ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड होणार जॅकी श्रॉफची ऑनस्क्रीन बहीण

टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड होणार जॅकी श्रॉफची ऑनस्क्रीन बहीण

सलमान खानचा कॉप ड्रामा ‘राधे – युअर मोस्ट वॉन्डेड भाई’ हा चित्रपट मागच्या वर्षीपासून चर्चेत आहे. मागच्या वर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना आणि अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचं शूटिंग पुढे ढकलण्यात आलं. या चित्रपटात सलमान खान एका धाडसी पोलिस ऑफिसरची भूमिका साकारणार आहे आणि टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी सलमानच्या नायिकेच्या भूमिकेत असणार आहे. विषेश म्हणजे या चित्रपटात जॅकी श्रॉफदेखील असणार आहे आणि दिशा चक्क त्यांच्या लहान बहिणीचे पात्र साकारणार आहे. ज्यामुळे टायगरची गर्लफ्रेंड आता त्याचे वडील जॅकी श्रॉफ यांची ऑनस्क्रिन बहीण होणार आहे. 

दिशा आणि टायगरचं रिलेशन

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री आहे. त्यांनी दोघांनीही ते प्रेमात असल्याचं कधीच जगजाहीर केले नसले तरी दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा चर्चा नेहमीच कानावर येत असतात. कारण ती दोघंही सतत एकमेकांसोबत दिसतात. काही दिवसांपूर्वीच ही दोघं मालदिव्जमध्ये वेकेशनचा आनंद घेताना दिसले होते. दिशा आणि टायगर एकमेकांसोबत राहतात आणि ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत अशीही चर्चा सुरू आहे. त्यांचे सोशल मीडियावरील फोटोज आणि सतत कुटुंबासोबत एकत्र येण्यातून त्यांच्यामध्ये प्यार वाली लव्ह स्टोरी सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Instagram

ADVERTISEMENT

राधेमध्ये काय असणार सलमान, जॅकी आणि दिशाची भूमिका –

सलमान खान, जॅकी श्रॉफ आणि दिशा पटानी हे त्रिकूट या आधी ‘भारत’ चित्रपटात एकत्र दिसलं होतं. मात्र त्या चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि दिशा पटानी यांचा कोणताही सीन एकत्र दाखवण्यात आला नव्हता. आता राधेमध्ये मात्र दिशा तिच्या होणाऱ्या सासऱ्यांची ऑनस्क्रिन बहीण साकारताना दिसणार आहे. जॅकी श्रॉफ या चित्रपटामध्ये एका विचित्र पोलिस ऑफिसची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ज्यामुळे चित्रपटात काही मजेशीर किस्से घडणार आहेत.  या तिघांसोबतच या चित्रपटात रणदीप हुड्डा, जरीना वहान असे अनेक इतर कलाकारदेखील असणार आहेत. 

सलमानच्या राधेची चाहत्यांना लागली उत्सुकता

राधे – युअर मोस्ट वॉन्डेड भाई चित्रपटाची निर्मिती सलमान खान, सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री करत आहेत. चित्रपटाचे शूटिंग मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्येच पूर्ण झाले असून आता या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. सलमानचे चाहते या चित्रपटाची मागच्या वर्षीपासून आतूरतेने वाट पाहत आहेत. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट बराच रखडला असला तरी  या वर्षीही तो नेमका  कधी प्रदर्शित होणार याबाबत शंकाच आहे. कारण सलमानने या चित्रपटासाठी खूप मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्याने केलेल्या काही  डीलनुसार त्याला चित्रपटामधून चांगली कमाई होणं अपेक्षित आहे. प्रभुदेवाने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एका कोरिअन चित्रपटाचा रिमेक असणार आहे. सलमानने त्याच्या वाढदिवशी हिंट दिली होती की हा चित्रपट 2021 च्या ईदला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सलमानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. त्यामुळे चित्रपटगृहांच्या मालकांनाही हा चित्रपट ओटीपीवर नाही तर सिनेमागृहातच प्रदर्शित व्हावा असं वाटत आहे. 

 

 

ADVERTISEMENT

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

अभिनयासाठी ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी सोडली हातातली नोकरी

ADVERTISEMENT

या बॉलीवूड अभिनेत्री हुबेहूब दिसतात त्यांच्या ‘आई’सारख्या

बॉलीवूड कलाकार जे आहेत उत्तम लेखक

06 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT