरुन ठेवले जाते त्यामुळे ते डायपर जड होतात. त्यामुळे मुलांची चिडचिड होते.
  • डायपर्स घातल्यामुळे मुलांची लघवीची संवेदना निघून जाते. त्यांना डायपर्समध्ये  सूसू करायची सवय लागल्यामुळे हा त्रास पुढे जाऊनही होऊ शकतो. 
  • लहान मुलांना बरेचदा त्यांना काय झाले ते सांगता येत नाही. अशावेळी ते रडत बसतात.  लहान मुलांना पोटात दुखणे हे युरीन इन्फेक्शनमुळेही होऊ शकते.  त्यामुळे जास्त वेळ डायपर घालू नका. डायपरमध्ये असलेली सूसू ही त्यांच्या त्वचेला तशीच लागून राहते. त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

बाळंतपणासाठी होणाऱ्या आईने नेमकी काय करावी तयारी

मुलांना घाला सुती लंगोट

मुलांना डायपर घालण्याऐवजी तुम्ही सुती लंगोट घातली तर त्यांना त्याचा त्रास होत नाही. त्यामुळे पातळ कपड्यांच्या लंगोट मुलांसाठी आणा. त्यामुळे त्यांच्या त्वचेला त्याचा त्रास होत नाही. मुलांची त्वचा ही चांगली राहते. शिवाय स्वच्छता राखायलाही मदत मिळते.

22 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT