ADVERTISEMENT
home / Mental Health
divorce

घटस्फोटानंतर सावरणे कठीण, पण अशक्य नव्हे

कुठलीही व्यक्ती लग्न करताना आनंदातच असते. (जर लग्न जबरदस्तीने होत नसेल तर). आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवण्याची कल्पना खूप सुखावह असते. पण दुर्दैवाने काही कारणांमुळे जर तुमच्यावर घटस्फोट घेण्याची वेळ आली तर ते पचवणे खूप कठीण असते. घटस्फोट ही एक मनस्ताप देणारी घटना आहे. या घटनेमुळे आपले आयुष्य बदलून जाते. लोकांच्या आपल्याकडे बघण्याच्या नजरा बदलतात. काही लोक सहानुभूती देतात तर काही लोक टोमणे मारतात. फार कमी लोक असे असतात जे आपली मनस्थिती समजून घेऊन आपल्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. 

आपल्या जोडीदारापासून कायदेशीररित्या विभक्त होणे या घटनेचा आपल्या संपूर्ण आयुष्यावर मोठा परिणाम होतो. पण सर्वात जास्त गंभीर परिणाम आपल्या आत्मविश्वासावर व आत्मसन्मानवर होतो. विभक्त झाल्यानंतर सर्वात पहिली स्टेप म्हणजे स्वतःचे मन शांत करणे, दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालून ती भळभळती जखम बरी करणे ही आहे. घटस्फोट म्हणजे अपयश नव्हे हा विचार मनाशी पक्का ठेवणे फार आवश्यक आहे. तरच आपण त्यातून लवकर बाहेर पडू शकतो. 

अधिक वाचा – हल्ली का जास्त काळासाठी टिकत नाहीत लग्न

मदत मागा

घटस्फोट होताना किंवा झाल्यानंतर एकटेपणा वाटू लागतो. नैराश्य येते किंवा प्रचंड मनस्ताप होतो. अशा वेळी त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत घेणे आवश्यक आहे. आपल्या पडत्या काळात कुणाकडून मदत घेण्यात कमीपणा नाही. आयुष्य म्हटले की त्यात चढउतार आलेच. तुम्हाला गरज असेल तेव्हा तुमच्या पाठीशी जी जवळची माणसे उभी राहतात त्यांच्याकडून हक्काने मदत मागा. आपले मन त्यांच्यापाशी मोकळे करता. एकटेपणा वाटत असल्यास त्यांची सोबत मागा. जर कुणीच नसेल तर प्रोफेशनल थेरपिस्ट तुमची नक्कीच मदत करू शकतात. आपल्या मनातील भावना दुसऱ्याशी शेअर केल्याने मन हलके होते.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – नात्यातून बाहेर पडण्याची वेळ झाल्याचे हे आहेत संकेत

भावनांना ऍक्सेप्ट करा 

आपल्याला वाटते की जर आपण एखादी भावना मनात दाबून ठेवली, तिच्याकडे दुर्लक्ष केले तर ती आपोआप निघून जाईल. पण असे घडत नाही. एखाद्या भावनेकडे आपण दुर्लक्ष केले तर ती आपल्या मनात खोलवर रुतून बसते. म्हणूनच जेव्हाही तुमच्या मनात तुमच्या माजी जोडीदाराविषयी काही भावना येतील, त्या कुणाशी तरी शेअर करा. जुन्या आठवणी सारख्या सारख्या आठवणे, माजी जोडीदाराचा विचार मनात येणे, त्याची आठवण होणे यात चुकीचे काहीच नाही. ये घडणे साहजिक आहे.

“त्याला /तिला विसरून जा” हे सांगणे जितके सोपे आहे तितकेच ते अंमलात आणणे कठीण आहे. त्यामुळे तुमच्या मनातील भावनांकडे दुर्लक्ष न करता त्या लिहून काढा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींपाशी मन मोकळे करा. दुर्लक्ष केल्याने रिकव्हरी मध्ये अडथळा येतो. ‘मला काहीच वाटत नाही’ असे म्हणून स्वतःच्या मनाला फसवण्यापेक्षा स्वतःच्या भावना स्वीकारा.  कधी कधी मनमोकळेपणाने रडणे सुद्धा रिकव्हरी होण्यात फायदेशीर ठरते. 

स्वतःला माफ करा

स्वतःच्या समस्या ऍक्सेप्ट करण्यासही धैर्य लागते. स्वतःच्या मनाशी हे पक्के ठरवा की मी एक धैर्यशील व्यक्ती आहे. यातूनही मी काहीतरी धडा घेऊन पुढे जाणार आहे. मी एक चांगली व्यक्ती असून मी आदर, प्रेम व सन्मान मिळण्यास पात्र आहे. घटस्फोटाकडे एक अपयश म्हणून बघू नका. पण एक नाते तुटले म्हणजे त्यात सगळी चूक तुमचीच होती असे नाही. त्रयस्थपणे विचार केलात तर तुम्हाला कळेल की तुम्ही वाटेल ते केले असले तरीही परिस्थितीच अशी होती की ते नाते टिकणार नव्हते. म्हणूनच स्वतःला माफ करा आणि आयुष्यातल्या इतर पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. 

ADVERTISEMENT

घटस्फोट झाल्यानंतर सावरणे कठीण जरी असले तरी अशक्य नाही. काळजी घ्या कारण तुमचे आयुष्य खूप मौल्यवान आहे. 

अधिक वाचा – घटस्फोट नक्की का होतात, काय आहेत कारणे

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

14 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT