रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण जो श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला साजरा केला जातो. तर दुसरीकडे भाऊबीज हा सण कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला साजरा केला जातो. भाऊबीज हा सण दिवाळीतील पाचव्या म्हणजेच शेवटच्या दिवशी साजरा केला जातो. रक्षाबंधनची माहिती आणि रक्षाबंधन कथा आपल्यापैकी बरेच जणांना माहिती असेलच. तर भाऊबीज आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण भाऊ बहिणीच्या नात्यांशी जोडलेले सण आहेत. पण रक्षाबंधन शुभेच्छा देताना तुम्ही या दोन्ही सणांमध्ये नेमका काय फरक आहे. याचा विचार केला आहे का? चला जाणून घेऊया रक्षाबंधन आणि भाऊबीज यात नेमका काय फरक आहे. कारण आपल्याकडे रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा (bhaubeej wishes in marathi) आवर्जून दिल्या जातातच.
- रक्षाबंधन या शब्दाला संस्कृतमध्ये रक्षा सूत्र बंधन असं म्हटलं गेलं आहे तर भाऊबीजला संस्कृतमध्ये भगिनी हस्ते भोजन असे म्हणतात. याचा अर्थ असा की, रक्षाबंधनला रक्षा सूत्र बांधतात तर भाऊबीजेला बहीण आपल्या भावाला जेऊ घालते.
- रक्षाबंधनच्या दिवशी बहीणीचं खास महत्त्व असतं. विवाहीत बहिणीला भाऊ आपल्या घरी बोलावून तिच्याकडून हातावर राखी बांधून घेतात आणि तिला भेटवस्तू देतात. तर भाऊबीजेला बहीण आपल्या भावाला घरी बोलवून त्याचे औक्षण करून त्याला जेऊ घालते. याचा अर्थ असा की, रक्षाबंधनला बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात तर भाऊबीजेच्या दिवशी फक्त औक्षण केलं जातं.
- रक्षाबंधन म्हणजेच रक्षा सूत्र धागा किंवा कलावा आपल्या हातावर बांधण्याची परंपरा असलेला हा सण आहे तर भाऊबीजेच्या दिवशी असं नसतं. भाऊबीज कोणत्याही अशा परंपरेतून आलेला सण नाही.
- रक्षाबंधन सणाची सुरूवात जिथे इंद्रदेव, राजा बळी आणि श्रीकृष्णामुळे झाली तर भाऊबीज सणाची सुरूवातही यमराजामुळे झाली. त्यामुळेच या सणाला यम द्वितीया असेही म्हणतात.
- रक्षाबंधनला महाराजा बळीची कथा ऐकण्याची प्रथा आहे तर भाऊबीजेला यम आणि यमुनेची कथा ऐकण्याची प्रथा आहे.
- रक्षाबंधनला मिठाई खाऊ घालतात तर भाऊबीजेला जेवणानंतर पान खाऊ घालण्याची प्रथा आहे. अशी मान्यता आहे की, भावाला पान भेट केल्याने बहिणीचं सौभाग्य अखंड राहतं.
- भाऊबीजेला भाऊ बहीण यमुना नदीत स्नान करतात. ज्यामुळे यमराज त्यांना यमलोकात यातना देत नाही. या दिवशी मृत्यूची देवता यमराज आणि त्याची बहीण यमुना हीचं पूजन केलं जातं. तर रक्षाबंधनला असं नसतं.
- रक्षाबंधन हा राखीचा सण आहे आणि याला दक्षिण भारतात नारळी पौर्णिमा या नावानेही ओळखलं जातं. तसंच तिकडे वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. दुसरीकडे भाऊबीज अनेक प्रांतात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.
- भाऊबीज हा असा एक सण आहे जो संपूर्ण भारतात साजरा केला जातो. तर रक्षाबंधन हा सण काही प्रांतातच प्रचलित आहे. कारण श्रावण पौर्णिमेला भावाबहिणीशी जोडून मानलं जात नाहीत.
- कर्नाटकमध्ये याला सौदरा बिदिगे नावाने ओळखलं जातं तर बंगालमध्ये भाऊबीजेला भाई फोटा नावाने ओळखलं जातं. गुजरातमध्ये भै-बीज, महाराष्ट्रामध्ये भाऊबीज म्हणतात तर जास्तकरून प्रांतात भाऊबीज म्हणतात. भारताबाहेर नेपाळमध्ये याला भाईटीका असं म्हणतात. मिथिलामध्ये याला यम द्वितीया अशा नावाने साजरा केला जातो.