स्वयंपाक करणं ही एक कला आहे. कोणतीही कला आत्मसात करायची असेल तर सर्वात आधी त्या कलेतील बेसिक ज्ञान मिळवणं गरजेचं असतं. स्वयंपाक कला तर तुम्हाला आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर उपयुक्त ठरते. स्वयंपाक करणं ही फक्त महिलांची जबाबदारी नसल्याने आजकाल पुरूषदेखील स्वयंपाकात रस घेतात. खरंतर घरातील प्रत्येकाला किचन मॅनेजमेंट यायलाच हवं. नोकरी करणाऱ्या अथवा दिवसभर बिझी असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा वेळेवर भुक लागतेच. दररोज आपण काही मेस अथवा हॉटेलमधील जेवण जेवू शकत नाही. शिवाय घरात स्वयंपाकासाठी कूक असेल तरी कधी ना कधी तरी त्याला सुट्टी द्यावीच लागते. मग स्वावलंबी होत आपण स्वयंपाक कला शिकण्याशिवाय कोणताच पर्याय आपल्याजवळ उरत नाही. योग्य मार्गदर्शन असेल तर स्वयंपाक कला तुम्ही सहज आत्मसात करू शकता. यासाठीच स्वयंपाकातील कौशल्य मिळवण्यासाठी फॉलो करा या किचन टिप्स मराठी (Kitchen Tips in Marathi) यासोबतच जाणून घ्या उन्हाळ्यातील आहार | Food For Summer Days In Marathi,
सोप्या किचन टिप्स मराठी – Cooking Kitchen Tips In Marathi
एखादा पदार्थ नव्याने शिकताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि स्वादिष्ट करण्यासाठी या किचन टिप्स (Cooking Kitchen Tips in Marathi) तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील.
- एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा. त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा. योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या.
- स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी आधीच तयार करून ठेवा.
- भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा.
- कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला.
- डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा.
- स्वयंपाक करायला सुरूवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो.
- भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा दोन तीन दिवसांसाठी तयार करून ठेवा. यासोबतच पौष्टीक आणि चविष्ट पालक भाजी करण्यासाठी फॉलो करा या रेसिपीज
- लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो.
- शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते.
- खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपू्र्ण खोवून फ्रिजमध्ये ठेवा. ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल.
- पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुशखुशीत होतात. पराठा, शंकरपाळी, कचोरीसाठी या टिप्सचा वापर करा.
- गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा ज्यामुळे ते करपणार नाहीत.
- गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दुध वापरा ज्यामुळे त्यांचा टेक्स्चर छान येईल.
- दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या.
- फ्रिजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा. ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं सोपं जाईल.
- एखाद्या पदार्थांसाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनीटे पाण्यात भिजत ठेवा.
- भात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका.
- न्यूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये एक थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा.
- रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात एक तास भिजत ठेवा.
- थंडीच्या दिवसांमध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅसजवळ ठेवा.
- बटाटे लवकर उकडण्यासाठी वीस मिनीटे पाण्यात भिजत ठेवा. सोबतच फॉलो करा बटाट्याच्या विविध रेसिपी मराठीतून (Batata Recipe In Marathi)
- लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनीटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा.
- मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा.
- भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही.
- कठीण मळताना चिमुटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत.
- शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा.
- वांग, दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे.
- दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दुध फाटते. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे.
कापणे – सोलणे यासाठी उपयुक्त किचन टिप्स – Cutting And Peeling Kitchen Tips In Marathi
स्वयंपाक करताना तुम्हाला भाज्या, फळं चिरून आणि सोलून घ्यावी लागतात. यासाठी या टिप्स तुम्ही वापरू शकता.
- कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर पंधरा मिनीटे आधी कांजा सोलून त्याचे दोन तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा.
- कांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही.
- सोलण्याआधी भाज्या आणि फळं स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या.
- भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका. कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात.
- बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका.
- सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा. ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहिल.
- कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा.
- गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा. ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल.
- लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही.
- सुकमेवा चॉप करताना तो काही तास फ्रिजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या.
- टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा.
तळणासाठी किचन टिप्स मराठी – Frying Kitchen Tips in Marathi
स्वयंपाक करताना तुम्हाला भजी, वडे, पुरी, वड्या, पापड असे अनेक पदार्थ तळावे लागतात. असे तळलेले पदार्थ करताना लक्षात ठेवा या किचन टिप्स
- पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा. तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही.
- तेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई, जिरे टाका.
- पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी ते रंग बदले पर्यंत नीट तळणं गरजेचं आहे.
- भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचे मोहन आणि बेकिंग सोडा मिसळा.
- वाटणासाठी खोबरं भाजताना ते तेलात तळू नका.
- तळणाचे तेल पुन्हा पुन्हा वापरू नका.
- तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूज पेपरमध्ये काढून ठेवू नका, यासाठी टीश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा.
- पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा.
- भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लोअर टाका.
- तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका.
- अनारसा तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसा थापा.
रस्सा किंवा ग्रेव्हीसाठी किचन टिप्स – Gravies Kitchen Tips in Marathi
भाजी अथवा करी करताना तुम्हाला त्यासाठी रस्सा अथवा ग्रेव्ही बनवावी लागते. साधारणपणे लाल आणि हिरव्या रंगाची ग्रेव्ही भाजीसाठी वापरतात. अशा भाज्या तयार करताना या टिप्स नक्कीच फायद्याच्या ठरतील.
- ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा.
- ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा, ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल.
- ग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर टाकल्याल ग्रेव्हीची चव वाढते.
- टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता.
- ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी पिकलेले टॉमेटोच वापरा.
- ग्रेव्हीचा रंग चांगला असावा यासाठी घरगुती अथवा चांगल्या गुणवत्तेचे मसाले वापरा. घरी मालवणी मसाला तयार करण्यासाठी ही माहिती वाचा.
- आल्यालसणाची पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं.
- ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे. मसाल्याला तेल सुटलं की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाकावं.
- भाजीचा रस्स्यात मीठ जास्त पडलं तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा. पाच मिनीटांनी बटाटा काढून टाकावा. बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रस्स्याचा खारटपणा कमी होतो.
- शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड आणि खसखसीची पेस्ट मिसळावी.
- करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी पाच ते दहा मिनीटे ते कोमट पाण्यात बुडवून ठेवावे.
- पालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात ब्लाच केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे. ज्यामुळे पालकाचा हिरवेपणा कायम राहतो.
- करीची चव चांगली लागण्यासाठी ग्रेव्ही आदल्या दिवशी बनवावी. ज्यामुळे त्यात मसाले चांगले मुरतात.
उरलेल्या पदार्थांसाठी खास किचन टिप्स – Tips On Leftover Food
अन्नपदार्थ शिजवताना योग्य अंदाज आला नाही तर ते मोठ्या प्रमाणावर उरतात. असे शिल्लक राहिलेले शिळे पदार्थ तुम्ही इतर पदार्थांसाठी वापरू शकता. यासाठी जाणून घ्या या टिप्स
- रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एक करा आणि त्याची एक वेगळीच स्वादिष्ट करी तयार होईल.
- शिळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा.
- शिळ्या पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा, लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता. मात्र यासाठी शिळी पोळी कुस्करण्यासाठी ती मिक्सरमध्ये बारीक करा.
- तूप कढवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगदाण्याच्या लाडवांमध्ये करा.
- दिवाळीला उरलेल्या चकली, शेव आणि चिवड्याचा पुर्नवापर करण्यासाठी ते मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा, कोथिंबीर टाकून मस्त थालिपीठ बनवा.
- रात्री उरलेले पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
- पास्ता अथवा भातासारखे पदार्थ उरले तर ते फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाता येतात.
- बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील ते फ्रिजमध्ये ठेवून नंतर सॅंडविज,पराठा, पॅटिस, टिक्कीसाठी वापरता येतात.
- डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका पराठे अधिक पौष्टिक होतील.
- पोळ्यांचे कणीक, थालिपीठाचे भिजवलेले पीठ, थेपल्यांचे कणीक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता. ज्यामुळे पोळ्या, पराठे मऊ होतात.
साठवणीसाठी किचन टिप्स मराठी – Food Storage Kitchen Tips In Marathi
स्वयंपाक घर म्हटलं की अनेक साठवणीचे पदार्थ असतात. उन्हाळ्यात पावसाआधी पापड, कुरडया, मसाले असे साठवणीचे पदार्थ आपण तयार करतोच. शिवाय वर्षभरासाठी मसाले, सुकामेवा, धान्यही साठवून ठेवतो. यासाठी या काही खास टिप्स
- आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवा बंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवा.
- वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रिजमध्ये ठेवा.
- कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी त्या नीट निवडून कापडात गुंडाळून फ्रीडमध्ये ठेवा.
- साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या येत नाहीत.
- मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून टाका
- सुखं खोबरं फ्रिजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर खराब होत नाही.
- कडधान्य टिकण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात सुकवून ठेवावे.
- सुकामेवा टिकण्यासाठी तो थोडा रोस्ट करून बरणीत भरून ठेवावा.
- दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रिजच्या मागील भागात ठेवावे.
- मासे अथवा चिकन फ्रिजरच्या तळाशी साठवून ठेवावे. ज्यामुळे फ्रिजला घाणेरडा वास येत नाही.
- फ्रिजमध्ये बेरीज टिकवून ठेवण्यासाठी त्या व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवाव्या.
- पावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा. पापड, कुरड्यांना ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाहीत.
किचनच्या साफसफाईसाठी खास टिप्स – Kitchen Cleaning Tips in Marathi
निरोगी राहण्यासाठी तुमचं स्वयंपाक घर स्वच्छ आणि निर्जंतूक असायला हवं. यासाठी फॉलो करा या किचनच्या साफसफाईसाठी खास टिप्स Kitchen Cleaning Tips in Marathi
- किचनमधील कचऱ्याचा डबा नियमित स्वच्छ आणि निर्जंतूक ठेवा. आठवड्यातून एकदा डबा धुवून उन्हात वाळवा. ज्यामुळे जीवजंतू त्यात पोसले जाणार नाहीत.
- किचन स्वच्छ करण्यासाठी आऊट ऑफ डेट झालेलं व्हिनेगर, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा वापरा. किचन स्वच्छ आणि निर्जंतूक होईल.
- फ्रिजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी कोळशाचा एक तुकडा ठेवा.
- रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा, शेगडी, ओव्हन नीट स्वच्छ करा. ज्यामुळे किचनमध्ये झुरळ अथवा कीटक होणार नाहीत.
- किचनमधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगर वापरा.
- किचन सिंक तुंबलं असेल तर ते मोकळं करण्यासाठी त्यात व्हिनेगर टाका.
- किचन टाईल्सवरील जुने डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावा आणि पंधरा मिनीटांनी कापडाने स्वच्छ करा.
- फ्रिज स्वच्छ करण्यासाठी मायक्रो फायबर कापडाने करा ज्यामुळे फ्रिजला चरे पडणार नाहीत.
- आठवड्यातून एकदा चॉपिंग बोर्ड व्हिनेगर लावून स्वच्छ करा.
- चाकू आणि धारदार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा, जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर गंज पकडून त्या खराब होतात.
- किचनमध्ये दुर्गंध येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा टाईल्स पुसताना त्यात जाडे मीठ टाका.
किचनसाठी वास्तू टिप्स – Vastu Tips For Kitchen In Marathi
घरातील प्रत्येक वस्तू वास्तूशास्त्रानुसार हवी. स्वयंपाक घर तर घरातील महत्त्वाची खोली असते. यासाठी जाणून घ्या या काही वास्तू टिप्स
- अग्निचा आरोग्य, यश आणि समृद्धीवर परिणाम होत असतो. यासाठी किचन नेहमी आग्नेय दिशेला असावा. मुंबई सारख्या लहान जागेतील घरात वास्तू शास्त्राचे नियम पाळणे कठीण आहे. मात्र त्यावर योग्य ते उपाय केल्यास वास्तूदोष कमी होतो.
- स्वयंपाक घरात अग्नि आणि पाणी एकत्र ठेवू नये. याचा वाईट परिणाम त्या घरातील स्त्रीच्या मानसिक स्थितीवर होतो.
- स्वयंपाक घर कधीच नैऋत्य दिशेला नसावे. असं केल्यास गृहकलह निर्माण होतात.
- घरात शौचालयावर अथवा खाली स्वयंपाकघर नसावे.
- बेडरूमच्या वर अथवा खाली स्वयंपाक घर असू नये.
- स्वयंपाक घराच्या दरवाज्यासमोर शेगडी नसावी.
- स्वयंपाक घराच्या भिंतीना काळा रंग कधीच देऊ नये.
- किचन सिंक ईशान्य अथवा उत्तर दिशेला असणं शुभ मानलं जातं.
- वास्तू दोष कमी करण्यासाठी किचनमध्ये लाल रंगाचा क्रिस्टल लावावा.
- रात्री झोपताना स्वयंपाक घर स्वच्छ करावे. शेगडी, पाण्याचे भांडे याची पूजा करावी आणि तिथे दिवा लावावा.
- वास्तू शास्त्रानुसार किचनमध्ये डायनिंग टेबल नसावा. जर ठेवायचा असेल तर तो उत्तर पश्चिम अथवा पश्चिम दिशेला ठेवावा.
- किचनचा ओटा काळ्या ग्रॅनाईटपासून बनवू नये. हिरव्या अथा इतर रंगाचा असावा.
- घरातील धान्य नेहमी दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावे.
- किचनच्या मध्यभागी शेगडी कधीच ठेवू नये.
किचन टिप्स आणि काही प्रश्न – FAQs
प्रश्न – किचनमधला सर्वात महत्त्वाचा नियम कोणता ?
उत्तर- किचनमधील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे स्वच्छता पाळणे, कारण जर तुम्ही किचन स्वच्छ ठेवलं तरच तुम्ही निरोगी आणि सृदृढ राहिल.
प्रश्न – स्वयंपाक करताना कोणता गोल्डन नियम पाळायला हवा ?
उत्तर – स्वयंपाक करताना पाळायचा सर्वात मुख्य नियम म्हणजे अन्न नीट शिजवणे आणि स्वयंपाक करण्यापूर्वी नीट नियोजन करणे.
प्रश्न – पदार्थ शिजवण्यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात का ?
उत्तर – पदार्थ अति शिजवण्यामुळे त्यातील पोषक घटक नक्कीच कमी होतात. यासाठी पदार्थ योग्य तापमानावर आणि योग्य प्रमाणातच शिजवायला हवेत. पण याचा अर्थ कच्चे पदार्थ खाणं चांगलं असं नाही. कारण मांस, मासे अथवा अंडी कच्ची खाण्यामुळे इनफेक्शन होण्याची शक्यता असते. यासाठी अन्न योग्य प्रमाणात शिजवून मगच खावे.
Conclusion – आम्ही शेअर केलेल्या या किचन टिप्स मराठीतून (Kitchen Tips in Marathi), किचनच्या साफसफाईसाठी खास टिप्स Kitchen Cleaning Tips in Marathi, किचनसाठी वास्तू टिप्स Vastu Tips for Kitchen in Marathi तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुमच्याजवळ असतील अशाच काही भन्नाट किचन टिप्स तर त्यादेखील तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता. भन्नाट किचन टिप्स तर त्यादेखील तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता.