ऑक्टोबर हिट (October heat) संपून आता लवकरच थंडीचे दिवस सुरू होतील. तसं तर त्वचा कोरडी फक्त थंडीमध्येच होते असं नाही तर कोणताही ऋतू बदलल्यावर त्याचे परिणाम त्वचेवर दिसून येतात. त्वचा कोरडी पडल्यावर खाज येणे, रॅशेस होणे असे प्रकार नक्कीच त्रासदायक ठरतात. कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींना त्वचेची काळजी घ्यावी लागते. अन्यथा त्वचा फाटून अधिक त्रास होतो. तसंच बदलत्या ऋतुनसार कोरड्या त्वचेची समस्या तुमचा लुक अधिक खराब करते. पण तुम्ही घरातील साहित्यांचा वापर करून कोरड्या त्वचेची (Dry Skin) काळजी घेऊ शकता. घरातील काही घटक तुम्हाला यासाठी फायदेशीर ठरतात. या घटकांच्या मदतीने बनवा सोपे मास्क आणि करा तुमच्या कोरड्या त्वचेची काळजी. कोरड्या त्वचेमध्ये अधिक फ्लेकी होते आणि त्यामुळे चेहरा सतत कोरडा दिसतो. त्यामुळे तुम्ही नियमित मॉईस्चराईजिंग, एक्सफोलिएशन आणि टोनिंगसारख्या गोष्टीचा वापर करायला हवा. पाहूया कोणते मास्क तयार करून तुम्ही कोरड्या त्वचेची काळजी घेऊ शकता.
तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर, हातापायावर कधीही हा मास्क वापरू शकता. हा मास्क घरीच तयार करता येतो. थोडासा चिकट असला तरीही चेहऱ्याासाठी हा उत्तम मास्क ठरतो. दह्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स तुम्हाला फायदा मिळवून देतात. तर याशिवाय तुमच्या निस्तेज त्वचेला अधिक झळाळी आणण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्वचेवर अत्यंत चांगला चमकदारपणा आणण्यासाठी तुम्ही 1 चमचा दही, मध आणि त्यात एक पिकलेले केळं मिक्स करून व्यवस्थित फेटून घ्या. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला साधारण 15 मिनिट्स लावा आणि मसाज करा. चांगला परिणाम तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आठवड्यातून दोन दिवस याचा नक्की वापर करा. मधाचा वापर करून चेहऱ्यावरील मुरूमंदेखील दूर होतात.
कोरडी त्वचा असेल तर त्यासाठी अंड्यांचा योग हा चांगला पर्याय मानण्यात येतो. अंड्याच्या पांढऱ्या भागामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आपण काढू शकतो आणि अंड्याच्या योकमुळे कोरड्या त्वचेला फायदा मिळतो. यामध्ये अधिक प्रमाणात हायड्रेटिंग फॅट्स आढळतात जे तुमच्या कोरड्या त्वचेला मॉईस्चराईज करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसंच यामध्ये थोडेसे मध तुम्ही मिक्स केल्यास, त्याचाही चांगला परिमाण होतो. अंड्याचा योक तुम्ही चेहऱ्याला लावा आणि साधारण 10-15 मिनिट्स तसंच राहू द्या. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. तुम्ही याचा वापर आठवड्यातून एक वेळ केलात तरीही कोरड्या त्वचेची चांगली काळजी घेतली जाऊ शकते.
कोरड्या त्वचेसाठी शिया बटर नक्कीच चांगला पर्याय आहे. तुम्ही शिया बटर आणि कोरफड यांचे मिश्रण वापरल्यास, फायदा मिळू शकतो. अगदी त्वरीत शिया बटर विरघळतो आणि त्यामुळे याचे मिक्स्चर चांगले तयार होते. तसंच चेहऱ्यासाठी चांगले मॉईस्चराईजर म्हणून याचा उपयोग होतो. हे मिक्स्चर तुम्ही चेहऱ्याला लावा आणि साधारण 15 मिनिट्स तसंच चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. त्यानंतर चेहरा चांगला हाताने पॅट करून घ्या. थोड्याच दिवसात तुम्हाला परिणाम दिसून येईल.
या दोन्ही घटकांमुळे चेहऱ्याची त्वचा हायड्रेट करण्यास फायदा मिळतो. तसंच हे दोन्ही घटक शरीराला थंडावा देतात त्यामुळे याचा उष्णतेच्या दिवसात अधिक वापर करता येतो. पण थंडीमध्येही तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. तुम्हाला जर थंड वस्तू शरीराला योग्य ठरत नसतील तर अजिबात याचा वापर करू नका. 1 चमचा कोरफड जेल आणि एक चमचा काकडीचा पल्प एकत्र करा. यामध्ये नीट मिक्स करून झालं की, चेहऱ्याला लावा आणि मग सुकू द्या. सुकल्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. तसंच तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी याचा खूपच चांगला वापर करून घेता येतो.
कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींसाठी हे सर्व घटक अत्यंत उपयुक्त ठरतात. तसंच तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की, प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते, त्यामुळे यापैकी कोणते घटक तुमच्या त्वचेसाठी हानिकारक आहेत यानुसारच त्याचा वापर करावा.