दूध पिताना बाळ सतत उलटी करत असेल तर त्यामागे असू शकतं हे कारण

दूध पिताना बाळ सतत उलटी करत असेल तर त्यामागे असू शकतं हे कारण

तान्ह्या बाळाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण कारण त्यांना काय होत आहे हे ते तोंडाने सांगू शकत नाहीत. बऱ्याचदा बाळ दूध पिल्यानंतर लगेच उलटी करतं. ही गोष्ट अनेकांना साधीच आहे असं वाटत असतं. मात्र यामागे अनेक गंभीर कारणंदेखील असू शकतात. खरंतर यासाठीच बाळाला स्तनपान दिल्यानंतर खांद्यावर घेऊन ढेकर काढण्याची पद्धत आहे. कारण त्यामुळे बाळाने पिलेलं दूध चांगलं पचतं. मात्र असं करूनही तुमचं बाळ सतत उलटी करत असेल तर हे एखाद्या गंभीर आरोग्य समस्येचं लक्षण  असू शकतं. बाळाला दुधामुळे बऱ्याचदा गॅस, अपचनाची समस्या होते. ज्यामुळे ते चिडचिड करतं, जोरजोरात रडतं अथवा दूध पिल्यानंतर ते उलटी करून बाहेर फेकून देतं. प्रत्येकवेळी जर बाळ दूध पिल्यानंतर उलटी करत  असेल तर ही गोष्ट तुमच्या डॉक्टरांना अवश्य सांगा. 

दूध पिल्यावर बाळ उलटी का करतं -

बाळाने दूध पिल्यावर लगेच उलटी केली तर प्रत्येकवेळी घाबरण्याचं कारण आहेच असं नाही त्यामागे खाली दिलेली कारणं असू शकतात.

 • बऱ्याचदा त्याचं पोट भरल्यामुळे जास्तीचं दूध बाळ तोंडावाटे बाहेर फेकून देते
 • काही वेळा बाळाला आडवं होऊन दूध पाजत असल्यामुळे दूध त्याच्या अन्ननलिकेत अडकून राहतं आणि थोड्यावेळाने बाहेर फेकलं जातं
 • काही मुलांमध्ये जेनेटिक कारणामुळे उलटी करण्याची सवय असते. थोडक्यात जर आईवडीलांना अपचन अथवा पोटाच्या समस्या असतील तर लहान बाळामध्येही त्या असू शकतात
 • काही मुलांना दूध पिणं आवडत नाही त्यामुळे ते सुरूवातीचे काही दिवस दूध पिल्यावर उलटी करतात
 • पोटाच्या काही समस्यांमुळे तुमचे बाळ दूध पिल्यावर उलटी करू शकतं. ही गोष्ट मात्र खूप गंभीर असल्यामुळे याबाबत तज्ञ्जांचा सल्ला घ्यावा

 

बाळाने दूध पिल्यावर उलटी करू नये यासाठी टिप्स -

बाळाने दूध प्यायल्यावर उलटी करू नये यासाठी त्याला दूध पाजताना या गोष्टींची काळजी घ्या.

 • स्तनपान अथवा दूध पाजल्यावर मुलांना लगेच आडवं झोपवू नका
 • दूध पाजल्यावर तान्ह्या बाळाला आईने खांद्यावर झोपवून त्यांच्या त्याला उभं करावं ज्यामुळे दूध बाळाच्या पोटात जातं
 • बाळाची दूध पाजण्याची वेळ पाळा, तुमच्यावेळेनुसार निरनिराळ्या वेळेला बाळाला दूध पाजू नका
 • बाळाला पोट भरल्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अंदाजानुसारच त्याला स्तनपान द्या
 • आई जो आहार घेते त्याचा परिणाम दुधावाटे बाळाच्या आहारावर होत असतो, यासाठीच बाळाला पचेल असेच पदार्थ आईने स्तनपानाच्या काळात खावे

वाचा - Tips For Normal Delivery In Marathi

Instagram

या सर्व टिप्स पाळूनही तुमचे बाळ दूध पिल्यावर सतत उलटी करत असेल तर त्याला दूध पचन नाही हे ओळखा. अशा वेळी बाळाला घरगुती उपचार करत बसू नका. त्यापेक्षा त्वरीत ही गोष्ट बालरोग तज्ञ्जांसोबत शेअर करा.  काही वेळा पोटातील आंतरिक रचना,  आरोग्य समस्या अशा अनेक गोष्टी यामागे असू शकतात. त्याचप्रमाणे आईचे दूध हे बाळासाठी वरदान असते. त्यामुळे जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला आईच्या दुधाशिवाय इतर काही देऊ नका. कारण त्यामुळेही बाळाची तब्येत बिघडू शकते. वातावरणातील बदलांचाही बाळाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. यासाठीच तान्ह्या बाळाची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

Beauty

WIPEOUT Baby Safety Wipes

INR 299 AT MyGlamm