ADVERTISEMENT
home / नातीगोती
reasons-why-people-get-divorced

घटस्फोट नक्की का होतात, काय आहेत कारणे

नुकताच समांथा अक्किनेनी (Samantha Akkineni) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) या दाक्षिणात्य सुपरस्टारचा घटस्फोट झाला. या दोघांची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्री नेहमीच सर्वांना आवडली होती. तर दोघांचाही घटस्फोट झाल्यानंतर अनेकांना वाईट वाटले आहे. असे नक्की काय घडले की या दोघांना घटस्फोट घ्यावा लागला या चर्चांनाही ऊत आला. अशा अनेक जोड्या असतात ज्या आपल्याला आदर्श वाटतात पण अचानक त्यांचा घटस्फोट होतो आणि आपले विचारचक्र सुरू होते की, घटस्फोट (Divorce) नक्की का होतो? अशी कोणती कारणे आहेत की, पती – पत्नी एकमेकांसह राहू शकत नाही. विशेषतः प्रेमात पडून लग्न करणाऱ्या जोड्यांना नक्की असं काय वाटतं की त्यांचा घटस्फोट होतो. एकमेकांशिवाय राहू न शकणाऱ्या व्यक्ती अचानक एकमेकांचे तोंडही पाहणे बंद करतात. घटस्फोट नक्की का होतो याची काही महत्त्वाची कारणे –

संवाद व्यवस्थित न होणे (Communication Problem)

कोणत्याही नात्याचा पाया हा संवादावर आणि विश्वासावर टिकून असतो. घटस्फोट होण्याचे मुख्य कारण दोन्ही व्यक्तींमध्ये संवाद नसणे. एकमेकांना समजून न घेणे अथवा एकमेकांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढणे यामुळेही नातं खराब होतं. पण याचे मूळ म्हणजे तडजोड न करू शकणे आणि समोरचा माणूस नक्की काय सांगायचा प्रयत्न करत आहे हे समजून घेण्याची ताकद नसणे. एखादी जोडी जेव्हा आपल्या समस्या आणि आपण काय म्हणत आहोत हे एकमेकांनी नीट समजावून देऊ शकत नाही तेव्हा त्यांच्यातील दरी वाढतच जाते. एकमेकांशी संवाद होण्यापेक्षा वाद अधिक होऊ लागतात आणि मग त्याचे रूपांतर वेगळं होण्यात अर्थात घटस्फोटात होतं. हा संवाद जेव्हा पूर्ण बंद होतो तेव्हाच नातं तुटतं. 

अधिक वाचा – नात्यामधील रोमान्स नक्की का कमी होतो, जाणून घ्या कारण

इंटिमसी नसणे (Lack of Intimacy)

कपल्सदरम्यान ताण वाढण्यासाठी हेदेखील एक कारण आहे. केवळ I Love You म्हटलं म्हणजे तुमचं प्रेम आहे असं होत नाही. तर तुम्ही एकमेकांशी कसं वागता आणि एकमेकांची कशी काळजी घेता यावरूनच तुमचं प्रेम दिसून येतं. असं अजिबात नाही की, तुम्ही एकमेकांसह बेडरूममध्येच वेळ व्यतीत करावा. पण तुमचा एकमेकांना होणारा स्पर्शही बरंच काही सांगून जातो. एकमेकांना मिठी मारणे, एकमेकांचा हात हातात घेऊन बसणे, चुंबन घेणे अशा काही लहानसहान गोष्टीही तुमचे प्रेम दर्शवत असते. यामुळे कपल्स एकमेकांशी कनेक्टेड राहतात. आपल्या जोडीदाराचे आपल्याकडे लक्ष आहे हे त्याच्या स्पर्शातून आणि वागण्यातून जाणवणे गरजेचे आहे. फिजिकल डिस्कनेक्शन झाल्यास, नात्यामध्ये निरसता निर्माण होते आणि मग एकमेकांपासून दूर जाण्याची प्रक्रिया सुरू होते. हे वेळीच सुधारले नाही तर मग नाते घटस्फोटापर्यंत पोहचते. 

ADVERTISEMENT

लग्नामध्ये पार्टनरशिप न राहणे (No partnership in relation)

कोणतीही जोडी म्हटलं की एकमेकांना साथ देणे आणि साथ निभावणे या गोष्टी साहजिकच येतात. पण जेव्हा तुम्ही नात्यामध्ये आपण एकटेच सर्व काही करत आहोत अशा जाणीवेने राहू लागता तेव्हा नातं टिकणं खूपच कठीण होतं. दोघांचेही आयुष्य चांगले आहे पण एकमेकांसाठी काहीच करत नसतील तर त्या नात्याला काहीच अर्थ नाही. आपल्या जोडीदाराला प्राथमिकता देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तसं जर होत नसेल तर मग नात्यांमध्ये भांडणाला सुरूवात होते. एखाद्याला आपले नाते उगीचच एकतर्फी चालू आहे असं वाटू लागलं तर मग घटस्फोटासाठी पाऊल उचलले जाते. कारण समोरची व्यक्ती समजूनच घेत नसेल आणि आदर करतच नसेल तर त्या नात्याला काहीच अर्थ उरत नाही. उगीच एकमेकांसोबत राहण्यात काही अर्थ नाही असंही समजण्यात येतं. 

अधिक वाचा – अपेक्षांचे ओझे वाढवू शकते नात्यातील तणाव.. तुम्ही करत नाही ना ही चूक

भावनिक पाठिंबा नसणे (Lack of Emotional Support)

एक नाते हे केवळ पैशावर अथवा नुसत्या प्रेमावर टिकत नाही. तर नात्यादरम्यान भावनिक पाठिंबा असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एकमेकांच्या सुखदुःखात भावनिक पाठिंबा असायला हवा. पण संवाद नसल्याने असं प्रत्येक जोडीमध्ये होतंच असं नाही. भावनिक पाठिंबा नसल्यानेही नाते तुटते. त्यामुळे मनाने एकमेकांपासून व्यक्ती दूर होऊ लागतात. केवळ शरीराने जवळ असणे हे नात्याचे गणित नाही तर मनानेदेखील तितकेच जोडले गेले असायला हवे तर नात्यातील गोडी टिकून राहते. एकमेकांबद्दल भावनिकता नसेल तर एकत्र राहणे कठीण होते. 

याशिवाय आजकाल वाढत जाणारा कामाचा ताण, एकमेकांना वेळ देऊ न शकणे, अचानक उद्भवणारी Extra Marital Affairs अशी अनेक घटस्फोटासाठी कारणे महत्त्वाची ठरतात. पण तुम्हाला तुमच्यावर ही वेळ येऊ द्यायची नसेल तर वेळीच विचार करा. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – बाळाच्या जन्मानंतर ‘या’ गोष्टींमुळे येऊ शकतो पतीपत्नीमध्ये दुरावा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT