ADVERTISEMENT
home / Recipes
Batata Recipe In Marathi

बटाट्याची विविध रेसिपी मराठीत (Batata Recipe In Marathi)

बटाटा म्हटलं की असंही तोंडाला पाणी सुटतं. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती भाजी म्हणजे बटाटा. बटाट्याच्या वेगवेगळ्या रेसिपी (batata recipes in marathi) आपल्याकडे करण्यात येतात. अगदी फ्राईज, भाजी, रस्सा, स्नॅक्स असे विविध चविष्ट पदार्थ आपण बटाट्यापासून तयार करतो. आपल्याकडे अगदी सकाळच्या नाश्त्यामध्येही पोह्यामध्ये बटाटा नसेल (batata poha recipe in marathi) तर नाश्ता अर्धवट वाटतो. तर कोणताही नेवैद्य हा बटाट्याच्या भाजीशिवाय (batata bhaji recipe in marathi) पूर्ण होत नाही. बटाट्याचा कोणताही पदार्थ असेल तर जेवण कसे परिपूर्ण झाल्यासारखे वाटते. अशाच बटाट्याच्या काही सोप्या रेसिपी तुम्हाला या लेखातून आम्ही देत आहोत. 

बटाट्याची पातळ रस्सा भाजी रेसिपी (Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)

Batata Rassa Bhaji Recipe In Marathi
Batata Rassa Bhaji Recipe In Marathi

सकाळी नेहमीच डबा बनवायची आणि ऑफिसला जायची घाई असते. एखाद्या दिवशी सुकी भाजी खायचा कंटाळा आला असेल तर बटाट्याची पातळ रस्सा भाजी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही केवळ 10 मिनिट्समध्ये ही भाजी तयार करू शकता आणि अत्यंत चविष्ट आणि रसदार ही भाजी (batata bhaji recipe in marathi) तुम्ही पोळी अथवा अगदी पाव, ब्रेडसह खाऊ शकता. 

साहित्य 

  • 2 कच्चे बटाटे
  • 2 कच्चे टॉमेटो
  • चिरलेला कांदा 
  • 4-5 पाकळ्या ठेचलेली लसूण 
  • आल्याचे तुकडे 
  • तेल
  • चवीनुसार मीठ 
  • गूळ 
  • हिंग
  • गोडा मसाला
  • कडिपत्ता 
  • हळद
  • तिखट
  • जिरे
  • मोहरी 

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • बटाटे आणि टॉमेटोचे जरा मोठे तुकडे करून घ्यावेत आणि पाण्यात ठेवावे 
  • लहान कुकरमध्ये तेल घ्यावे. तेल तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंग, कडिपत्त्याची तीन चार पाने घालून परतावे. वरून चिरलेला कांदा, बटाटे आणि टॉमेटोचे तुकडे घालून मिक्स करावे. त्यानंतर त्यात हळद, तिखट, गूळ, गोडा मसाला, मीठ घालावे आणि मिक्स करून वरून तुमच्या अंदाजानुसार जाड रस्सा होईल इतके पाणी ओतावे 
  • व्यवस्थित ढवळून घ्यावे जेणेकरून मसाल्याच्या गुठळ्या राहणार नाहीत
  • त्यानंतर कुकरचे झाकण लावा आणि साधारण तीन शिट्ट्या द्या. तुमची बटाट्याची पातळ रस्सा भाजी तयार 
  • गरमागरम भाजीवर तुम्हाला हवी असल्यास तिखट शेव घाला आणि पोळी अथवा पाव, ब्रेडसह खा 

अधिक वाचा – श्रावणातच आहे खमंग, कुरकुरीत अळूवडीचा खरा स्वाद, रेसिपी खुमासदार!

बटाटा काचऱ्या रेसिपी (Batata Kachrya Recipe In Marathi) 

Batata Kachrya Recipe In Marathi
Batata Kachrya Recipe In Marathi

घरात कोणताच आवडीचा पदार्थ नसेल आणि काहीतरी चटपटीत आणि चटकन बनणारी अशी भाजी हवी असेल तर तुम्ही बटाटा काचऱ्या करू शकता. कुरकुरीत आणि बोटं चाटायला लावणारी अशी ही भाजी (batata bhaji recipe in marathi) पटकन तयार होते. 

साहित्य 

  • 2-3 बटाटे 
  • तेल
  • हिंग
  • हळद
  • तिखट
  • जिरे
  • मोहरी
  • चवीपुरते मीठ 

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • बटाट्याच्या लहान चौकोनी काचऱ्या करून घ्या आणि पाण्यात ठेवा 
  • एका पॅनमध्ये तेल घ्या. त्यात जिरे, मोहरी, हिंग तडतडल्यावर कापलेले बटाटे परतून घ्या. वरून हळद, तिखट आणि मीठ घाला
  • मंद आचेवर हे परतत राहा. या काचऱ्या कुरकुरीत होईपर्यंत वाफवा. गॅस अजिबात मोठा ठेऊ नका अन्यथा बटाटा पटकन जळेल
  • या कुरकुरीत काचऱ्या नुसत्या खायलादेखील अप्रतिम लागतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीरही यावर घालून खाऊ शकता

वाचा – तोंडलीची सुकी भाजी (Fry Tondli Chi Bhaji)

लसूणी बटाटा भाजी रेसिपी मराठी (Lasooni Batata Bhaji Recipe In Marathi)

Lasooni Batata Bhaji Recipe In Marathi
Lasooni Batata Bhaji Recipe In Marathi

बऱ्याच ठिकाणी बटाट्याची भाजी (batata bhaji recipe in marathi) करताना केवळ आल्याचा उपयोग केला जातो. लसूण घालून केलेली बटाट्याची भाजीही तितकीच अप्रतिम लागते. आपण बटाटावडा करताना लसणीचा उपयोग करतो. पण अशीच एक सोपी भाजी म्हणजे लसूणी बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi). जाणून घेऊया याची रेसिपी.

साहित्य

  • चिरलेला कांदा 
  • चिरलेला टॉमेटो
  • 2 – 3 उकडलेले बटाटे 
  • तेल
  • काश्मिरी लाल तिखट 
  • चवीनुसार मीठ
  • बारीक ठेचलेली लसूण 8-9 पाकळ्या 

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • सर्वप्रथम कांदा आणि टॉमेटो कापून मिक्सरमधून त्याचे वाटण करून त्याची पेस्ट करून घ्या
  •  दुसऱ्या बाजूला उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. पण ते पूर्ण मॅश करू नका. अर्धवट कुस्करा. त्यामध्ये तयार केलेली कांदा टॉमेटो पेस्ट मिक्स करा. वरून दीड चमचा काश्मिरी लाल तिखट, मीठ मिक्स करून एकत्र करून घ्या
  • पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात बारीक ठेचलेली लसूण घाला. परतून घ्या. लसूण गोल्डन झाल्यावर त्यात बटाट्याचे मिश्रण मिक्स करावे आणि परतावे. त्यानंतर मंच आचेवर हे मिश्रण तसंच गॅसवर ठेऊन द्या. मधून मधून कढईला लागत नाही ना हे पाहा आणि परता. त्यानंतर बाजूने तेल सोडा. पुन्हा झाकण लावा आणि शिजवा. क्रिस्पी लेअर आल्यानंतर बंद करा आणि तुमची भाजी तयार. तुम्हाला हवं असेल तर वरून कोथिंबीर चिरून घाला आणि तुमची लसूणी बटाटा भाजी तयार. 

अधिक वाचा – घरच्या घरी करा दाबेली मसाला आणि बनवा चविष्ट दाबेली

लाल बटाटा भाजी रेसिपी (Lal Batata Bhaji Recipe In Marathi)

Lal Batata Bhaji Recipe In Marathi
Lal Batata Bhaji Recipe In Marathi

काही जणांना भाजीत लाल मिरचीऐवजी तिखट घातलेले आवडते कारण त्याची एक विशिष्ट वेगळी चव लागते. अशीच लाल बटाटा भाजी रेसिपी (lal batata bhaji recipe in marathi) खास तुमच्यासाठी. 

साहित्य 

  • 3-4 उकडलेले बटाटे 
  • मध्यम दोन चिरलेले कांदे 
  • आल्याचे बारीक तुकडे
  • 5-6 पाकळ्या लसूण ठेचलेली 
  • कडिपत्ता 
  • तेल
  • जिरे 
  • मोहरी
  • हळद
  • लाल तिखट 
  • धणे – जिरे पावडर 
  • हिंग 
  • लिंबू
  • कोथिंबीर चिरलेली 

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • उकडलेले बटाटे बारीक कापून घ्या अथवा स्मॅश करा
  • दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे, मोहरी, हिंग, कडिपत्ता घालून चिरलेला कांदा, आले आणि लसूण परतून घ्या. वरून बटाटे घाला आणि परता. त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, मीठ घाला
  • हे सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्या आणि परता आणि वरून लिंबू पिळा आणि चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा परता. लिंबामुळे याला वेगळाच स्वाद मिळतो
  • थोडे वाफवा आणि तुमची लाल बटाटा भाजी तयार. तुम्हाला हवं असेल तर ब्रेडमध्ये घालून तुम्ही याचे सँडविच करूनही खाऊ शकता अथवा पोळीसह तुम्ही ही भाजी खाऊ शकता

अधिक वाचा – पनीरपासून बनवा चटपटीत पदार्थ, पनीर रेसिपी मराठीमध्ये (Paneer Recipes In Marathi)

कुरकुरीत बटाट्याचे काप (Batata Kaap Recipe In Marathi)

Batata Kaap Recipe In Marathi
Batata Kaap Recipe In Marathi

संध्याकाळी अचानक भूक लागल्यानंतर नक्की काय करायचं असा प्रश्न पडतो. त्यावर बटाट्याचे काप हा सोपा आणि चविष्ट पदार्थ आहे. घरातील साहित्य वापरून तुम्ही झटपट ही रेसिपी करू शकता. 

साहित्य 

  • 2 मोठे बटाटे (स्वच्छ धुवा आणि त्याचे स्लाईस करून घ्या)
  • एक वाटी जाड रवा 
  • 1 चमचा लाल तिखट 
  • अर्धा चमचा हळद 
  • चवीनुसार मीठ 
  • शॅलो फ्राय करण्यासाठी तेल

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • बटाट्याच्या सालासकट त्याचे काप करून घेणे 
  • एका भांड्यात रवा, मीठ, लाल तिखट आणि हळद अगदी थोडेसे तेल घालून मिक्स करून घेणे आणि त्यात हे काप घोळवणे 
  • गॅसवर पॅन गरम करणे आणि त्यात थोडेसे तेल घालणे 
  • या तेलावर घोळवलेले काप शॅलो फ्राय कुरकुरीत होईपर्यंत करणे 
  • सॉसबरोबर अथवा हिरव्या चटणीसह हे काप खायला देणे

वाचा – खवा गुलाबजाम (Khava Gulab Jamun Recipe In Marathi)

जिरा आलू भाजी रेसिपी (Jeera Batata Recipes In Marathi)

Jeera Batata Recipes In Marathi
Jeera Batata Recipes In Marathi

क्रिस्पी जिरा आलू बनवणे सोपेदेखील आहे आणि चवीलाही हे अप्रतिम लागतात. शिवाय ही रेसिपी झटपट होते. त्याशिवाय नेहमीच्या बटाट्याच्या भाजीच्या चवीपासून थोडी वेगळी चवही तुम्हाला चाखता येते. 

साहित्य 

  • पाव किलो बटाटे
  • जिरे 
  • अर्धा चमचा हळद पावडर
  •  एक चमचा लाल तिखट
  • कडिपत्ता 
  • अर्धा चमचा गरम मसाला 
  • तेल
  • चिरलेली कोथिंबीर

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • तुम्ही बटाट्याची साले काढून घ्या आणि मग याचे तुकडे करा. हे तुकडे काही वेळ थंड पाण्यामध्ये राहू द्याृ.  तेलात हे तुकडे तळलेत तर अधिक कुरकुरीत अर्थात क्रिस्पी होतात. याचे उभे तुकडे कापा. जेणेकरून तुम्हाला याचा कुरकुरीतपणा अधिक चांगला अनुभवता येईल
  • काही जणांना बटाटे उकडलेले आवडतात. या भाजीसाठी तुम्ही बटाटे उकडू शकता. पण ते अति उकडले जाणार नाहीत, याकडे लक्ष द्या. उकडलेले बटाटे हे कढईत खाली चिकटतात. त्यामुळे उकडून न घेतल्यास अधिक चांगले
  • कढईत पहिले तेल घाला. त्यावर जास्त प्रमाणात जिरे घाला. कडिपत्त्याची पाने हवी असल्यास, तुम्ही त्यामध्ये घाला. जिरे तडतडल्यानंतर पाण्यात भिजवलेले बटाट्याचे तुकडे घाला आणि व्यवस्थित परता. त्यावर झाकण ठेवा आणि मग त्याला व्यवस्थित वाफ देत हे बटाटे कुरकुरीत करा. 
  • पाण्याचा हबका त्यावर मारा, आणि मग त्यावर वरून गरम मसाला, लाल तिखट, हळद, अर्धा चमचा मीठ, तुम्हाला हवा असल्यास चाट मसाला घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. हे झाल्यावर वरून लिंबाचा रस पिळून घ्या आणि चिरलेली कोथिंबीर वरून पेरा. तुमचे क्रिस्पी जिरा आलू तयार आहे. गरमागरम पुऱ्यांसह तुम्ही जिरा आलू सर्व्ह करा

अधिक वाचा – Soybean Bhaji Recipe In Marathi (सोयाबीनची भाजी)

उपवासाची बटाटा भाजी (Upvasachi Batata Bhaji Recipe In Marathi)

Upvasachi Batata Bhaji Recipe In Marathi
Upvasachi Batata Bhaji Recipe In Marathi

बटाटा हा असा पदार्थ आहे जो उपवासालाही चालतो. अनेक घरांमध्ये उपवासाला बटाट्याची भाजी करण्यात येते. काही ठिकाणी काचऱ्यांच्या स्वरूपात ही भाजी केली जाते तर काही ठिकाणी बटाटे उकडवून ही भाजी (batata bhaji recipe in marathi) करण्यात येते. उपवासाची बटाटा भाजी रेसिपी जाणून घेऊ. 

साहित्य 

  • 2 मोठे उकडलेले बटाटे
  • हिरवी मिरची 
  • आल्याची पेस्ट 
  • कोथिंबीर
  • शेंगदाण्याचे कूट
  • ओले खोबरे
  • चवीनुसार मीठ
  • तूप
  • जिरे 
  • कडिपत्ता 

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • उकडलेले बटाटे स्मॅश करून घेणे 
  • दुसऱ्या कढईत तूप घालणे. त्यात जिरे तडतडल्यावर कडिपत्ता घालून वरून आल्याची पेस्ट आणि हिरवी मिरची, हिंग घालून परतणे आणि वरून बटाटा घालणे 
  • परतल्यावर त्यात वरून चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचे कूट आणि ओले खोबरे घालणे
  • व्यवस्थित मिक्स करून वाफवणे आणि वरून चिरलेली कोथिंबीर घालणे 
  • दह्याबरोबर ही भाजी खाणे. चवीला अप्रतिम लागते 

बटाटापुरी (Batata Puri Recipe In Marathi)

Batata Puri Recipe In Marathi
Batata Puri Recipe In Marathi

उपवासासाठी आपल्याकडे अनेक पदार्थ आहेत. त्यात बटाटापुरीचे नाव सर्वात वर घेतले जाते. इतरवेळीही तुम्ही स्नॅक्स म्हणून बटाटा पुरीचा स्वाद नक्कीच घेऊ शकता. जाणून घेऊया रेसिपी

साहित्य 

  • 50 ग्रॅम साबुदाणा (आदल्या रात्री भिजत घाला)
  • 4 उकडलेले बटाटे
  • 4 हिरव्या मिरच्या
  • आल्याचा तुकडा
  • 1 चमचा जिरे
  • 1 मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
  • 50 ग्रॅम राजगिरा पीठ
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल अथवा तूप

बनविण्याची पद्धत 

  • साबुदाणा रात्री पाण्यात भिजवून ठेवा
  • सकाळी सगळ्यात आधी मिक्सरमधून आलं, मिरची आणि जिरे याचे मिश्रण वाटून त्याची पेस्ट करून घ्या
  • एका पातेल्यात भिजलेला साबुदाणा, उकडलेले बटाटे मॅश करून, राजगिरा पीठ, शेंगदाणे कूट, मीठ आणि वरील पेस्ट एकत्र करून मिक्स करून घ्या
  • त्याचे गोळे करा आणि थापा. ही पुरी जाडसर असावी हे लक्षात ठेवा नाहीतर तेल अथवा तुपात फुटण्याचा धोका असतो
  • एका कढईत तेल वा तूप गरम करा. उपवास असेल तर ही बटाटापुरी तुपात तळा. खरपूस आणि खमंग बटाटापुरी खायला तयार. खोबऱ्याच्या चटणीसह याचा आस्वाद घ्या 

बटाटा कटलेट किंवा पॅटीज रेसिपी मराठी (Batata Cutlet Or Patties Recipe In Marathi)

Batata Cutlet Or Patties Recipe In Marathi
Batata Cutlet or Patties Recipe In Marathi

संध्याकाळी अथवा अचानक घरी पाहुणे आल्यानंतर पटकन आणि चवदार असा पदार्थ म्हणजे कटलेट. तुम्ही घरच्या घरी खुसखुशीत आणि खमंग कटलेट्स बनवून नक्कीच सर्वांचे मन जिंकू शकता.

ADVERTISEMENT

साहित्य 

  • पाव कप किसलेले गाजर 
  • वाटलेले आले 
  • वाटलेली मिरची 
  • 1 चमचा कॉर्न फ्लोअर (नसल्यास, आरारोट वापरले तरी चालेल)
  • 2 चमचे चिरलेली कोथिंबीर 
  • 1 चमचा धने पावडर 
  • अर्धा चमचा लाल तिखट 
  • 2 उकडलेले बटाटे
  • चवीनुसार मीठ
  • लिंबाचा रस अथवा आमचूर पावडर 
  • तेल
  • कटलेट घोळविण्यासाठी जाड रवा 

बनविण्याची पद्धत 

  • एका भांड्यात उकडलेले बटाटे, यामध्ये गाजर, कांदा, आले, मिरची, धने पाडवर, तिखट, कॉर्न फ्लोअर, मीठ,  आमचूर पावडर, लिंबाचा रस सर्व मिक्स करा आणि त्याचे गोळे तयार करा
  • सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र केल्यावर त्याला कटलेट्सचा शेप द्या. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पॅटीसच्या आकारातही करू शकता. मात्र हे तयार करताना हातावर तेल घ्या आणि मग याचा आकार बनवा अन्यथा हाताला चिकटेल. 
  • नॉनस्टिक कढईमध्ये तेल गरम करा आणि  मध्यम आचेवर तुम्ही हे कटलेट्स तळा. तुम्हाला तळून नको असेल तर तुम्ही शॅलो फ्रायचा पर्यायही निवडू शकता. 
  • सॉस अथवा  हिरव्या चटणीसह गरम गरम खायला द्या. हे अत्यंत चविष्ट असून आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते

बटाटा पराठा रेसिपी मराठी (Batata Paratha Recipe In Marathi)

Batata Paratha Recipe In Marathi
Batata Paratha Recipe In Marathi

सकाळच्या नाश्त्याला पोटभर खाण्यासाठी बटाटा पराठा (aloo paratha recipe in marathi) हा उत्तम पर्याय आहे. बटाट्याचे पराठे पटकन तयार होतात आणि दोन पराठे खाल्ल्यानंतर लवकर भूकही लागत नाही. जाणून घेऊया याची रेसिपी

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 3-4 उकडलेले बटाटे 
  • मध्यम दोन चिरलेले कांदे 
  • आले – लूसण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट
  • तेल
  • लिंबू
  • कोथिंबीर चिरलेली 
  • गव्हाच्या पीठाची भिजलेली कणीक ट
  • चवीपुरते मीठ 
  • अमूल बटर 

बनविण्याची पद्धत 

  • गव्हाच्या पिठाची कणीक व्यवस्थित भिजवून ठेवा
  • उकडलेले बटाटे मॅश करा. त्यात आले-लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ, लिंबू, कोथिंबीर मिक्स करून घ्या 
  • कणकेचे गोळे करून त्याची पोळी लाटा आणि त्यात बटाट्याचे तयार मिश्रण भरून बंद करा आणि गव्हाच्या पिठाचा वापर करून पुन्हा लाटून घ्या. हलक्या हाताने हे लाटा जेणेकरून बटाट्याचे मिश्रण बाहेर येणार नाही
  • तापलेल्या तव्यावर तेल सोडा आणि वर पराठा शेकून घ्या. दोन्ही भाजून खरपूस पराठा भाजला की वरून आणि बाजून अमूल बटर लावा आणि गरमागरम पराठा सॉस अथवा चटणीसह खायला सर्व्ह करा 

बटाटा आमटी रेसिपी मराठी (Batata Amti Recipe In Marathi)

Batata Amti Recipe In Marathi
Batata Amti Recipe In Marathi

घरात कधी कधी नुसत्या डाळींची आमटी खाऊन कंटाळा येतो. मग अशावेळी बटाट्याची आमटी हा एक चांगला पर्याय आपल्यासमोर असतो. बटाटा आमटी रेसिपी मराठीत जाणून घ्या.

साहित्य

  • 2 ते 3 बटाटे 
  • 1 मोठा कांदा 
  • 1 टोमॅटो 
  • लाल तिखट 
  • गरम मसाला 
  • हळद 
  • दाण्याचे कूट
  • धणे-जिरे पूड 
  • कडिपत्ता
  • तेल फोडणीसाठी 
  • कोथिंबीर सजावटीसाठी

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • बटाट्याची साले काढून त्याच्या फोडी करुन घ्या. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरुन ठेवा
  • एका कढईत तेल गरम करुन मोहरी, जिरे तडतडवा. त्यानंतर कडिपत्त्याची फोडणी तयार झाली की,  हळद घालून कांदा परतून घ्या
  • कांदा चांगला परतला की त्यामध्ये टोमॅटो घालून गरम मसाला, धणे- जिरे पूड, लाल तिखट, मीठ चवीनुसार घाला. टोमॅटो चांगला शिजण्यासाठी झाकण लावा आणि गॅस मंद ठेवा
  • टोमॅटोला पाणी सुटल्यानंतर सगळे सुके मसाले घालून परता. त्यानंतर त्यात बटाटा घालून पाणी घाला आणि बटाटा शिजवण्यासाठी झाकण लावा आणि चांगली उकळी येऊ द्या. 
  • दोन चार उकळी आल्यानंतर त्यामध्ये दाण्याचे 1 ते 2 चमचे कूट घाला. बटाटा चांगला शिजला की, आमटी तयार. ही आमटी भाकरी, चपाती आणि भातासोबत तुम्ही खाऊ शकता

बटाटा साबुदाणा पापड रेसिपी (Batata Sabudana Papad Recipe In Marathi)

Batata Sabudana Papad Recipe In Marathi
Batata Sabudana Papad Recipe In Marathi

आपण अनेकदा बाजारातून पापड घेऊन येतो. पण तुम्ही घरच्या घरीही बटाटा साबुदाणा पापड तयार करू शकता. यासाठी नक्की काय करावे लागते ते जाणून घेऊया. 

साहित्य 

  • 1 किलो बटाटे
  • अर्धा किलो साबुदाणा
  • लाल तिखट अथवा हिरव्या मिरच्या
  • जीरे
  • मीठ
  • तेल किंवा तूप

बनविण्याची पद्धत 

  • सगळ्यात आधी साबुदाणा मंद आचेवर व्यवस्थित कढईला लागू न देता भाजून घ्यावा 
  • गार झाल्यावर मिक्सरमध्ये याचे पीठ करून घ्यावे (तुम्हाला हवं असेल तर बाजारात तयार पीठ मिळते ते पण तुम्ही आणू शकता)
  • बटाटे उकडावे आणि सोलून घ्यावे 
  • त्यामध्ये साबुदाणा पीठ, मीठ, लाल तिखट अथवा मिरचीचे वाटण, वाटलेले जिरे आणि मीठ घालून मिक्स करावे आणि मळून घ्यावे 
  • याचे गोळे करून पापडाच्या आकाराचे पिशवीवर ठेऊन हलक्या हाताने लाटावे
  • दोन दिवस हे कडकडीत उन्हामध्ये लाटलेले पापड वाळवावेत आणि नंतर डब्यात भरून ठेवावेत 
  • तुम्हाला गरज असेल तेव्हा हे तुपात अथवा तेलात तळून खावेत 

तुम्हाला या बटाट्याच्या रेसिपी कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. तोंडाला पाणी आणणाऱ्या या रेसिपी तुम्हीदेखील नक्की ट्राय करा आणि आम्हाला टॅग करा.

ADVERTISEMENT
19 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT