ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
how-to-use-aloe-vera

घरगुती कामासाठी वापरू शकता कोरफड

कोरफड एक अशी वनस्पती आहे जे अतिशय सहजपणाने उपलब्ध होते आणि कोरफडचा वापर अनेक प्रकारे करता येतो. कोरफड जेलचा वापर त्वचा आणि केसांसाठी नेहमीच केला जातो, हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण याशिवाय कोरफड नक्की कशासाठी उपयुक्त आहे याची तुम्हाला माहिती आहे का? तुम्हालाही कोरफडचे इतर काय उपयोग आहेत हे माहीत नसेल तर तुम्ही नक्कीच हा लेख वाचायला हवा.

1. एअर प्युरिफाईंग प्लांट 

aloe vera plant

तुम्हाला हे वाचून नक्कीच बरं वाटेल कारण कोरफडचे झाड हे एक चांगले एअर प्युरीफाईंग आहे. नासाच्या अभ्यासात हे सिद्ध करण्यात आले आहे. तुम्ही तुमच्या घरातही कोरफडचे झाड लाऊ शकता. घरात हवा शुद्ध राहण्यासाठी आणि हवा हसतीखेळती राहण्यासाठी तुम्ही तुमच्या गॅलरीत कोरफड नक्कीच लाऊ शकता. नैसर्गिक हवा शुद्ध राखण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये झाडांची लागवड करत असाल तर त्यामध्ये कोरफडचादेखील समावेश करून घ्यायला हवा. शिवाय याचा औषध म्हणूनही तुम्हाला उपयोग होतोच. 

2. स्तनांचा मसाज करण्यासाठी कोरफड 

ब्रेस्ट मसाज (Breast Massage) साठी कोरफडचा उपयोग करून घेता येतो. तुम्ही कोणत्याही अन्य क्रिमप्रमाणे कोरफड जेलचा वापर स्तनांचा मसाज करण्यासाठी करू शकता. सैलसर स्तनांना हे टाईट करू शकते असा दावा अजिबातच करता येणार नाही. मात्र नियमित मसाज तुमचे स्तन मऊ आणि मुलायम राखण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही किमान आठवड्यातून एकदा कोरफड जेलने स्तनांना मसाज करावा. कोरफडचे फायदे अनेक आहेत.

3. जळजळ होत असल्यास, फायदेशीर

कोरफड जेलच नाही तर कोरफडचा रसदेखील फायदेशीर ठरतो. एका अभ्यासात सिद्ध करण्यात आल्यानुसार, 1 ग्लास कोरफडचा रस हा Gastroesophageal reflux disease (GERD) ची समस्या अर्थात तुम्हाला सतत छातीत जळजळ होत असेल तर या समस्येला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. मात्र हे तुम्ही तुमच्या मनाने घेऊ नका. याचे सेवन करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या. हे अभ्यासाच्या आधारे जरी सांगण्यात आले असले तरीही तुमच्या शरीरासाठी हे योग्य आहे की नाही हे तपासून घेणेही गरजेचे आहे. 

ADVERTISEMENT

4. तजेलदार राहण्यास मदत 

काही भाज्या अथवा फळं उदाहरणार्थ टॉमेटो, सफरचंद अशा गोष्टी कोरफडच्या सान्निध्यात राहिल्यास अधिक तजेलदार राहण्यास आणि टिकण्यास मदत मिळते. टॉमेटो अथवा सफरचंद काही कालावधीतच न वापरल्यास सडतात. पण कोरफड जेल लाऊन ठेवल्यास, अधिक काळापर्यंत टिकतात. पण हे सर्व फळांसाठी लागू होत नाही. तसंच तुम्ही कोणतीही भाजी वा फळाचा वापर करताना त्या धुऊन स्वच्छ करून मगच वापराव्यात.

5. नैसर्गिक लॅक्सेटिव्ह 

ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेची समस्या आहे अथवा अपचनाची अधिक समस्या आहे त्यांनी कोरफडचा नैसर्गिक रस प्यावा जो नैसर्गिक लॅक्सेटिव्हप्रमाणे काम करतो. एका अभ्यासानुसार बद्धकोष्ठतेवर याचा चांगला परिणाम होतो हे सिद्ध झाले आहे. मात्र तुम्हाला याची अलर्जी नाही ना याची पडताळणी करून मगच तुम्ही याचे सेवन करावे. 

वर दिलेल्या सर्व टिप्स तुम्ही वापरू शकता. तसंच कोरफडचे त्वचा आणि केसांना उपयुक्त ठरण्याशिवाय इतरही उपयोग होतात हे तुम्ही या लेखातून नक्कीच जाणून घेतले असेल. त्वचेला चमक देण्यासाठीही कोरफडचा उपयोग होतो. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
08 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT