ADVERTISEMENT
home / आरोग्य
drink-aloe-vera-juice-on-empty-stomach-for-health-benefits

रिकाम्या पोटी प्या कोरफड रस, मिळतील फायदे

आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या आरोग्याच्या समस्या आहेत आणि त्या दूर करण्यासाठी अनेक औषधेही घ्यावी लागतात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या डाएटकडे लक्ष देता तेव्हा तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळते. तुम्हाला काही आरोग्याच्या समस्या असतील अथवा पुढे मधुमेह अथवा रक्तदाब अशा समस्या नको असतील त्यासाठी तुम्ही रिकाम्या पोटी कोरफड रस (Aloe Vera Juice) प्यायला हवा. कोरफडच्या रसामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते.  कोरफडचे अनेक फायदे आरोग्यासाठी होतात. केवळ त्वचेसाठीच नाही तर आपल्या गुणांमुळे अनेक रोगांनाही आपल्या शरीरापासून दूर ठेवण्यास याचा उपयोग होतो. काय होतात कोरफड रसाचे फायदे घ्या जाणून. 

पोषक तत्वांनी भरलेले कोरफड 

कोरफडमध्ये विटामिन्स, खनिज, एंजाईम, सॅपोनिन आणि अमिनो असिड हे गुणधर्म असतात. हे विटामिन ए, सी, ई, फॉलिक असिड, कॉलिनचे भंडार आहे. इतकंच नाही तर यामध्ये कॅल्शियम, क्रोमियम, तांबे, सेलेनियम, मॅग्नेशियम, मँगनीज, पोटॅशियम, सोडियमसारखे मिनरल्सदेखील असतात. हे सर्व पोषक तत्व शरीराची कार्यप्रणाली व्यवस्थित करण्यास मदत करतो. 

कसा बनवता येतो कोरफडचा रस 

असे तर बाजारामध्ये अनेक ठिकाणी तयार कोरफड ज्युस मिळतात. पण घरी आपण आपल्या हाताने बनवलेला कोरफडचा रस हा अधिक आरोग्यदायी आहे. हा रस नक्की कसा बनवायचा ते जाणून घेऊया. 

  • सर्वात पहिल्यांदा कोरफडची पाने तोडून ती धुवा 
  • त्यानंतर तुम्ही बाहेरील साल काढून टाका 
  • कोरफडमधील जेल काढून घ्या आणि पाण्यासह व्यवस्थित ब्लेंड करा. तुमचा कोरफड रस तयार आहे 
  • एका ग्लासामध्ये हे काढून घ्या आणि त्यात लिंबाचा रस पिळून रिकाम्या पोटी प्या

कोरफड रसाचे फायदे 

कोरफड रसाचे सेवन कधीही करू शकता. पण रिकाम्या पोटी कोरफड रस पिण्याचे अधिक फायदे आहेत. हे फायदे नक्की काय आहे बघूया – 

ADVERTISEMENT
  • कोरफड रस तुमच्या पाचनक्रियेसाठी उत्तम आहे. वास्तविक यामध्ये प्रोबायोटिक योगिक आहे, जे तुमच्या आतडीमधील चांगला बॅक्टेरिया वाढविण्यासाठी मदत करतो. यामुळे तुमची पचनशक्ती क्रिया अधिक चांगली होती आणि यामुळे सकारात्मक बदल होतो 
  • तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी कोरफड रस प्यावा. यामुळे फायदा मिळतो. वास्तविक कोरफड रस हे एका लेक्सेटिव्ह स्वरूपात काम करते. पण यावर अधिक शोधाची गरज आहे 
  • कोरफड रस हे पचनतंत्रासह ओरल हेल्थसाठीही लाभदायक आहे. याच्या सेवनामुळे दाताची आणि ओरल हेल्थ कंडिशन तुम्ही चांगली करू शकता. दातातील किटाणू मारण्यासाठी याचा उपयोग होतो
  • कोरफडमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुण अधिक आढळतात. त्यामुळे हिरड्यांसाठी याचा चांगला उपयोग होतो. तसंच दातांना येणारी सूजही यामुळे कमी होते. याशिवाय तोंडातून येणारा दुर्गंध कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो
  • मुधमेही व्यक्तींनी रोज सकाळी रिकाम्या पोटी कोरफड रसाचे सेवन केल्यास, मधुमेह कमी होण्यास मदत मिळते 
  • तसंच रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि इन्शुलिन स्तर योग्य करण्यासाठी कोरफड रसाचा उपयोग होतो. याशिवाय कोलेस्ट्रॉलदेखील कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच हृदयरोगाच्या त्रासापासूनही वाचवतो

त्यामुळे तुम्हाला अनेक रोगांपासून दूर राहायचे असेल तर तुम्हीही वेळीच तुमच्या नियमित आहारात रिकाम्या पोटी कोरफड रसाचा वापर करून घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

22 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT