ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
difference-between-moisturising-and-hydrating-skin-for-glow-in-marathi

मॉईस्चराईज्ड आणि हायड्रेटेड स्किनमध्ये काय आहे फरक

त्वचेची काळजी घेण्यासाठी मॉईस्चराईजिंग (Moisturizing) आणि हायड्रेटिंग (Hydrating) बाबत आपण नेहमीच ऐकत असतो. या दोन्ही गोष्टी त्वचेला पोषण देण्याचे काम करतात. बरेचदा त्वचेची काळजी घेण्यासाठी मॉईस्चराईजरचा उपयोग करण्यात येतो. यामुळे त्वचा अधिक काळ हायड्रेट राहण्यास मदत मिळते. पण फारच कमी जणांना मॉईस्चराईज्ड आणि हायड्रेट यातील फरक माहीत आहे. या लेखातून यातील नक्की फरक काय आहे (Difference between Moisturizer and Hydrating) हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला याचा अधिक फायदा घेता येईल. डिहायड्रेशन या शब्दाचा अर्थ होतो पाण्याची कमतरता. हायड्रेट करणे म्हणजे पाण्याची कमतरता दूर करणे. जाणून घेऊया यामधील नक्की फरक

मॉईस्चराईजिंग आणि हायड्रेटिंगमधील फरक 

हा फरक समजून घेण्यासाठी तुम्हाला पहिले कोरडेपणा आणि डिहायड्रेशन म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यावं लागेल. कोरडेपणा म्हणजे तेलाची कमतरता आणि  डिहायड्रेशन म्हणजे पाण्याची कमतरता. त्वचेला हायड्रेट करण्यासाठी पाण्याची कमतरता दूर केली जाते. तर कोरडेपणा अर्थात ड्रायनेस कमी करण्यासाठी शरीरातील तेलाची कमतरता दूर केली जाते. हायड्रेटिंगचा अर्थ त्वचेला ओलेपणा देणे आणि मॉईस्चराईंजिंगचा अर्थ त्वचेमधील ओलेपणा जपून ठेवणे असा होतो. या दोन्ही गोष्टीतील हा महत्त्वाचा फरक आहे. 

हायड्रेट त्वचा (Hydrate Skin)

चमकदार त्वचा मिळविण्यासाठी हायड्रेट राखणं गरजेचे आहे. त्वचा हायड्रेट असेल तर त्वचेवर चमक राहते. याशिवाय तुमची त्वचा मॉईस्चराईज राखण्यास याची मदत होते. त्वचा हायड्रेट करण्यासाठी दिवसभरात 9-10 ग्लास पाण्याचे सेवन तुम्ही करावे. याशिवाय तुम्ही मधाचा वापर आणि ग्लिसरीन अशा नैसर्गिक उत्पादनांचा वापर केल्यास त्वचा हायड्रेट राखण्यास मदत मिळते. 

मॉईस्चईझर महत्त्वाचे 

हायड्रेशनमुळे त्वचेवर चमक येते तर मॉईस्चर कमी असेल तर त्वचा कोरडी होते. त्वचेवर मॉईस्चराईजर लावल्याने त्वचेचा मुलायमपणा कायम राहातो. बाजारामध्ये स्किन टाईपनुसार मॉईस्चराईजर मिळते. कोरड्या त्वचेसाठी जेलचे मॉईस्चराईज मिळते तर त्वचेसाठी क्रिम मॉईस्चर मिळते. तुमची त्वचा नक्की कोणत्या स्वरूपाची आहे, हे पाहून तुम्ही मॉईस्चराईजरचा वापर करावा. 

ADVERTISEMENT

तुमच्या त्वचेसाठी नक्की काय योग्य आहे 

मॉईस्चराईजर आणि हायड्रेटर दोन्ही त्वचेमध्ये मुलायमपणा आणण्याचे काम करते. त्यामुळे यापैकी आपण त्वचेसाठी नक्की काय वापरायचे आहे हे नक्की तुम्हाला कसं बरं कळणार? तुम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी दोन्ही उत्पादनांचा वापर करू शकता. एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी तुम्ही मॉईस्चराईजिंग आणि हायड्रेटिंग दोन्हीचा वापर करावा. तर त्वचा हायड्रेट राखण्यासाठी तुम्ही शीट मास्कचा उपयोगही करू शकता. बाजारात तुम्हाला अगदी सहज शीट मास्क मिळतील. याशिवाय तुमच्या स्किन टाईपनुसार शीटमास्कचा वापर केल्यास, त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते. 

त्वचा मॉईस्चराईज करण्यासाठी लावा क्रिम 

त्वचेची नैसर्गिक चमक ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक मुलायमपणा राखण्यासाठी मॉईस्चराईजिंग क्रिमचा वापर करावा. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि पुसून मॉईस्चराईजिंग क्रिम लावा. यामुळे त्वचा चांगली राहाते. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही वॉटरबेस्ड मॉईस्चराईजरचा वापर करू शकता. तर कोरडी त्वचा असल्यास, तुम्ही क्रिम बेस्ड मॉईस्चराईजर वापरा. त्वचेची काळजी घेण्यासाठी मॉईस्चराईजर अत्यंत उपयुक्त आहे. कारण यामुळे त्वचा अधिक तरूण आणि चमकदार दिसेल. कोरडी त्वचा असेल तर सुरकुत्या लवकर न येण्यासाठी मॉईस्चराईजरचा वापर करावा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

08 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT